बीड येथे ६ जानेवारीला जनआक्रोश मोर्चा

बीड येथे ६ जानेवारीला जनआक्रोश मोर्चा

परभणी हत्याकांड प्रकरणी सर्व दलित संघटनांची आंदोलनाची हाक
बीड प्रतिनिधी - बीड येथील सर्व दलित - बहुजन समाजातील समाजातील संघटनां एकत्र येऊन दि .६ जानेवारी २०२५ रोजी बीड येथे संविधान बचाव- जनआक्रोश मोर्चा काढणार असून , या मोर्चात सर्व संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .

   परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमीत शाह यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी , परभणीत महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत , देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात , शासकीय नौकरीतील गुत्तेदार पध्दत रद्द करण्यात येऊन, रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरीत भराव्यात , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दरमहा देण्यात यावी , शासकीय सेवेतील आरक्षणामधील वर्गीकरण कायदा रद्द करण्यात येऊन शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे , आदी मागण्यासाठी दि.६ जानेवारी रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव- जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे . 

   बीड शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासून निघणारा हा मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे पुतळा, छ. शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे .
    या मोर्चाच्या तयारीसाठी सर्व दलित व बहुजन, आंबेडकरवादी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये बैठक झाली . जिल्हयातील सर्व संघटनांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी