पाली गावात महिला सरपंचांना विरोधी गटाचा सापळा;विकासकामे ठप्प, सरपंचांचा संताप व्यक्त
""महिला सरपंचांवर सापळा? पालीत विरोधकांचा खेळखंडोबा; मंजुषा नवले यांचा संतप्त सवाल – '
मी फक्त महिला आहे म्हणून..गावाचा विकास थांबवायचा का?"सरपंच मंजुषा नवले
पाली गावात महिला सरपंचांना विरोधी गटाचा
सापळा;विकासकामे ठप्प, सरपंचांचा संताप व्यक्त
बीड प्रतिनिधी :-
"महिला सबलीकरणाची फक्त गाजावाजा, प्रत्यक्षात सत्तेचा वापर करण्यास विरोध" अशा संतप्त शब्दांत पाली (कपिलधारवाडी) ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. मंजुषा शैलेंद्र नवले यांनी पालकमंत्री मा. अजित पवार यांच्याकडे आपली व्यथा मांडली आहे. फक्त "मी महिला असून जनतेतून निवडून आले" या कारणाने विरोधी गटातील सदस्यांकडून सातत्याने अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.सरपंच नवले यांनी एका थेट आणि तीव्र शब्दांत निवेदन देत सांगितले की, पाली गावाला लागून असलेल्या बिंदुसरा धरणातून बीडसह 18 गावांना नियमित पाणीपुरवठा होत असताना, पाली गावाला मात्र आठ दिवसातून एकदाच पाणी दिले जाते, ही अन्यायाची परिसीमा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रामपंचायतीत विरोधी गटाचे दहा सदस्य कोणत्याही विकास कामाला मंजुरी देत नाहीत, कोणत्याही ठरावावर स्वाक्षऱ्या न करता कामकाज ठप्प केल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. यामुळे गावातील मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.सरपंच सौ. नवले यांनी आपल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की,"जर मला काम करण्याची संधी दिली जाणार नसेल, तर मी सरपंच पदाचा राजीनामा द्यायलाही तयार आहे. पण गावाचा विकास थांबवणाऱ्या वृत्तीचा तीव्र निषेध आहे."तसेच त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आवाहन केले की,"आपण राज्यात विकासाचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाता, बीडचे पालकमंत्री म्हणून आपण हस्तक्षेप करून प्रशासनाला निर्देश द्यावेत, जेणेकरून गावातील विकास कामांना गती मिळेल."या निवेदनाने जिल्हा प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, "महिला सशक्तीकरण फक्त बोलण्यापुरतेच आहे का?" असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्येही विचारला जात आहे.
मुख्य मुद्दे:
.पाली ग्रामपंचायतीत महिला सरपंचाला कामात अडथळे
.विरोधी गट विकास कामांना मंजुरी देण्यास नकार
.पाणीपुरवठ्यात भेदभाव; आठ दिवसात एकदाच पाणी
.सरपंचांचा प्रशासनाकडे हस्तक्षेपाची मागणी
.“काम करू द्या किंवा राजीनाम्याचा सल्ला द्या”; सरपंचांची परखड भूमिका
Comments
Post a Comment