शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा उपजिल्हाप्रमुख राजु महुवाले

बीड प्रतिनिधी :-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा ताई अंधारे यांच्या प्रतिमेचे काही समाजकंटकाने परळी येथे दहन करून त्यांची राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न केला अशा समाजकंटका वर गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात यावी नसता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल 
असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड शहर प्रमुख शेख निजाम यांनी दिला आहे 
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या उप नेत्या सुषमा ताई अंधारे ह्या परळी येथे असताना काही इलेक्ट्रोनिक मीडिया ने पुणे येथील ड्रग प्रकरण व जिल्ह्यातील विकासा बाबतीत त्यांची मुलाखत घेतली होती 
या मुलाखतीत सुषमा ताई अंधारे यांनी न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालून काही काही समाज विघातक लोकांनी त्यांच्या प्रतिमेचे दहन केले समाज कंटकाचे हे कृत्य म्हणजे शहरात दहशत माजवून अशांतता निर्माण करणे होय अशा कृत्यांना वेळीच पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !