पत्रकारितेत उल्लेखनीय कार्यासाठी आयेशा शेख यांना पुरस्कार जाहीर
बीड प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याबद्दल आयेशा शेख यांना पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा सन्मान सोहळा 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, संत ज्ञानेश्वर नगर, शासकीय आयटीआय मागे, बीड येथे संपन्न होणार आहे.आयेशा शेख यांना मिळालेल्या या सन्मानामुळे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील महिलांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment