सामाजिक चळवळीतील उमदे व्यक्तिमत्व


आदरणीय श्री.तानाजी रंगनाथराव दौंडकर साहेब (उप.अधीक्षक) टी विभाग आपणास सर्वप्रथम सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा....
जीवन-प्रवासात अनेक क्षेत्रात सेवेत रुजू होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सेवानिवृत्ती ही ठरलेली असून ती अटळ आहे त्याला अपवाद ठरले ते केवळ राजकारण, राजकारणात सेवानिवृत्तीची वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.मृत्यूच्या शय्येवर असताना ज्योती बसू हे पश्चिम-बंगाल च्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते.असे केवळ राजकारणात शक्य होऊ शकते.असो
जेंव्हा एखादी व्यक्ती सेवानिवृत्त होते तेंव्हा त्या व्यक्तींच्या डोळ्यासमोर येतो तो त्यांचा भूतकाळ त्यात प्रामुख्याने आपण नौकरीला कोणत्या सालात लागलो, सर्वात पहिले कोणत्या कार्यालयात प्रवेश केला आपले पहिले वरिष्ठ अधिकारी कोण होते तसेच आपले सहकारी कोण होते ही आठवणींची मालिका चालू होते या सर्व आठवणीत ज्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास दिलेला आहे असे आणि दुसरे जे आपल्याशी सहकार्याची भावना ठेउन सौजन्याने वागले ज्यांच्याशी आपले विचार जुळले त्या व्यक्ती कायम आपल्या स्मरणात राहतात.जी व्यक्ती या दोन्ही मध्ये नसते ती व्यक्ती कायमची विस्मरणात जाते.
तानाजीराव यांची नाळ महाराष्ट्रातील ग्रामीण भागाशी जुळलेली असून यांचा जन्म दिनांक ०२.०६.१९६६ रोजी कनेरसर ता.खेड (राजगुरूनगर) जि. पुणे येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला.घरची परिस्थिती जेमतेम होती,लोक गरीबीचे किस्से सांगतात/ऐकतात पण तानाजीराव यांनी गरीबी काय असते ती प्रत्यक्षपणे पाहिली/अनुभवली आहे.शिक्षण शिकण्याची प्रचंड आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती कनेरसर येथे त्यांच्या मूळ गावी १ ते ७ वी पर्यंतचे शिक्षण आई-वडिलांना शेतीच्या व अन्य कामात मदत करीत पूर्ण केले.माध्यमिक व त्या पुढील शिक्षणासाठी १९७७ पासून १९९० पर्यंत पुणे येथील विद्यार्थी वस्तीगृहात राहून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत एम. कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.मितभाषी स्वभावाचे धनी असल्याकारणाने कॉलेज जीवनात अनेक जिवलग मित्र कमावले जे आजही त्यांच्या संपर्कात आहेत.जीवनाशी असलेला तानाजीराव यांचा संघर्ष  अधिक कठीण होण्या अगोदरच बृहन्मुंबई महानगपालिकेतील प्रमुख लेखापाल खात्यात दिनांक २२.०५.१९९० रोजी क.ले.प.व ले.स. कनिष्ठ लेखा परीक्षक (Jr. Auditor) खात्यात नौकरीला लागले. 
मुंबई मायानगरी त्यांच्यासाठी अगदी नवीन होती मुंबई सोबतच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर कार्यालयीन सहकारी यांच्याशी सुरवातीला जुळवून घेताना त्यांची तारेवरची कसरत होत असे.
कामाची प्रचंड आवड आणि कामावर असलेली सच्ची निष्ठा त्यांना अल्पावधीतच प्रमुख लेखापाल विभागात प्रसिद्धी मिळवून दिली.
त्यांच्या स्वभावाचे एक मुख्य वैशिष्ठ राहिलेलं आहे एखादा व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला की तो कायमचा त्यांचा होऊन जातो,असं अदभुत रसायन असलेलं तानाजीराव यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व राहिलेलं आहे.आपल्या जिद्द,चिकाटी,सचोटीच्या जोरावर कर निर्धारक व संकलक खात्यातील अंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण होऊन थेट विभाग निरीक्षक पदावर पदोन्नती मिळविली हा विभाग त्यांच्यासाठी अगदी नवीन होता पण काम शिकण्याची आवड असल्याकारणाने तेथेही अवघ्या काही दिवसात त्या विभागातील अधिकाऱ्यांचे आवडते आणि लाडके विभाग निरीक्षक बनले.
"आयुष्यात माणसांनी दोन पैसे कमी कमावले तरी चालतील पण माणसं लाख मोलाची कमावली पाहिजे" 
तानाजीराव यांनी त्यांच्या सेवनिवृत्तीचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात सहभागी असलेले तानाजीराव यांचे आप्तेष्ट व त्यांच्यावर प्रेम करणारे सहकारी व मित्र परिवार पाहून त्यांच्या प्रचंड मोठा असलेल्या जनसंपर्काचा प्रत्यय आला. 
त्याचबरोबर ऋणानुबंधातील जबाबदारीची जाणीव ठेवत आपल्या आई-वडिलांचा आदर्श पुत्र 
पत्नीचा आदर्श पती
पाल्यांचा आदर्श पिता 
या सर्व जबाबदाऱ्या लीलया पार पाडताना प्रत्येक भूमिकेला सारखा न्याय देणारा न्यायाधीश म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
तानाजीराव यांनी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाकडे अतिशय बारकाईने लक्ष देत त्यांचा जगाच्या शिक्षणाच्या स्पर्धेत निभाव लागावा यासाठी स्वतः अनेक कष्ट घेतले पण आपल्या पाल्यांना कधीच काही कमी पडू दिले नाही.आज त्यांची पाल्य त्यांच्या अपार कष्टाच्या जोरावर  स्वतःच्या पायावर उभी आहेत.याचे निर्विवाद श्रेय हे तानाजीराव यांचे आहे.सद्यस्थितीत दौंडकर जी कर निर्धारक व संकलक टी विभाग कार्यालयात उप अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. दिनांक ३०.०६.२०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ३४ वर्षाची प्रदीर्घ यशस्वी सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तानाजीराव यांच्या संपूर्ण सेवेत त्यांचे कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे,सौजण्याचे संबंध राहिले आहेत.
दौंडकर जी सेवनिवृत्तीच्या निमित्ताने आपणास 
गणेशाची सिद्धी
चाणक्याची बुद्धी
शारदेचे ज्ञान
कर्णाचे दान
भीष्माचे वचन
रामाची मर्यादा
हनुमंताची ताकत
कायम मिळत राहो व आपल्या उज्वल भविष्याच्या प्रगतीत संख्यात्मक व गुणात्मक वाढ होवो अशी सदिच्छा...

 शब्दांकन
 श्री.निलेश राजमल उपाध्ये

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !