पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
रक्तदान हेच श्रेष्ठ दान :- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
मानवी रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. ज्यावेळी रक्ताची गरज लागते त्यावेळेस मानवी शरीरातूनच काढून घ्यावे लागते. म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही रक्तदान करतात तेव्हा फक्त एकाच रुग्णाला फायदा होतो. परंतु जेव्हा तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतात त्यात संकलित झालेल्या रक्त पिशव्यांमुळे शेकडो रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतात. त्यामुळेच शिबिर आयोजित करणे महत्त्वाचे आहे रक्तदान हे अनमोल असे जीवदान आहे. आपले रक्तदान एखाद्या गरजवंत रुग्णांना, अपघातग्रस्तांना जीवदान ठरू शकते, कोणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येत नाही.
म्हणूनच रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी हा विचार आपण सर्वांनीच अंगीकारला पाहिजे तसेच रक्तदानामुळे रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्त निर्माण करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना मिळते.
म्हणून दिनांक 26/12/2024 रोजी माझा वाढदिवस आहे. मी तो वाढदिवस साजरा करणार नाही.
कारण परभणी प्रकरणामध्ये आंदोलन कर्ता शहिद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी तसेच पॅंथर नेते बौद्धवासी विजय दादा वाकोडे यांचे दुखःत निधन झाल आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे या तीन प्रसंगामुळे मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना, बीड माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, शुभचितंक, यांना सांगु ईच्छतो. माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावू नये, केक कापू नये व हार-शाल घेऊन भेटण्यास येऊ नये. ते मी या तीन प्रसंगामुळे स्विकारणार नाही.
सामाजिक बांधिलकी जोपासत बीड शहरात ऑल इंडिया पँथर सेना संपर्क कार्यालय, बीड येथे दिनांक 26/12/2024 रोजी ठिक 11.00 वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे तरी सर्वांनी या शिबीरास उपस्थित राहवे. सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment