शिक्षणासाठी PHN कंपनीचे मोलाचे सहकार्य विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करून पाटोदा तालुक्यापुढे दिला एक प्रेरणादायी संदेश
पाटोदा (प्रतिनिधी )जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पाटोदा येथे सामाजिक बांधिलकीचे अप्रतिम उदाहरण पाहायला मिळाले. प्रदिप हनुमंत नारायणकर (PHN) कंपनीकडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षणात सुधारणा घडवून आणणे हा आहे. अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करणे कधी कधी आव्हान ठरते, त्यामुळे अशा उपक्रमांनी मोठ्या प्रमाणावर मदत होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विषयानुसार वह्या, दुरेघी व चाररेघी वह्या, बॉक्सची वही, कंपास, ड्रॉइंग ची वही, रंगांचे बॉक्स, लाल व निळा पेन अशा अनेक उपयोगी साहित्याचा वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पाहायला मिळाली, तसेच त्यांच्या मनात शिक्षणासाठी नवचैतन्य जागृत झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटोदा नगराध्यक्षा सौ. दिपाली र...