बीड जिल्हा अन्याय, अत्याचारग्रस्त म्हणून घोषीत करा - अनिल तुरुकमारे
बीड पोलीस अधिक्षक नवनीत कांवत हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगीरणी केज दोषी विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यास टाळाटाळ, आझाद मैदान मुंबई येथे उपोषण धरणे.....
बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात नवनीत कावत हे पोलीस अधिक्षक म्हणुन पदभार घेतल्या पासुन आज पर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असुन महिला वरील अन्याय अत्याचारात वाढ झालेली आहे. पोलीस अधिक्षक हे पोलीस अधिक्षक कार्यालयात बसुन फक्त आदेश देण्याचे काम करीत आहेत, अनुचीत प्रकार घडल्यास ते तात्काळ भेट देत नाहीत त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. अनुसुचित जाती जमाती मधील महिला यांच्यावर मारहाणीचे प्रकार, विनयभंगाचे प्रकार, जातीवाचक शिवीगाळीचे प्रकार घडले आहेत गुन्हा दाखल होऊन ही या प्रकरणी त्यांनी तात्काळ कार्यवाही न करता दुर्लक्ष केल्यामुळे महिलांच्या अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. अकार्यक्षम पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांची बदली मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात करण्यात यावी.
तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगीरणी केज यांचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार संगीता ठोंबरे, चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे, तत्कालीन जात पडताळणी सदस्य सचिव रविकांन्त मारुती शिंदे बीड, राजकुमार दयाराम व्हावळे या सर्वांनी संगनमत करुन महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच काही नौकरीदार यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र जात पडताळणी विभागाकडुन चुकीच्या पध्दतीने हस्तगत करुन लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगीरणीचे परस्पर सभासद दाखवले आहेत. त्यात माझा मुलगा ऋषीकेश अनिल तुरुकमारे याचा ही समावेश आहे. या बाबत मा. मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महासंचालक संभाजीनगर इत्यादी ठिकाणावरुन चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले होते. मा. पोलीस अधिक्षक बीड यांनी अप्पर पोलीस अधिक्षक तिडके मॅडम, अंबाजोगाई यांच्या अधिपत्याखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली. सदर चौकशी समीतीने चौकशी करुन अडीच महिन्यापुर्वी पोलीस अधिक्षक बीड यांना अहवाल सादर केला आहे. परंतु पोलीस अधिक्षक बीड हे चौकशी अहवालाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्या ऐवजी किरकोळ मुद्दे काढुन फेरचौकशी चे आदेश काढले आहेत. चौकशी समिती अहवालाप्रमाणे कार्यवाही करणे ऎवजी संबंधीत सुतगीरणीच्या दोषींना वाचविण्यासाठी फेर चौकशीचे आदेश काढले आहेत असे स्पष्ट दिसते. चौकशी समिती अहवाला प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी यासाठी मा. पोलीस अधिक्षक यांना अनेकवेळा भेट देवुन विनंती केली परंतु संबंधीता विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याचे टाळाटाळ करत आहेत तसेच सुतगीरणीचे मुख्यप्रवर्तक, चेअरमन व दोषी अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस अधिक्षक बीड हे करीत आहेत, तरी सदरील सुतगीरणी प्रशासना विरुध्द तात्काळ अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांच्या चौकशी अहवाला प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व बीड जिल्हा अन्याय आणि अत्याचारग्रस्त घोषीत करण्यात यावा या मागणीसाठी आज १ जुलै २०२५ पासुन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे उपोषण सुरु केले आहे.
Comments
Post a Comment