डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने सोमवारी आष्टी तहसील कार्यालया समोर आराधखाना आंदोलन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने सोमवारी आष्टी तहसील कार्यालया समोर आराधखाना आंदोलन
  तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे-जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे
 आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
 आष्टी तालुक्यातील विविध घटकातील लाभार्थी संबंधित अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणांमुळे वंचीत राहिल्याने , 
डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी दिनांक २४ जून रोजी आष्टी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले होते  . 
  या  निवेदना मध्ये -- १)संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेतील दाखल प्रकरणे मंजुर करणे,२)वृध्द कलाकारांना पेन्शन मंजूर करणे. ३) शासकीय गायरान जमीनीवरील सध्या स्थितीतील जमीन क्षेत्रावरील पिकांची पाहणी गाव नं.१ ईला नोंदी घेण्यात याव्यात . ४) रमाई,शबरी,ठक्कर बाप्पा योजनेतील हाप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे. ५) शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे दाखले ३  दिवसांत देण्यात यावे  , आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले होते  . ३० जून पर्यंत वरिल सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती या निवेदनात केली होती  .
    जर वरील मागण्या पूर्ण केल्या नाही तर  , १ जूलै  २०२४ रोजी आष्टी तहसील कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने  आष्टी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना सोबत घेऊन आष्टीच्या तहसीलदारांना जाग आणण्यासाठी आराधखाना आंदोलन छेडले जाईल ,  असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला होता  .
 आष्टी तहसीलदार यांनी मागण्या पूर्ण न केल्यामुळे तहसील कार्यालया समोर आराधखाना आंदोलन जाहीर केले असून, आष्टी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यानी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे .
Comments
Post a Comment