शिक्षणासाठी PHN कंपनीचे मोलाचे सहकार्य विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करून पाटोदा तालुक्यापुढे दिला एक प्रेरणादायी संदेश


पाटोदा (प्रतिनिधी)जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पाटोदा येथे सामाजिक बांधिलकीचे अप्रतिम उदाहरण पाहायला मिळाले. प्रदिप हनुमंत नारायणकर (PHN) कंपनीकडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षणात सुधारणा घडवून आणणे हा आहे. अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करणे कधी कधी आव्हान ठरते, त्यामुळे अशा उपक्रमांनी मोठ्या प्रमाणावर मदत होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विषयानुसार वह्या, दुरेघी व चाररेघी वह्या, बॉक्सची वही, कंपास, ड्रॉइंग ची वही, रंगांचे बॉक्स, लाल व निळा पेन अशा अनेक उपयोगी साहित्याचा वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पाहायला मिळाली, तसेच त्यांच्या मनात शिक्षणासाठी नवचैतन्य जागृत झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटोदा नगराध्यक्षा सौ. दिपाली राजूभैय्या जाधव होत्या. त्यांनी आपल्या भाषणात या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, अशा सहकार्यामुळेच समाजाचा विकास होतो असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा पोलिस स्टेशनचे पि.आय. सोमनाथ सर, पठाण सर, तसेच प्रदिप हनुमंत नारायणकर, पालक प्रतिनिधी दिलीप जावळे, दिव्यांग प्रतिनिधी संतोष गाडेकर, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक बांगर जयराम सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सामाजिक विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्व सांगितले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाचे साहित्य मिळणे म्हणजे त्यांच्या भविष्याची उजळणी करणे होय.” सुरेखा खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्ताविक व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी PHN कंपनीचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या गरजा जाणून घेतल्या आणि भविष्यातही अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.या उपक्रमामागील सामाजिक संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे – "विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया शिक्षणाने मजबूत करूया." अशा उपक्रमांमुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाला एकत्र येण्याची प्रेरणा मिळते.या उपक्रमामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी PHN कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी या प्रकारच्या उपक्रमांमुळे शिक्षणाचा दर्जा वाढेल आणि समाजाची उन्नती होईल असा विश्वास व्यक्त केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी