अंथरवन पिंपरी ग्रा.पं. व बीड शहर बचाव मंचाच्या वतीने पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिन वृक्षारोपण करून साजरा
अंथरवन पिंपरी ग्रा.पं. व बीड शहर बचाव मंचाच्या वतीने पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिन वृक्षारोपण करून साजरा
वामा" चित्रपट अभिनेते महेश कुमार वनवे यांची ही प्रमुख उपस्थिती..
बीड (प्रतिनिधी)दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन व काल झालेला जागतिक पर्यावरण दिन या दोन्हींचे औचित्य साधून अंथरवन पिंपरी येथे ठीक सकाळी नऊ वाजता शिवराज्याभिषेक ध्वजारोहण करून वंदन करण्यात आले. याच निमित्ताने ग्रामपंचायत व बीड शहर बचाव मंच यांच्या यांच्या संयुक्त सहयोगातून वृक्षावरोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. बीड शहर बचाव मंचाच्या वतीने 200 झाडे देण्यात आलेली आहेत व येत्या काळामध्ये ग्रामपंचायत 1000 झाडे लावण्याचा उपक्रम लवकरच पूर्ण करील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नुकतेच लोकमत समूहाच्या वतीने अंथरवण पिंपरी ग्रामपंचायतीला सरपंच ऑफ इयर 2025 हा पुरस्कार देण्यात आला आहे. गावच्या सरपंच सौ. शिवगंगा ताई भाऊराव प्रभाळे या दाम्पत्यांनी गावांमध्ये फार छान कौतुकास्पद विकास कामे राबवली आहेत व अक्षरशः गावाचा कायापालट केला आहे. गावामध्ये सगळीकडे गल्लोगल्ली सिमेंट रस्ते व पेवर ब्लॉक रस्ते केले आहेत. गावामध्ये अनेक विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या सर्व अडीअडचणींना प्रभाळे दांपत्य अहोरात्र उभे असते. गावामध्ये वृक्षारोपण करून गावाला हिरवे नंदनवन करण्याचीअग्रणी भूमिका भाऊराव प्रभाळे यांनी घेतली आहे. आजच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला वामा" चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते महेशकुमार वनवे यांची बीड शहर बचाव मंचाच्या वतीने प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग हे जगावर आलेले मोठे संकट आहे अशी चिंता व्यक्त केली. यातून वाचण्यासाठी व पुढच्या पिढीला दुष्काळासारख्या मोठ्या नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी गावोगाव वृक्षारोपन केले जावे हाच एक पर्याय शिल्लक आहे असे मत व्यक्त केले. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला बीड शहर बचाव मंचाच्या व ग्रामपंचायत च्या वतीने नितीनजी जायभाये, सरपंच सौ शिवगंगा ताई व भाऊराव प्रभाळे, ह.भ.प. नवनाथ महाराज हरको बाबा संस्थान, अभिनेते डॉ. ॲड.महेशकुमार वनवे, वनवे काका, पंचायत समितीचे वि.अ. कल्याणराव शेळके साहेब, ग्रामसेवक सौ.ज्योतीताई लेकुरवाळे, सुधीर देशमुख,उपसरपंच अशोक शिंदे, सदस्य अशोक शिंदे, संतोष शिंदे, दिलीप शिंदे, संग्राम वाघमारे, खाजा शेख, ॲड.नितीनजी वाघमारे, रामधन जमाले, ॲड. प्रेरणाताई सूर्यवंशी, सौ. लताताई राऊत, बाजीराव ढाकणे, डॉ.संजय तांदळे, अशोकराव येडे, किशकिन्दाताई ताई पांचाळ, माऊली शिंदे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment