मुप्टा संघटनेच्या 'बीड जिल्हा संपर्क कार्यालय' उदघाटन समारंभास उपस्थित रहा - शरद मगर



 बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एकमेव लढवय्ये संघटना म्हणून ज्याचे नाव आहे त्या मुप्टा शिक्षक संघटनेचे कार्य अधिक वेगाने होण्यासाठी व संघटन बळकट करून शेवटच्या शिक्षकांपर्यंत न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मुप्टा शिक्षक संघटनेचे संपर्क कार्यालय होणे गरजेचे होते . त्या अनुषंगाने मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव प्रा सुनील भाऊ मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हा मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मगर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संपर्क कार्यालय सुरू होत आहे. 
या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन प्रा. सुनील (भाऊ ) मगरे यांच्या हस्ते तर शरद मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. 
दिनांक 29 डिसेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 10 वाजता राजीव गांधी चौक डीपी रोड, बीड येथे संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी मुप्टा शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संभाजी वाघमारे डॉ.समीउल्ला खान( उर्दू मुप्टा राज्याध्यक्ष) प्रा. प्रदीप रोडे (कार्याध्यक्ष) , सुभाषजी पवळ (समर्थ शिक्षण संस्था सिरसमार्ग ), डॉ. भास्कर टेकाळे (विभागीय कार्याध्यक्ष), राजेंद्र जाधव( माध्यमिक विभागीय कार्याध्यक्ष), प्राचार्य येवले आप्पासाहेब( कालिका देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरूर कासार), प्राचार्य प्रदीप गाडे (पारगाव हायस्कूल पारगाव) या अतिथींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) ,प्रवीण तरकसे (जिल्हाध्यक्ष माध्यमिक विभाग) प्रा. बाळासाहेब गव्हाणे( विभागीय कार्याध्यक्ष जूनियर), भैय्यासाहेब आदोडे( जिल्हा कार्याध्यक्ष) प्रा. नारायण घोलप (जिल्हा सचिव, जुनिअर विभाग ) संजय बागुल( जिल्हा कार्याध्यक्ष जूनियर विभाग) श्रीकांत वारभुवन( जिल्हा सचिव माध्यमिक विभाग), शैलेश चिलवंत (जिल्हा सचिव प्राथमिक विभाग ) प्रमोद साळवे (जिल्हा कार्याध्यक्ष प्राथमिक विभाग ) यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. तरी या दिमागदार सोहळ्यासाठी मुप्टाच्या सर्व शिक्षक प्राध्यापक व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा द्यावी. असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर व बीड जिल्हा मुप्टा संघटना यांनी केले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी