बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त ; नगरपालिका प्रशासन दिशाभूल करत कागदोपत्री कारवाईत व्यस्त

बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त ; नगरपालिका प्रशासन दिशाभूल करत कागदोपत्री कारवाईत व्यस्त :- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि.२५) बीडकरांची रस्त्यांवरील मोकाट कुत्री आणि जनावरांच्या त्रासापासून सुटका होण्याची शक्यता नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मावळली आहे.जनावरे रस्त्यावर मोकाट सोडण्याच्या प्रकाराने नागरीकांना रस्ते,पाणी, पथदिवे आदी नागरी समस्यांनी त्रस्त असताना मोकाट कुत्री आणि जनावरांमुळे नविन समस्येत भर पडली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन अथवा आंदोलनानंतर नीता अंधारे मुख्याधिकारी नगरपरीषद बीड कागदोपत्री सर्वकाही आलबेल असल्याचे आणि दोषींवर कारवाई सुरू असल्याचे गोलगोल उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत असुन कागदोपत्रीच कारवाई केल्याचे दाखवत आंदोलकांची दिशाभूल करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत 
असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे.


कोंडवाडा कार्यान्वित आहे तर रस्त्यावर मोकाट जनावरे कशी?? प्रथम दंड आणि नंतर गुन्हे दाखल करून जनावरे जप्त करण्याच्या मुख्याधिकारी यांच्या आश्वासनांचे काय झालं? :- डॉ.गणेश ढवळे 

रस्त्यांवरील जनावरांच्या कळपामुळे दुचाकींच्या अपघाताचे प्रकार वाढले आहेत तर चारचाकी वाहनांचेही जनावरांच्या धडकांमुळे मोठे नुकसान होत आहे.शहरातील नगररोड, बार्शी रोड, जालना रोड या प्रमुख रस्त्यांसह शहरातील प्रमुख बाजारपेठा, शहरांतर्गत सर्वच रस्त्यांवर जनावरांचे कळप दिसुन येतात.रस्त्यांवरील जनावरांच्या कळवंड तसेच अचानक जनावरं उधळण्याने अपघातांचे प्रकार वाढले आहेत.याबाबत नगरपालिका प्रशासनाला तक्रार केल्यानंतर जुजबी कारवाई करण्यात येते. मध्यंतरी नीता अंधारे मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांनी नगरपालिकेकडुन कोंडवाडा कार्यान्वित केला असुन प्रथम ५०० रुपये दंड भरून घेताना हमीपत्र लिहून घेणार आणि पुन्हा असा प्रकार घडला तर जनावरांच्या मालकांवर थेट गुन्हे दाखल करून जनावरेच जप्त करणार असे आश्वासन दिले होते.मात्र मुख्याधिकारी यांच्या कारवाईच्या आश्वासनांचे काय झालं असा सवाल करत ते आश्वासन कागदोपत्रीच राहिल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

मोकाट कुत्र्यांचा उच्छाद आणि श्वानांच्या नसबंदिच्या निवेदेसाठी इच्छुक पुढे येईना ; नगरपरिषद मुख्याधिका-यांचे गा-हाणे सुरूच 

 बीड जिल्हात जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या १४ महिन्यांच्या कालावधीत १४ हजार २२१ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे.
बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असुन मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरीकांना रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे.मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असुन यामुळे लहान मुले, महिला,वृद्धांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बीड शहरातील गांधीनगर परीसरातील एकाच दिवशी ३० शाळकरी मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. शाळकरी मुलांचे लचके तोडल्याची घटना अंगावर शहारे आणणारी होती.तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह मंत्र्यांच्या उत्तरदायित्व सभेसाठी बीडमध्ये आलेल्या ६० नागरीकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. नीता अंधारे मुख्याधिकारी नगरपालिका बीड मात्र शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करणेबाबत दरवर्षी जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहे परंतु एकही निविदा प्राप्त न झाल्यामुळे याबाबतीत पुढील कार्यवाही झाली नाही. याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी