मेहनत आणि संघर्षाशिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात काही मिळणार नाही-प्रो.डॉ सुधाकर शेंडगे
मेहनत आणि संघर्षाशिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात काही मिळणार नाही-प्रो.डॉ सुधाकर शेंडगे
भगवान महाविद्यालयात आजीवन शिक्षण विभागाचे दोन दिवसीय शिबिर उत्साहात संपन्न
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता ओळखून व कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. कारण संघर्षाशिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात काहीच मिळणार नाही . आपले व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये 'आजीवन शिक्षण आणि विस्तार' विभागाचे कार्यक्रम खूप उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचे आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक प्रो डॉ सुधाकर शेंडगे यांनी केले . ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व भगवान महाविद्यालय आष्टी (जिल्हा बीड) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 'आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागा अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेंट कार्यशाळे'त २१ डिसेंबर २०२४ (२०२४-२५) समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्तात्रय वाघ होते . या पाहुणे परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आप्पासाहेब टाळके यांनी केले .
पुढे बोलताना प्रो डॉ. शेंडगे यांनी सांगितले की, परंपरागत अभ्यासक्रम शिकत असताना राहिलेल्या उनिवांची पूर्तता या विभागाने आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमातून येते . जसे की बायोडाटा तयार करणे, संभाषण कौशल्य, पत्रलेखन इत्यादी. आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये नोकरीची शाश्वती नाही हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन तसेच कठोर मेहनत व अनुभवाच्या आधारे उद्योग व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे यासाठीचे मार्गदर्शन दिनांक २० आणि २१ डिसेंबर २०२४ या दोन दिवसीय शिबिरामध्ये करण्यात आले .
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आप्पासाहेब टाळके यांच्या हस्ते करण्यात आले असून , या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ अजय दादा धोंडे होते . तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ दत्तात्रय वाघ हे होते . या दोन दिवशी शिबिरामध्ये डॉ. रामदास कवडे, डॉ अनिल हजारे, डॉ ज्ञानदेव वैद्य, डॉ आबासाहेब पोकळे, डॉ गावडे बी
एफ, डॉ शिवाजी पवार, डॉ दिगंबर पाटील, डॉ. बाबासाहेब झिने, प्रा नंदकिशोर धोंडे, श्री शहाजी अंकुश पोकळे, प्रा श्रीकांत धोंडे यांनी विविध सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ बाबासाहेब झिने, प्रा अनिल हजारे, प्रा अशोक देवकर, प्रा डॉ रामदास कवडे, प्रा डॉ दिगंबर पाटील, डॉ श्रीकांत धोंडे, प्रा किशोर धोंडे यांनी सहकार्य केले असून , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ दिलीप जरे यांनी करुन उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा डॉ. ज्ञानदेव वैद्य यांनी मानले .
Comments
Post a Comment