शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह; पालकांना सतर्कतेचे आवाहन - नितीन सोनवणे,

बीड, दि. 12 जून 2025: येत्या 16 जून 2025 पासून राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होत असताना, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्कूल बस आणि व्हॅनच्या फिटनेस सर्टिफिकेटची तपासणी करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे. बीडमधील नितीन सोनवणे ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष बीड या सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आवाज उठवला असून, जुन्या आणि खराब झालेल्या वाहनांना शाळांसाठी परवानगी देऊ नये, सोनवणे यांनी अशी मागणी बीड RTO कडे केली आहे.
पालकांना उद्देशून एका निवेदनात म्हटले आहे की, “आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल वाहनांची योग्य देखभाल आणि वैध फिटनेस प्रमाणपत्र असल्याची खात्री करा. जुन्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.” यासंदर्भात बीड RTO ने कठोर नियम लागू करावेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, ऑल इंडिया पँथर सेना बीड च्या वतीने अशी मागणीही करण्यात आली आहे. अपघात किंवा कोणतीही हानी झाल्यास याची जबाबदारी बीड RTO ची असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बीड पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनाही याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी SchoolSafety, BeedRTO, SafeTravel, FitnessCertificate या हॅशटॅग्सद्वारे सोशल मीडियावर जनजागृती सुरू केली आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी सतर्क राहावे आणि वाहनांची तपासणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पालकांची भूमिका महत्त्वाची
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पालकांनी स्वतःहून स्कूल बस किंवा व्हॅनच्या कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि निर्धास्त होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
बीड RTO कडून याबाबत कोणती पावले उचलली जाणार, याकडे बीड जिल्ह्यात या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी