माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरफडी येथे विद्यार्थ्यांना फळ व स्वीट वाटप
बीड प्रतिनिधी - भारतीय सैन्यात सोळा वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजेच बोरफडी येथे शालेय विद्यार्थी व नागरिकांना फळे व स्वीट चे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील शिक्षक विद्यार्थी सरपंच तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार ला उत्तर देताना सांगितले की गावाकडच्या मातीमध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असताना झाडाची रानटी फळे खात लहानाचा मोठा या मातीत झालो. या मातृभूमीच्या मातीतून देश सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. तशी प्रेरणा येथे शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी व देशासह वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव मोठे करावे. असे त्यांनी भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाला गावातील विद्यार्थी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment