बच्चु भाऊ कडु यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील अन्नत्याग आंदोलनास बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठींबा देण्याची गरज - बाजीराव ढाकणे

बीड प्रतिनिधी :- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठींबा दिला पाहिजे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केले आहे. बच्चू भाऊ सदैव लोकहिताच्या कार्यात सहभागी असणारे व्यक्तिमत्त्व आहेत ते शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच हे आंदोलन छेडत आहेत तर आपणही या आंदोलनात सहभागी होण्याची आवश्यकता आहे असे वाटते असे मत बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.
 शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबाही दिला पाहिजे 
 
शेतकरी कर्जमाफी असूदे की, हमीभाव... मायबाप शेतकऱ्याच्या प्रत्येक मुद्यावर बच्चु भाऊ कडु ठाम भूमिका घेतात . त्याचं बरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सातत्याने केंद्रीय पातळीवर कर्जमाफी आणि हमीभावाचा मुद्दा लावून धरला. किंबहुना कॉग्रेसचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना शेतकऱ्यांना दिलासा देत संपूर्ण कर्जमाफीचा निर्णयही घेतला होता . 
पण सध्याच्या राज्य सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख करूनही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रात २०२४ मध्ये २,६३५ तर मागच्या ६ महिन्यांत ८६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. डोक्यावरचं कर्ज, नापीकी, अवकाळी पाऊस तसेच सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना कंटाळून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यात विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा मोठा आहे. राज्यातल्या महायुती सरकारने सत्तेत यायच्या आधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं. पण सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं.

भाजप आणि महायुती सरकारचे घटक राहिलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सहा दिवस उलटतायत. त्यांची साधी दखलही या निगरगट्ट सरकारने घेऊ नये? आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्यांना गांभीर्याने घ्यावं. तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. नसता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हातात रुमणे घेऊन सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या डोक्यात रुमणे घातल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 
    महाराष्ट्र राज्यातील शेतकरी संकटात सापडलेले असुन त्याला आता मदतीची गरज आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी