सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (के.एस.के.) काकु कृषि महाविद्यालय बीड येथील कृषीदुताकडून खापर पांगरी ह्या गावातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व बीजांकुरण याबद्दल मार्गदर्शन
बीड प्रतिनिधी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (के.एस.के.) कृषी महाविद्यालय, बीड येथील विद्यार्थ्यांनी खापर पांगरी गावात शेतकऱ्यांसाठी बीजप्रक्रिया आणि बीजांकुरण यावर मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक आयोजित केले. या उपक्रमाला गावातील वीस ते पंचवीस शेतकरी आणि गावच्या सरपंच अंजना राम माने यांची उपस्थिती होती.
यावेळी कृषीदूत गणेश शिरसाट, विशाल शिंदे, माधव सानप, उज्जैर शेख, निखिल वाघचौरे आणि वज्जा लक्ष्मण यांनी शेतकऱ्यांना रासायनिक आणि जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया कशी करावी, तसेच बीजांकुरण कसे तपासावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रात्यक्षिक पाहिले. यावेळी शेतकऱ्यांच्या मनात आलेल्या विविध शंकांचे कृषीदूतांनी निरसन केले.
महाविद्यालयाचे सहसचिव डॉ. जी. व्ही. साळुंखे, प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. एस. टी. शिंदे, प्रा. एस. एस. राठोड, प्रा. डॉ. पी. ए. गायकवाड आणि उपक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. पी. ढोरमारे यांचे या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम यशस्वी ठरला.
Comments
Post a Comment