जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागातील किमान वेतनाला फुटले पाय ; 15 वर्षांपासून कामगार किमान वेतनापासून वंचित
जिल्हाधिकारी यांनी घ्यावी दखल
(बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत आस्थापनेतील घनकचरा व्यवस्थापनातील किमान वेतनाला पाय फुटले असून, जिल्ह्यात १५ वर्षांपासून कंत्राटी कामगार किमान वेतना पासून वंचित असल्याने येथील किमान वेतन गेले कुठे. असा प्रश्न कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन पाय फुटलेल्या किमान वेतनाची चौकशी करून जिल्यातील मागील सर्व किमान वेतनातील फरका सह यापुढे नियमित किमान वेतन कायद्यानुसार वेतन, व इतर सोयी सवलती अदा करण्यात यावीत. अन्यथा यासाठी कामगारांना सोबत घेऊन अर्ध नग्न आंदोलन दिनांक ३० जून २०२५ रोजी करण्यात येइल. असा इशारा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील नगरपरिषद /नगरपंचायत आस्थापनेतील कामगार पुरवठा करणारे कंत्राटदार / एजन्सी कंत्राटी कामगारांना मागील १५ वर्षांपासून किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नाहीत, बाकी सोयी सवलती सुद्धा गायप होत असून, ते कुठे जात आहेत हे कंत्राटी कामगारांना आजतागायत माहितच होत नाही. यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी कामगार १५ वर्षांपासून किमान वेतना पासून वंचित आहेत. याबाबत रोजंदारी मजदुर सेना या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अनेक वर्षापासून आंदोलन करून किमान वेतन कायद्यानुसार वेतन का मिळत नाही याची विचारणा करतात. तेव्हा जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन जिल्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना निर्देश देतात. परंतु संबंधित मुख्याधिकारी सफाईदारपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांचे वेतन कुठे जाते. असा प्रश्न कंत्राटी कामगार उपस्थित करत आहेत.
या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभाग दुर्लक्ष करत असल्याने आता जिल्हा सह आयुक्त यांनीच गंभीर दखल घेऊन, जिल्ह्यातील किमान वेतन नेमके जाते कुठे याचा शोध घेऊन, येथील कंत्राटी कामगारांना पुढील महिन्यापासून नियमित किमान वेतन कायद्यानुसार वेतन व इतर सोयी सवलती देण्यात याव्यात यासाठी सोमवार दिनांक ३० जून २०२५ रोजी कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन अर्ध नग्न सत्याग्रह करण्याचा इशारा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment