सौ. के.एस.के. महाविद्यालयात शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी

 

सौ के एस के महाविद्यालयात शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली ह्यावेळी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. उप्राचार्य डॉ संजय पाटील उपस्थित होते .
सविस्तर भाष्य करतांना डॉ. दुष्यंता रामटेके यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला . छत्रपती शाहू महाराजांचा कार्य कर्तुत्व इतकं मोठं आहे की लोकांनी त्यांना अनेक बिरुदं  दिलेली आहेत लोकराजा,रयतेचा राजा, मल्लांचा पोशिंदा, कलाकारांचा आश्रयदाता, परिघाच्या बाहेरील लोकांसाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता, आरक्षणाचे जनक, असे अनेक बिरुदं  त्यांना देण्यात आली म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचारांचे सामाजिक क्रांतीकारकही आपण शाहू महाराजांना म्हणू शकतो. एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला नाही मग त्यामध्ये आर्थिक, सिंचन, शैक्षणिक,सामाजिक, वैद्यकीय , क्रीडा,कला साहित्य... सर्वच क्षेत्रात वेगळाच ठसा उमटविणारा आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ठ रूढी-परंपरा यावर प्रहार करणारा लोकराजा.  त्यांना लोकसिद्ध ईश्वर हि म्हणण्यात येते कारण कारण तुकाराम महाराजांचे अभंग मध्ये काही ओळी आहेत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेच जाणावा साधू तेथेच ओळखावा आणि असंच काहीसं व्यक्तिमत्व हे शाहू महाराजांचं आहे. डॉ. दुष्यंता रामटेके यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना, त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. त्यामध्ये गंगाराम कांबळे यांचे चहाचं दुकानाची कथा,घोड्यांच्या खात्यावरून आरक्षणाची कथा, आरक्षणाची कथा, कैवाडयाच्या मुलाला पैलवानाचं प्रशिक्षण देऊन त्याला उत्कृष्ट मल्ल बनवणं असेल आणि एका कानाने बहिरा आणि एका कानाने कमी ऐकू येणाऱ्या मुलाला, स्वतः वैद्यकीय उपचार करून, संगीताच्या तालीमी देऊन,एक अतिशय उत्कृष्ट असा गायक आणि अभिनेता जो नंतर बालगंधर्व म्हणून ओळखल्या जाऊ लागला, त्यांची कथा. अश्या सर्व प्रसंगावरून अशा सर्व प्रसंगावरून शाहू महाराजांनी जातीय विषमतेला विरोध केला, पण कुठल्याच जातीबद्दल त्यांनी मनात आकस ठेवला नाही आणि सर्वांना फक्त एक प्रजा म्हणून त्यांनी मदत केली. याशिवाय विधवा पुनर्विवाह, शिक्षण असेल शिष्यवृत्ती हॉस्टेल्स या  सर्व बाबी प्रजेला उपलब्ध करून दिल्या. सामाजिक सुधारणे बरोबर त्यात परिवर्तन होत आहे की नाही,  हे स्वतः पाहून त्यांनी एक सामाजिक क्रांती केलेली आहे. महात्मा फुल्यांनी जे परिवर्तनवादी विचार मांडले , ते 100% शाहू महाराजांनी अमलात आणलेय; म्हणून ज्योतिबा रचिला पाया, शाहू झालेस कळस असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत डॉ.  दुष्यंता मॅडम  यांनी व्यक्त केले.  याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ गुट्टे सर आणि डॉ देशमाने सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  काकडे सर, पर्यवेक्षक  प्रा. कोळेकर सर, प्रा. प्रदीप साळुंके , प्रा. इमाद सर, आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी