खालापूरी येथील अवैध्य धंदे बंद करा, संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांचेच बगलबच्चे दोन नंबर धंद्यात सामील.
खालापूरी येथील 62 गुंठे वक्फ् बोर्डाच्या पवीत्र जागेवर दारू आणि गुटखा विक्री
सदरील जागा ही ग्रामपंचायत ला विचारल्यावर वक्फ् बोर्डाची असल्याचे सांगत आहेत पण तिथे ग्रामपंचायत चे गाळे आहेत ज्याचं भाडेपत्रक तयार नाही, गाळे करार तयार नाही त्याची निविदा सूचना आणि अंमलबजावणी साठी ग्रामपंचायत जबाबदारी घेत नाही मग तिथे कोणत्या अधिकाराने दारू विक्री होत आहे तिथे दारू गुटखा आणि तत्सम नशेरी पदार्थ का विकले जातं आहेत? यावर पोलिसांचा कायद्याचा अंकुश नाही का? लोकप्रतिनिधी जवळच्या लोकांना अश्या पद्धतीने अवैध्य धंदे करण्यासाठी गाळे देत असतील तर हे योग्य नाही. पोलीस प्रशासनाने तात्काळ यावर कायदेशीर कार्यवाही करून. अतिक्रमण विभागाने तात्काळ ती जागा मोकळी करून द्यावी तिथे तरुण व्यवसाईकांसाठी शासन मान्य व्यवसाय करण्यास गाळे तयार करावे अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.
बीड प्रतिनिधी :- पोलिसांच गाव अशी ओळख असणाऱ्या खालापूरी गावाची ओळख गेल्या दोन वर्षांपासून दारुड्याचं गाव म्हणून होत आहे. पोलीस यंत्रणानी यावर अंकुश ठेवावा, मंत्री,संत्री, मंत्रालय, आमदार, खासदार,कलेक्टर आयुक्त यांना भेटून प्रॉब्लेम सॉल्व करू म्हनणारा आज ग्रामपंचायत च्या गाळ्यात सहकाऱ्याला दारू चा धंदा टाकून देताना दिसतो आहे. अरे धंदाच टाकून द्यायचा आहे ना तर द्याना दुधाचा,दह्याचा, फुलांचा टाकून दे की?त्यात नाही का पैसे मिळत? दारूचा धंदा टाकून देऊन लोकांचे संसार का उध्वस्त करतो आहे?लोकांना दारूच्या नशेत ठेऊन खालापूरी गावात विकास करायचा नाही की काय? बाजूच्या गावाचे बगल बच्चे मिळून क्लब चालवत आहेत,दारूची गांज्याची आणि गुटखा्यांची सर्रास विक्री होत आहे. वाळू रात्री उपसून ट्रॅक्टर ने घेऊन जातं आहेत, पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. गोर गरिबांना लुटताना, त्यांना त्रास देताना, घरकुल विहीर आणि तत्सम सरकारी योजनेत हजारो रुपये लाटणारे नेते इथेच आहेत.संविधानिक पदावर असूनही ह्याच्यात त्याच्यात भांडणे लावून बांधावरून, घर जमिनीवरून वाद लावून येथील जनतेला कोर्ट कचेरी करायला लावत आहेत इथे शांतता समिती अजूनही जाहीर नाही. गावात शांतता समिती केंव्हा स्थापन होणार का वाद विवाद लावून लोकांची टकुरे फोडायची आहेत? गावात एकही वाद मिटत नाहीत उलट वाद लावले जातात त्याला प्रत्यक्ष दर्शी म्हणून येथील सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी साक्षीदार राहतात. अरे पोलिसांनी जेंव्हा वादविवाद झाले तेंव्हा तुमचे नाव कशी घेतली? तुम्ही प्रत्यक्ष दर्शी नसताना तुम्ही साक्षीदार कसे? तुम्ही तर नसताना ही साक्षीदार असल्याची सरळ सरळ उल्लेख दिसतो आहे आणि असं एक नाही तुमच्या विरोधात असणाऱ्या अनेक लोकांच्या बाबतीत हेच घडत आहे.मग गावाचा लोकप्रतिनिधी किंवा गावातील शांतता समिती नूसती झोपा काढायला आहे की काय? उगाच गावात मिटणारे भांडणे पोलीस स्टेशनं पर्यंत नेऊन भांडणे का वाढवत आहात?गाव म्हणजे कुटुंब आहे आणि कुटुंब वात्सल्य व्यवस्था जपली पाहिजे.बोलणाराच तोंड बंद केल जातं. त्याला दबावात घेतलं जातं मागे दारू बंदी साठी बऱ्याच लोकांनी निवेदने दिली पण अजुनही उलट आता तर ग्रामपंचायत गाळ्यातही सर्रासपणे दारू, गुटका, गांज्या विक्री चालू आहे. लोकांना नशेत ठेऊन भ्रष्टाचार असाच वाढवून गाव नासवला जातं आहे.ह्यात पोलीस ही सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इतके उघड अवैध धंदे चालू कसे देता? खालापूरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे गाव एकमेव दारुसाठी आदर्श गाव आहे जेथील ग्रामपंचायत चे गाळे आणि जागा दारू विक्रीसाठी दिली आहेत ह्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे. इतर गावातील व खालापूरी गावातील बेवडे, पेताड दारुडे इथे येऊन आई माई वर शिव्या-शाप देतात, त्यांचे रोजचे भांडणे येथील लोकांना पाहावे लागतात, यातून मोठमोठी वाद विवाद होतात क्लब चालू आहेत. मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी यावर लक्ष देऊन खालापूरीची दारूबंदी खालीच पाहिजे. पत्ते आणि क्लब बंदी झालीच पाहिजे. आणि येथील संविधानिक पदावर असणाऱ्या अधिकारी आणि प्रतिनिधी यांच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे.कारण कोणाच्या आशीर्वादाने हे चालू आहे.कोणत्या अधिकाराखाली किंवा लिलावांतर्गत हे गाळे व जागा दारू, गुटखा, पत्ते खेळण्यासाठी भाड्याने दिले आहेत? त्याचा करारनामा तलाठी किंवा ग्रामसेवकांकडे आहे का? त्याच भाडे पत्रक कुठे आहे? गाळ्यांच्या भाड्याची नियमावली काय आहे? तिथे दारू विक्री साठी परमिशन दिलीच कशी? सदरील सर्व जबाबदार अधिकारी आनी ग्रामपंचायत नियुक्त पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे.ह्याची तात्काळ चौकशी लावा. असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे. गावातील व परिसरात पत्त्याचे क्लब मोठ्या जोराने चालू आहेत दारुविक्री मुळे आमच्या घरात काडी लागून संसार मोडत असल्याचे खालापूरी येथील ग्रामस्थ आणि स्रिया-महिला मंडळ बोलत आहेत. गावचे प्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. गावात सुशिक्षित वर्ग नौकरीसाठी बाहेर आहे गावाचं देण घेणं कोणाला आहे की नाही? निवडून दिलेले प्रतिनिधी नेमके करतात तरी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे. दुकानदार दारू आणतात कुठून, विकतात कसे, ठेवतात कुठे,ह्यांचे हप्ते ठरवून घेतल्याची उघड चर्चा होत आहे. सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब हे जाळ लवकर उघड करा गावातील म्हातारे दारूने पत्त्याने लुटले आहेत कमीत कमी येणाऱ्या आमच्या पिढ्या तरी वाचवा. आजकाल सर्वच सर्रास दारू गांज्या चरस गुटखा विकताना खाताना दिसत आहेत कोणाचा कोणावर अंकुश नाही. तरी मेहरबान साहेबांनी यावर विचार करून योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन प्रसिद्धी पत्रकाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment