बीड जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत अधिकार द्या अन्यथा अर्धनग्न सत्याग्रह करणार-भाई गौतम आगळे


परळी (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेतील कंत्राटी कामगार पुरवठा करणारे कंत्राटदार कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत अधिकार द्या अन्यथा 30 जून 2025 रोजी अर्ध नग्न सत्याग्रह करण्याचा इशारा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आगळे सर यांनी नमूद केले आहे की,मा. मनोज रानडे आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे आदेश क्रमांक नपप्रसं/२०२४/ सर्व न.प.कंत्राटी कर्मचारी/ कक्ष - ६ / ५०६६ दिनांक:- २६.०८.२०२४. ची काटेकर पणे अंमलबजावणी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13/5/2025 रोजी संयुक्त बैठक घेण्यात आली त्याचे इतिवृत्त दिनांक 23 मे 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद नगरपंचायत यांना पाठवून त्यांच्याकडून कंत्राटी कामगार यांना देण्यात येत असलेल्या वेतनाबाबत चा व इतर सोयी सुविधांचा वस्तुनिष्ठ अहवाल मागून घेण्याचे निर्देश जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना दिलेत. कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न पुढीलप्रमाणे उद्योग,ऊर्जा, कामगार व खनि कर्म विभाग मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दिनांक 24 फेब्रुवारी 2015 व 6 मार्च 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती वगळून या रोजगारात असलेल्या कंत्राटी कामगारांचे किमान वेतन पुनर्निर्धारित केले, त्याप्रमाणे वेतन दर महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्यात यावे, किमान पगार आणि प्रत्यक्षात मिळालेला पगार यामधील फरक त्याच्या फरकाच्या दहापटीपर्यंत नुकसान भरपाई देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा यु.एन.ए. नंबर देऊन मागील अनेक वर्षापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, कंत्राटदारांनी दर ०६ महिन्यात कंत्राटी कामगारांना मास्क,हॅंडग्लोज, सेफ्टी शूज दिले पाहिजे, मात्र मागील अनेक वर्षांपासून ही अत्यावश्यक सुविधा कंत्राटदारांनी पुरवलेली नाही त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, नगरपरिषद बीड आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना दिनांक एक जून 2023 रोजी अयोग्य व बेकायदेशीरित्या कामावरून कमी केले त्यांना पगाराच्या व कामाच्या सलगतेसह पूर्ववत तात्काळ कामावर घेण्यात यावे या सर्व मागण्या येत्या पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा 30 जून 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालयास सादर करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा कामगार प्रतिनिधी भाई गौतम आगळे सर मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड, जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड. यांच्या दालनासमोर दिनांक: 30 जून 2025 रोजी सकाळी 11: 30 ते दुपारी 01: 30 पर्यंत अर्धनग्न सत्याग्रह करून दुपारी ०३ वाजल्या पासून न्याय मिळेपर्यंत कार्यालयीन वेळेत धरणे आंदोलन करतील. होणाऱ्या सर्व अनुचित प्रकारास महाराष्ट्र शासन, प्रशासनातील सनदी अधिकारी जिल्हा प्रशासन व बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत हेच जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले असून त्याच्या प्रतिलिपी संबंधित मंत्री महोदय व सनदी अधिकारी यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आल्या आहेत, असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी कळविले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी