रामकिसन राऊत जिल्हा परिषद सेवेतु निवृत्त
येवता:केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्माळा या शाळेमध्ये -३३वर्षाची सेवा पूर्ण करीत प्राथमिक शिक्षक श्री. राऊत रामकिसन प्रल्हादराव कानडी माळी येथील रहिवाशी आज दि.३१ डिसेंबर-२०२४ रोजी वयानुरूपी सेवानिवृत्त होत असल्याने,लव्हूरी केंद्रांतर्गत 46 जिल्हा परिषदच्या शाळेच्या वतीने त्यांना सेवानिवृत्तीचा सह पत्नीक निरोप देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी(प्रा.)भगवानराव फुलारी प्रमुख पाहूने म्हणुन उपस्थित होते,केज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रेय चाटे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीलराव केंद्रे,केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे,केंद्रीय मुख्याध्यापक श्रीराम चाटे, प्रस्तावित पर भाषणात फुलारी म्हणाले की केज चे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हे ज्यावेळी विस्तार अधिकारी होते त्यावेळी मी शिक्षक होतो. आणि त्यांची एक तळमळ असते माझ्याकडून काहीतरी कामे व्हावेत त्यांची तळमळ असलेने त्यांच्या आग्रहास्तव मी रामकिसन राऊत सरांच्या निरोप समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहू शकलो कार्यक्रमाचे प्रास्ताविक चौधरी मॅडम यांनी केले सूत्रसंचालन श्रीराम देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बब्रुव्हान चौरे यांनी केले,गोकुळ सारूक, संजय चाळक,गजेंद्र जाधव,गणपत चाळक,कोरसाळे सर इत्यादीने मेहनतीने व परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या लहान विधार्थ्याच्या स्वागत गीताने झाली.
लव्हूरी केंद्रांती सर्व शाळांच्या नियोजनाने राऊत सरांचा स्वप्तत्नीक कपड्यांचा आहेर देऊन,स्नेहभोजनाची उत्कृष्ठ व्यवस्था करण्यात आली.
Comments
Post a Comment