Posts

Showing posts from June, 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने सोमवारी आष्टी तहसील कार्यालया समोर आराधखाना आंदोलन

Image
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने सोमवारी आष्टी तहसील कार्यालया समोर आराधखाना आंदोलन   तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे-जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे  आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :   आष्टी तालुक्यातील विविध घटकातील लाभार्थी संबंधित अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणांमुळे वंचीत राहिल्याने ,  डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी दिनांक २४ जून रोजी आष्टी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले होते .    या निवेदना मध्ये -- १)संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेतील दाखल प्रकरणे मंजुर करणे,२)वृध्द कलाकारांना पेन्शन मंजूर करणे. ३) शासकीय गायरान जमीनीवरील सध्या स्थितीतील जमीन क्षेत्रावरील पिकांची पाहणी गाव नं.१ ईला नोंदी घेण्यात याव्यात . ४) रमाई,शबरी,ठक्कर बाप्पा योजनेतील हाप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे. ५) शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे दाखले ३ दिवसांत देण्यात यावे , आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले होते . ३० जून पर्यंत वरिल सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती या निवेदनात केली होत

विधानसभा निवडणुका आल्या की माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न-माजी आ.भीमराव धोंडे

Image
आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :       विधानसभा निवडणुका जवळ आल्या की माझ्या राजकीय विरोधकांकडून माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न केला जातो कारण माझे राजकीय अस्तित्व संपले पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे कटकारस्थान करून माझे मानसिक मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जातो असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी कालच्या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगीतले .     याबाबत अधिक माहिती देताना माजी आ.धोंडे यांनी सांगितले की,अहमदनगर येथील तथाकथित पत्रकार व दोन महिलांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप करून तुमच्या आमच्याकडे क्लिप आहेत.त्या आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करून तुमचे राजकीय अस्तित्व संपवून टाकू अशी वारंवार धमकी देऊन पैशाची मागणी करत होते.प्रारंभी ही महिला मला वारंवार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन व मेसेज करून ब्लॅक मेलींगची भाषा वापरत होती‌. याबाबत चार महिन्यापूर्वी आष्टी पोलीस ठाण्यात या महिलेच्या विरोधात तक्रार दिली होती.आष्टी पोलिसांनी या महिलेला आष्टी येथे बोलावून जबाब घेतला त्यानंतर मला फोन येणे बंद झाले परंतु लोकसभा निवडणूक काळात मला परत मेसेज व फोन यायला सुरुवात झाल

परळी बस स्थानकात व बाहेर रिक्षा चालकांनी निर्लज्ज पणाचा गाठला कळस! मेन रोडवर अस्ताव्यस्त पार्किंग,

Image
बसस्थानकातून रिक्षात भाडे भरणे चालू पोलीस प्रशासन व परिवहन अधिकारी अंध भूमिकेत! परळी प्रतिनिधी - परळी शहरात वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यास बराच वेळ जातो, आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ भांडणे वाढतात, वाहन चालकांची चिडचिड वाढते, वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते. ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. दुचाकी स्वार हे भरधाव वेगात चालत असतात छोटे छोटे अपघात दररोज बसस्थानका समोर पहावयास मिळत आहेत  दुचाकी स्वाराना गंभीर इजा होत असून भांडण तंटा हाणामारी यांचे प्रमाणात वाढ झाली असून या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?वाहतूक कोंडी का होते याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.जनमानसात असा समज असा आहे की रस्ते अरुंद, चौकात पोलिस उभे नसल्यास, वाहन चालकाच्या बेशिस्त वागणुकीने होते,मोठ्या,अवजड,माल-वाहतूक वाहना मुळे,बस,रिक्षा मुळे, फूटपाथ वाढविल्यास, गती रोधकांमुळे, फूटपाथ वरील अतिक्रमणाने बस थांब्यामुळे अडसर , फळा ची गाडे हॉटेल समोरील दुकाना समोरील वाहन पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होतअसून याकडे पोलीस प्रशासन ठोस भूमिका कधी घेणार आटो चे हप्ते घेत सोयीनुसार, हेतू पुरस्पर आणि अन

डॉ सुनील बोबडे आणि डॉ राधाकीसन डाके यांनी हृदयरोग आणि उपचार यावर केले मार्गदर्शन

Image
शिरूर कासार येथील हॉटेल साई येथे शिरूर कासार मेडीकल असोसिएशन आणि टोरणं फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सीएमई आयोजित केली होती यातील प्रमुख वक्ते डॉ सुनील बोबडे आणि डॉ राधाकीसन डाके यांनी हृदयरोग आणि उपचार यावर खूप छान मार्गदर्शन केले.बीड येथे हृदय संबंधी उपचार सहज सोप्या आणि किफायती दरात त्यांनी उपलब्ध करुन दिले आहेत.यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ अशोक गवळी, शिरूर मेडिकल असोसिएशन चे डॉ बडजाते, डॉ जितीनदादा वंजारे, डॉ विवेक ढाकणे, डॉ बारगजे,डॉ परमेश्वर बडे, डॉ जवरे,डॉ घुगे मॅडम, डॉ अनिल बडे,डॉ सानप, डॉ राऊत, डॉ पालवे,डॉ भोंडवे, डॉ गाडेकर,डॉ सुळे, डॉ ढाकणे, खेडकर, डॉ शेळके, डॉ कंठाळे इत्यादीसह अनेक डॉ उपस्थित होते

दादाने घेतलेल्या 'लाडकी बहिण' योजनेच्या सोनाली येवले यांनी पेढे वाटून केले स्वागत

Image
पाटोदा (प्रतिनिधी )महाराष्ट्र सरकारने 'लाडकी बहीण,योजना राबवण्याचे घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून याकरिता आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे ह्या निर्णयांचा पाटोदा तालुक्यातील अजित दादा पवार कट्टर समर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोनाली येवले यांनी  अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी लोकप्रिय ठरलेली 'लाडली बहिन' योजना आपल्या महाराष्ट्रात लागू केल्याने महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रूपय मिळणारी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजना लागू केल्याने राज्यातील तमाम महिला वर्गात आनंद व्यक्त होत असून पाटोदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सोनाली येवले यांनी पेढे वाटून या योजनेचे स्वागत केले आहे.

चंदनसावरगाव -जवळबन रस्त्याचे निकृष्ट काम थांबवून दर्जेदार काम करा -कुलदीप करपे

Image
चंदनसावरगाव -जवळबन रस्त्याचे निकृष्ट काम थांबवून दर्जेदार काम करा -कुलदीप करपे मुख्यमंत्री ग्राम सडक योजेनेचे कार्यकारी अभियंता यांना लेखी तक्रार बीड/प्रतिनिधी       केज तालुक्यातील पंधरा वर्षापासून दुरावस्था झालेल्या मुख्य दळणवळण्याचा मार्ग असलेला चंदन सावरगाव -जवळबन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संथ गतीने काम चालू असून काम प्रारंभ करण्यापूर्वी जुना रस्ता उखडून नव्याने करणे आवश्यक असताना सिद्धेश्वर कंट्रक्शन, धाराशिव या कंत्राटदार कंपनीने जुन्याच रस्त्यावर शेजारच्या तलावातील कच्चा माती मिश्रित शाडू वर्णाचा मुरूम टाकून काम चालू केले आहे.रस्त्याच्या साईडपट्टया देखील खाली काळी माती आणि वर कच्चा मुरूम टाकून भरल्या आहेत.दोन्ही साईड पट्टया भेगाळल्या आहेत.निकृष्ट काम तात्काळ थांबवन्याबाबत उपविभागीय अभियंता श्री एम.आर. फड ,शाखा अभियंता श्री.मते यांना वारंवार कळवून सुद्धा त्यांनी दखल न घेतल्याने मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने सदर रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला आहे. या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे.सदर रस्ता जाणीवपूर्वक संगणमताने कंत्राटदार कंपनीने व पर्यव

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा उपजिल्हाप्रमुख राजु महुवाले

Image
बीड प्रतिनिधी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा ताई अंधारे यांच्या प्रतिमेचे काही समाजकंटकाने परळी येथे दहन करून त्यांची राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न केला अशा समाजकंटका वर गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात यावी नसता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड शहर प्रमुख शेख निजाम यांनी दिला आहे  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या उप नेत्या सुषमा ताई अंधारे ह्या परळी येथे असताना काही इलेक्ट्रोनिक मीडिया ने पुणे येथील ड्रग प्रकरण व जिल्ह्यातील विकासा बाबतीत त्यांची मुलाखत घेतली होती  या मुलाखतीत सुषमा ताई अंधारे यांनी न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालून काही काही समाज विघातक लोकांनी त्यांच्या प्रतिमेचे दहन केले समाज कंटकाचे हे कृत्य म्हणजे शहरात दहशत माजवून अशांतता निर्माण करणे होय अशा कृत्यांना वेळीच पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण

शेतकर्‍यांना सरसगट विनाअट पीककर्ज माफी करिता किसान सभेचे धरणे आंदोलन

Image
शेतकर्‍यांना सरसगट विनाअट पीककर्ज माफी करिता किसान सभेचे धरणे आंदोलन   जिल्हा भारतील शेतकरी विविध प्रश्नाला घेऊन शासन दरबारी   बीड जिल्हा (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :         केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे व मागील हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आला असल्याने नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या परंतु निसर्गाच्या अवकृपे पीक कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना सरसगट विनाअट पीक कर्ज माफी द्यावी यासह शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्नावर अखिल भारतीय किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या प़सगि उपस्थित होते .    मागील हंगामातील सोयाबीन पिकाचे उर्वरित पीक विमा वाटप करण्यात यावा,दूध उत्पादक शेतकऱ्यांना भिकेला लावणारा दूध भुकटी आयात धोरणाला प्रतिबंध घालावा,रबी पीक विम्याचे वाटप करण्यात यावे,१५ जुलै पूर्वी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना विना अटी, शर्ती शासनाच्या नियमानुसार पीक कर्ज देण्यात यावे,नियमित पीक कर्जाची फेड करणाऱ्या व अडचणीमुळे पीक कर्ज फेडू न शकलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीफकर्ण सरसकट विनाअट मा

"विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील जीवनाची वाटचाल करावी"- प्रा.डॉ. आनंद वाघ

Image
'राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा' या डॉ. बाबासाहेबांच्या आदेशाला प्रमाण मानून भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा, बीडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्यां जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२४ रोज बुधवार या दिवशी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ठीक 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोटर सायकल रॅली काढण्यात आली तिचा समारोप राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या जवळ झाला. या मोटारसायकल रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर समता सैनिक दलाचे सैनिक सहभागी होते. याच दिवशी संध्याकाळी ठीक 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बीड येथील सभागृहामध्ये शाहू महाराजांच्या जीवनावर व्याख्यान आणि इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.  प्रा. डॉ.आनंद वाघ हे प्रमुख व्याख्याते होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.यशवंत कदम सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आर.एम शिंदे साहेब (समाजकल्याण आयुक्त बीड), मा. महालिंग निकाळजे (भा. बौ. महासभा. जिल्हाध्यक्ष (प),  मा. ना

सामाजिक चळवळीतील उमदे व्यक्तिमत्व

Image
आदरणीय श्री.तानाजी रंगनाथराव दौंडकर साहेब (उप.अधीक्षक) टी विभाग आपणास सर्वप्रथम सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा .... जीवन-प्रवासात अनेक क्षेत्रात सेवेत रुजू होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सेवानिवृत्ती ही ठरलेली असून ती अटळ आहे त्याला अपवाद ठरले ते केवळ राजकारण, राजकारणात सेवानिवृत्तीची वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.मृत्यूच्या शय्येवर असताना ज्योती बसू हे पश्चिम-बंगाल च्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते.असे केवळ राजकारणात शक्य होऊ शकते.असो जेंव्हा एखादी व्यक्ती सेवानिवृत्त होते तेंव्हा त्या व्यक्तींच्या डोळ्यासमोर येतो तो त्यांचा भूतकाळ त्यात प्रामुख्याने आपण नौकरीला कोणत्या सालात लागलो, सर्वात पहिले कोणत्या कार्यालयात प्रवेश केला आपले पहिले वरिष्ठ अधिकारी कोण होते तसेच आपले सहकारी कोण होते ही आठवणींची मालिका चालू होते या सर्व आठवणीत ज्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास दिलेला आहे असे आणि दुसरे जे आपल्याशी सहकार्याची भावना ठेउन सौजन्याने वागले ज्यांच्याशी आपले विचार जुळले त्या व्यक्ती कायम आपल्या स्मरणात राहतात.जी व्यक्ती या दोन्ही मध्य

"नमो विचार मंच" महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी चंदन पवार यांची निवड

Image
भाजपाचे चंदन पवार यांची नमो विचार मंच महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी, नमो विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रजापती आणि राष्ट्रीय मुख्य सचिव नरेंद्र पांचाळ यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात याची घोषणा केली आणि नियुक्तीपत्र देवून सार्थ निवड करण्यात आली आहे. सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या पवार यांना त्यांची कार्यशैली बघूनच जबाबदारी देण्यात आली अशी माहिती मंचचे राष्ट्रीय मुख्य सचिव पांचाल यांनी दिली आहे. पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नमो विचार मंचच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या सरकारी योजना आहेत, त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी नमो मंचच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे, जनतेला सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळावी आणि त्या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर व्हावी आणि त्या योजनांचा फायदा खरोखर गरीब, शोषित, वंचित आणि मध्यमवर्गीय लोकांना व्हावा याची जबाबदारी नमो विचार मंच घेणार आहे. सामाजिक संघटन असलेल्या नमो विचार मंचचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात असणार आहे, सर्व राज्यांमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या बनवण्याच

समाजसुधारक राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक विषमता नष्ट केली-नगरसेवक ॲड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी ) 26 जून संबंध मानवांच्या उद्धारासाठी व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी    सामाजिक विषमता नष्ट करून समताधिष्ठित समाज निर्माण केला असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी सेनेच्या विभागीय कार्यालयात  राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी अभिवादन पर उपस्थितांना संबोधित करताना केले  स्त्री, पुरुष समान आहेत म्हणून महिलांना सुद्धा अधिकार आहेत, व ते त्यांना मिळावे यासाठी शाहू महाराजांनी जनजागृती केली    प्रस्थापित कर्मठवाद्यांनी माणसा माणसात भेद निर्माण करत समाजात मानसिक गुलामी रुजवून अंधश्रद्धा, सामाजिक शोषण, भेदा-भेदीच्या द्वेषीय चक्रात बहुजनांना अडकवले यातून बहुजनांना मुक्त करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून महाराजांनी त्यांच्या संस्थानात सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले तसेच खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणासाठी शहरांमध्ये आल्यावर त्यांच्या वास्तव्याची सोय व्हावी यासाठी वस्तीग्रह बांधली   अस्पृश्यांना शासकीय सेवेत सामा

पावसाचे पाणी कंपनीत घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील मार्केट यार्ड रोडवरील रस्ता व नाल्या नसल्यामुळे पाटोद्यात झालेल्या जोरदार पावसामुळे संत मिराबाई ट्रेडिंग कंपनी मध्ये पाऊसाचे पाणी घुसल्याने वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान याबाबत सविस्तर वस्ती असे की पाटोदा नगरपंचायत अंतर्गत बाजार समिती मध्ये असलेल्या संत मीराबाई ट्रेडिंग कंपनी यामध्ये सोमवारी दिनांक 13/06/2024 रोजी झालेल्या जोरदार पाऊस झाल्याने कंपनीत पाणी घुसल्यामुळे लाख रुपयांचे नुकसान झाले.

रमाई घरकुल च्या फाईल वर सह्या करण्यास मुख्याधिकारी मॅडम यांची दिरंगाई-प्रणित सरवदे

Image
बीड(प्रतिनिधी )-बीड शहरातील रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पहिला हफ्ता, दुसरा हफ्ता, तिसरा हफ्ता असे तीन हफ्तात पैसे RTGS द्वारे दिले जात असतात परंतु फाईलच्या शेवटच्या टप्यात इंजिनियर देशमुख साहेब आणि मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांच्या सह्या प्रमुख असतात त्यामध्ये देशमुख साहेबांकडे पाटोदा चा पदभार असल्याने ते बीड ला येत नाहीत.फाईल वर सह्या करण्यास एक महिना लावतात 15 मिनिटाच्या कामाला एक एक महिना लावत असून लाभार्थी यांना नगरपालिकेला चकरा मारायला लावतात. अंधारे मॅडम तर चक्क ऑफिस लाच येत नाहीत त्यांच्या घरूनच कामकाज बघतात व फाईल वर सह्याचं करत नाहीत त्यांना कॉल केले तर कॉल पण उचलत नाहीत त्यासुद्धा फाईल वर सह्या करण्यास एक महिन्याच्या पुढे कालावधी लावत असून लाभार्थी त्यांना कंटाळून गेले आहेत.लवकरात लवकर लाभार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर सर्व लाभार्थी यांना सोबत घेऊन नागरपालिकेसमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रणित सरवदे यांनी दिला आहे

वृक्ष लागवड करून वैवाहिक जीवनाची सुरुवात

Image
सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे यांचा विवाह संपन्न        वृक्ष लागवड करून वैवाहिक जीवनाची सुरुवात  प्रतिनिधी वडवणी बीड ..  पुसरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते विष्णूबाळ झोडगे यांचा मंगल परीनय अगदी साध्या पद्धतीने मोजे "वारोळा ता माजलगाव येथे आयु साक्षी तुपारे यांच्याशी सामाजिक,राजकीय, संप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षातील नेतेमंडळी विविध संघटनेतील पदाधिकारी,डॉक्टर मित्रमंडळी सामाजिक कार्यकर्ते,युवक मित्रमंडळी उपस्थित होते विवाहानंतर वृक्ष लागवड करून वैवाहिक जीवनाची सुरुवात केल्याने.. सामाजिक संदेश देऊन विवाह पार पाडला. सामाजिक संदेशाने आणि सामाजिक उपक्रमाने केलेल्या या मंगल परीनयाचें सर्वत्र कौतुक केले जात आहे. साध्या पद्धतीने केलेल्या या मंगल परिणय मध्ये सामील झालेल्या सर्वांचे "झोडगे परिवाराच्या" वतीने आभार व्यक्त करण्यात आले.. !

माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरा

Image
वृक्षारोपण व किरणा साहित्याची वाटप  बीड प्रतिनिधी - चाळीस वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर माजी सैनिक प्रकाश वाघमारे निवृत्तीच्या नंतरही आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे.समाज हिताचे प्रश्न घेऊन वेळोवेळी आंदोलने, धरणे उपोषणे केली आहे. समाज हिताच्या चळवळीत साठी योगदान देत आहेत.त्यांनी देश सेवेनंतर समाजसेवेचे वृत्त हातीती घेतले आहे. समाजाप्रती आपण काही तरी चांगलं करायचं आहे ही भावना कायम. माजी सैनिका प्रकाश वाघमारे यांनी त्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केला .   वासनवाडी परिसरात असलेल्या रामगड येथील आदिवासी समीकरणे येथील अनाथ बालकासमवेत आपला वाढदिवस साजरा केला.अनाथ, निराधार, वंचित उपेक्षित मुला मुलींसाठी एक महिना पुरेल एवढे किराणा सामान त्यांनी यावेळी भेट दिली.सहकुटुंब सहभागी होऊन परिसरामध्ये वृक्षारोपणही केले. एक आगळावेगळा उपक्रम राबवला. यावेळी त्यांनी असे सांगितले की महापुरुषांचे अनुकरण करून मुलांनीही मोठे बनाव व जिल्ह्याचं व आदिवासी समीकरण गुरुकुल च नाव मोठं करावं तसेच यावेळी त्यांनी पालकांना व संचालकांना असेही ग्वाही दिली की वेळोवेळी जर कसल्

शासनाच्या जाचक अटीमुळे शहरी भागातील ऊसतोड मजुर पाल्य वसतिगृहात प्रवेशापासून वंचित

पाटोदा (प्रतिनिधी )ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी पाटोदा येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून या वस्तीग्रहात शासनाच्या जाचक अटीमुळे ऊस तोड मजूर पाल्य या वस्तीगृहात प्रवेशापासून वंचित असून पाटोदा व पाटोदा जवळील वाड्या वस्त्यातील ऊसतोड मजूर पाल्यांना या वस्तीग्रहात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी ऊस तोड मजुराकडुन होत आहे. पाटोदा शहर हद्दीत अनेक वाड्या व छोटी खेडी येतात परंतु शहर हद्दीचे कारण देत या ठिकाणच्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी या शासनाच्या वस्तीगृहात प्रवेशच मिळत नाही असा जावई शोध लावण्यात आला असून ऊसतोड कामगार वर्ग कोणत्याही गावातील असेल तरी देखील त्यांच्या मुलांना वस्तीगृहात प्रवेश मिळालाच पाहिजे अशी भूमिका शासनाची असणे गरजेचे असताना अशा प्रकारच्या नियमांच्या फेऱ्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे भवितव्य अंधकारमय होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.   बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून परिचित असुन ऊस तोडणीसाठी मजुर गेल्या नंतर त्यांचे पाल्य शिक्षणापासून वंचित रहात होते म्हणून महाराष्ट्र शासनाने ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वस्तिग्रह सुरू केले आहेत.पा

कंत्राटी सफाई कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच;जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष-गौतम आगळे

Image
परळी ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर मागील ०८ दिवसा पासून कंत्राटी सफाई कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष भाई राजेश कुमार खुशालराव जोगदंड कामगारां सहीत विविध मागण्यांसाठी धरणे धरून बसले आहेत. या धरणे आंदोलणाकडे जिल्हाधिकारी, बीड प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून उन,वारा आणि पाऊसातही कंत्राटी सफाई कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे कंत्राटी सफाई कामगार वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.      या बाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य केंद्रीय सतर्कता आयोग, भारत सरकार नवी दिल्ली द्वारा प्रमाणित राज्यव्यापी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या झुंजार नेतृत्वाखाली दिनांक १९ जून २०२४ पासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सफाई कामगार करत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचे सातव्या दिवशी स्पष्ट झाले. संघटनेतर्

असामान्य प्रतिभेचे न्यायिक समाजसुधारक,युगनायक राजर्षी शाहू महाराज

Image
.. हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या अठरा विश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या  मानवांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य सत्कारणी लावणारे    संबंध मानवांच्या उत्कर्षासाठी आपल्या जीवाचे रान बुद्ध,कबीर,शिव, फुले,शाहू,आंबेडकर या महामानवांनी केले म्हणून त्यांच्या कार्याचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो महामानवांच्या विचारांचा वारसा समाजातील प्रत्येक माता,भगिनीं बांधवाने जोपासत त्यांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे  म्हणून  सदरील लेख कारुण्याने ओतप्रोत भरलेले राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांना अभिवादन पर लिहीत आहे... एक व्यक्ती आपल्या उभ्या हयाती मध्ये काय काय करू शकतो याचे ज्वलंत आणि मूर्तीमंत उदाहरण परमपूज्य शाहू महाराज हे होय. शाहू महाराजांच्या जीवनातील समाजोद्धारक कार्याने प्रेरित होऊन हे धाष्ट मी करत आहे.  सर्वात प्रथम भगवान बुद्धांनी हे समाज उत्थनाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतलं. सामाजिक समता स्थापन करून मानवाला आपल्या कर्तव्याचा अंतर्भाव जाणून दिला. सामाजिक विषमता नष्ट करून समताधिष्ठित धर्माची स्थापना करून महिलांना सुद्धा अधिकार आहेत,