संपादक जितेंद्र सिरसाट यांना एकेरी भाषेत धमकी देवुन बोलणारया जिल्हाधिकारी कार्यातील महीला कर्मचारयांनी तात्काळ माफी मागावी-विवेक कुचेकर
संपादक जितेंद्र सिरसाट यांना एकेरी भाषेत धमकी देवुन बोलणारया जिल्हाधिकारी कार्यातील महीला कर्मचारयांनी तात्काळ माफी मागावी-विवेक कुचेकर
युवा ग्रामीण पत्रकार संघटना करणार आंदोलन
बीड जिल्हा (प्रतिनिधी) : परखडपणे लेखन करणारे दै.वास्तव चे संपादक तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आ.जितेंद्र सिरसाट साहेब यांच्या बद्दल एकेरी भाषेत आणि धमकी देऊन बोलणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील महिला कर्मचारी आघाव यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघटना जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे .
ज्या लेखणीमुळी सामान्य जनता आपले हक्क अधिकार मिळवू शकते,तसेच तळागाळातील जनतेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय दिला जातो,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला,लोकशाहीच्या रक्षणकर्त्याला एक सरकारी कर्मचारी महिला सगळ्या गोष्ठी विसरून धमकी देत एकेरी भाषेत आरे तुरी ची भाषा करत आहे आणि च्यालेंज करत आहे,हा हुकूमशाहीचा एक भाग आहे,सर्व प्रथम या सर्व गोष्टींचा युवा ग्रामीण पत्रकार संघटना जाहीर निषेध व्यक्त करत आहे.
आणि आघाव या महिला कर्मचाऱ्यांनी विनाकारण एकेरी भाषेत,आणि धमकावून आणि च्यालेंज करून बोलल्यामुळे आणि एक आदर्श पत्रकारांचा अवमान केल्या मुळे आ.दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्र सिरसाट साहेब यांची जाहीर माफी माघावी आशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे .
Comments
Post a Comment