पत्रकार हरीओम क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त लिंबागणेश जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप



लिंबागणेश:- ( दि.२४ ) बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२४ मंगळवार रोजी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब हांगे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बकेचे मॅनेजर अविनाश सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे उपस्थित होते.यावेळी सहशिक्षक भरत चौरे,संदिपान आगम, माधुरी कुलकर्णी, सुवर्णा अयाचित , बँक कर्मचारी समाधान ढास उपस्थित होते. सुत्रसंचलन भरत चौरे यांनी केले तर वाढदिवसाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना पत्रकार हरीओम क्षीरसागर यांनी याच शाळेचा विद्यार्थी असल्याने याच शाळेत सामाजिक भान ठेवून मुलांसाठी खारीचा वाटा उचलण्याचा योग आला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद :- आबासाहेब हांगे मुख्याध्यापक जि.प.कें.प्रा.शाळा लिंबागणेश )

आजकाल वाढदिवस म्हटलं की बॅनरबाजी,केक ,हार,तुरे, पार्टी अशा प्रकारच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी शालेय साहित्य वाटपाचा वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते हरिओम क्षीरसागर यांचा अभिनव उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मुख्याध्यापक आबासाहेब हांगे यांनी मनोगत व्यक्त केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी