दैठणाघाट येथे ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल असू सुध्दा आरोपी मोकाट, उधारे कुटुंबियाची एस.पी.कडे धाव

दैठणाघाट येथे ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल असू सुध्दा आरोपी मोकाट, उधारे कुटुंबियाची एस.पी.कडे धाव

 बीड प्रतिनिधी - लताबाई बापुराव उधारे, रा. दैठणा घाट ता. परळी वै.जि. बीड येथील रहीवासी असुन पती बापुराव आप्पा उधारे, दोन मुल नामे आप्पाराव व विजय यांच्यासह राहते. माझे पती बापुराव आप्पा उधारे हे मागिल अडीच वर्षापासुन दैठणाघाट ता. परळी वे येथील सरपंच म्हणून काम करत आहेत. माझ्या पतीला ग्रामपंचायतचे काम करण्यास आमच्या गावातील हनुमंत अशोक गुट्टे व इतर लोक हे विरोध करत असुन त्यांच्या विरोधात माझ्या पतोने मागिल एक महिण्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे तक्रारी अर्ज दिलेला आहे.

विजय दिनांक 03/06/2025 रोजी सायंकाळी माझे पती बापुराव आप्पा उधारे व मुलगा बापुराव उधारे हे दोघे अंबाजोगाई येथे आमच्या नातेवाईकाकडे गेलेले होते. मी घरी एकटीच होते. आमच्या घराची लाईट गेल्यामुळे रात्री 10.00 वा. सुमारास मी माझी ननंद छटुवाई देवीदास शिंदे हिच्याकडे जात असताना आमच्या गावाच्या भगवान बाबा चौकात, बस स्टैंड समोर आरोपी हनुमंत गुट्टे, शिवाजी श्रीपती गुट्टे, गोविंद दादाराव गुट्टे हे माझ्या जवळ येऊन तुझा नवरा आमचे काम आडवतो का? त्याला नीट समजावून सांग, असे म्हटल्यावर माझे नव-याने काय चुकीचे केले असे म्हणताच, ये मांगटे आम्ही तुम्हाला कच-यातून काढून इतपर्यंत आणले आहे आणि तुझा नवरा आता आमच्या विरोधात अर्जफाटे करता का? असे म्हणून मला शिव्या देऊ लागले व पुन्हा आम्हाला ग्रामपंचयायतचे कामाबदल विचारणा केली तर आम्ही तुमच्या संपूर्ण कुटंबाला जिवे मारुन टाकु अशा धमक्या देऊ लागले, वगैरे फिर्यादवरुन दिनांक 10/06/2025 रोजी पो.स्टे. परळी ग्रामीण गु.र.नं. 259 / 2025 कलम 352.351 (2), 351 (3),3 (5) भारतीय न्याय संहोता सह कलम 3(1) (1), 3(1) (ड), 3(2) (v-a) अ.जा.ज.अ.प्र. का प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

प्रस्तुत प्रकरणातील आरोपी हे अत्यंत गुंड प्रवृत्तीचा असून तो माझा गावातील रहिवासी आहेत. सदर आरोपी व इतर यांनी माझ्या जवळ येऊन तुझा नवरा आमचे काम आडवतो का ? त्याला नीट समजावून सांग,, ये मांगटे आम्ही तुम्हाला कचयातुन काढून इतपर्यंत आणले आहे.आणि तुझा नवरा आता आमच्या विरोधात अर्ज फाटे करता का? असे म्हणून मला शिव्या देवून माझ्या संपूर्ण कुटंबाला जिवे मारुन टाकू अशा धमक्या देऊ लागले.

सदर आरोपीचे गावामध्ये जास्त लोक असल्यामुळे व आमचे समाजाचे लोक कमौ असल्यामुळे कधीही आमच्या घरावर हल्ला करून आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची शक्यता आहे. माझे पती सरपंच असल्यामुळे त्यांना वेळी अवेळी कोठेही जावे लागते त्यामुळे सदर आरोपी मोकाट गावात फिरत असून ते त्यांना काय करतील याचा नेम नाही. ते आम्हाला गावा मध्ये राहू देणार नाही व सतत त्रास देतील त्यामुळे माझा व माझा कुटुंबाच्या जीवितास धोका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वरील सर्व प्रकारामुळे मला व माझे पती यांना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. तसेच सदर आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकुन त्यांना धमकावत आहेत. सदर आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे.

माझे पती हे जनतेतून निवडुन येवून सरपंच झालेले आहेत. ग्रामसेवक व वरील लोक आपसात संगनमत करुन लाखो रुपयाची कामे बोगस दाखवून भ्रष्टाचार करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणत्याच कागदपत्रावर सही केली नाही किवा विकासकामाच्या कोणत्याही प्रस्तावावर सह्या केल्या नाहीत. त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.

त्यामुळे अशा परिस्थिती मध्ये जर आरोपीना अटक केले नाही तर त्यांचे मनोबल उंचावून व पोलीस प्रशासनाची भीती न बाळगता मला व माझ्या कुटुंबियाच्या जीवितास धोका करण्याची दाट शक्यता आहे. तसेच माझ्या कुटुंबावर अन्य प्रकारे गंभीर गुन्हा करण्याची दाट शक्यता आहे.तरी आपणास विनंती करण्यात येते की, आरोपी हनुमंत गुट्टे, शिवाजी श्रीपती गुट्टे, गोविंद दादाराव गुट्टे यांना तात्काळ अटक करुन मला न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देऊन उधारे कुटुंबीयांनी एस पी यांच्याकडे मागणी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी