डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतले प.पू.पंडित प्रदीप मिश्रा यांचे दर्शन



बीड (प्रतिनिधी)
दि.९ : विसाव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त बीड तालुक्यातील चाकरवाडी येथे सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त कथा प्रवक्ते प.पू.पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यांचे कथेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दर्शन घेतले.

कथेच्या सुरुवातीला ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या उपस्थितीत पूजा पार पडली. त्यांचे देखील आशीर्वाद घेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कथा श्रवण केली. यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्यासह भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा, डॉ.दिपाताई क्षीरसागर, संतोष सोहनी, शुभम धूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांमध्ये भक्तिभावाचे वातावरण असून, परिसरात अध्यात्मिक ऊर्जा अनुभवता येत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी