संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणी याचं कुणी राजकारण करू नये व दोषी आरोपीला कठोर शासन करावे : बलभीम बारगजे

 बीड (सखाराम पोहिकर ) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणहत्या झाली त्या प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शासन करून त्यांच्या कुटूंबाला न्याय द्या अशी मागणी माणूसकी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम बारगजे यांनी केली हे करत असताना याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वास येतोय स्वतः च्या स्वार्थासाठी स्वतःला पद मिळवण्यासाठी काही बीड जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी या गोष्टीचं घाणेरडे राजकारण करत आहेत त्या कुटूंबाना न्याय मिळावा जी घटना घडली ती फार चुकीची आहे बीड जिल्ह्याला लाजिरवाणी आहे ही घटना जाती - धर्माच्या विरहित आहे ज्याच्या कुटुंबात हा प्रसंग घडतो त्यांची वेदना त्या कुटूबप्रमुख व त्यांच्या मुलांना माहित असते त्यांच्यामुळे जे काय बीड जिल्ह्यात घाणेरडे राजकारण चालू आहे हे थांबवावे व देशमुख कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्न करू व त्या कुटूंबांना न्याय मिळवून देऊ पण यांच्यामध्ये राजकारण कोणाचं पद आणि प्रतिष्ठा किवा कोणता समाज बदनाम होता कामा नये शेवटी बीड जिल्ह्याची जनता ही जो पर्यंत संतोष देशमुख . कुटूंबाला न्याय मिळत नाही तोपर्यत स्वस्थ बसणार नाही आशी माहिती बलभीम बारगजे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी