पालकमंत्री बीडचाच हवा ; बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री अतुल सावे यांचा कार्यकाळात बीडकरांनी भोगलंय ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२६ ) बीड जिल्ह्याला कायम अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान तर संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक गेल्या १ जानेवारी २०२४ ते ३१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ११ महिन्यात १७४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. सध्या बीड जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरून मिळणार अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहेत. मात्र आम्हा बीडकरांचा मागील अनुभव पहाता जेव्हा मागच्या सरकारमध्ये बाहेर जिल्ह्यातील बीडचे पालकमंत्री अतुलजी सावे असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे आम्हाला दि.१० एप्रिल २०२३ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " " निष्क्रिय पालकमंत्री हटाव आंदोलन " करावे लागले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी बीड जिल्ह्यातील जनतेचा विचार करून बीडचा पालकमंत्री बीड जिल्ह्यातील असावा.
बाहेरचा पालकमंत्री असल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठका वेळेवर होत नसुन निधी अभावी बीडचा विकास खुंटतो
बीड जिल्ह्यासाठीचा पालकमंत्री अजुनही जाहीर झाले नसल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकली नसल्याने शिल्लक निधी कसा खर्च करायचा आणि उर्वरित निधीची कशी मागणी करायची यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.बीड जिल्ह्यासाठी
चालु आर्थिक वर्षात ४८४ कोटी रूपयांचा वार्षिक निधी मंजूर झाला खरा परंतु राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून केवळ १९० कोटी रुपये जिल्ह्याच्या पदरात आले.१९० कोटी रूपयांपैकी ३ महिन्यात ११० कोटी रुपये खर्च झाले असुन त्यातील ७० कोटी रुपये शिल्लक आहेत.मंजुर असलेल्या एकुण ४८४ कोटी रूपयांपैकी अजूनही २९४ कोटी रुपये राज्य सरकारकडून बीड जिल्ह्याला मिळालेले नाहीत. बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री असतील तर नियोजन समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत असा बीडकरांचा अनुभव आहे त्यामुळे बीडचाच पालकमंत्री करावा अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment