बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आरोपींना तात्काळ फाशीद्या व पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून जिल्हातील सर्व खाजगी क्लासेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे सावता सेनेच्या स्वाती कातखडे यांची मागणी



पाटोदा (प्रतिनिधी)बीड शहरातील उमाकिरण नावाच्या खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सातत्याने लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकरणी सावता सेनेच्या बीड जिल्हा अध्यक्षा सौ. स्वातीताई कातखडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत तत्काळ आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.स्वातीताईंनी म्हटले की, "अशा विकृत प्रवृत्तीमुळे निष्पाप मुलींचे बालपण उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा बसावा यासाठी कठोर कारवाई आणि त्वरित न्याय आवश्यक आहे."तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात यावे, अशीही मागणी सावता सेनेच्या महिला बीड जिल्हाध्यक्षा स्वातीताई कातखडे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी