परळी बस स्थानकात व बाहेर रिक्षा चालकांनी निर्लज्ज पणाचा गाठला कळस! मेन रोडवर अस्ताव्यस्त पार्किंग,

बसस्थानकातून रिक्षात भाडे भरणे चालू पोलीस प्रशासन व परिवहन अधिकारी अंध भूमिकेत!

परळी प्रतिनिधी - परळी शहरात वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यास बराच वेळ जातो, आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ भांडणे वाढतात, वाहन चालकांची चिडचिड वाढते, वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते. ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. दुचाकी स्वार हे भरधाव वेगात चालत असतात छोटे छोटे अपघात दररोज बसस्थानका समोर पहावयास मिळत आहेत 
दुचाकी स्वाराना गंभीर इजा होत असून भांडण तंटा हाणामारी यांचे प्रमाणात वाढ झाली असून या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?वाहतूक कोंडी का होते याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.जनमानसात असा समज असा आहे की रस्ते अरुंद, चौकात पोलिस उभे नसल्यास, वाहन चालकाच्या बेशिस्त वागणुकीने होते,मोठ्या,अवजड,माल-वाहतूक वाहना मुळे,बस,रिक्षा मुळे, फूटपाथ वाढविल्यास, गती रोधकांमुळे, फूटपाथ वरील अतिक्रमणाने बस थांब्यामुळे अडसर , फळा ची गाडे हॉटेल समोरील दुकाना समोरील वाहन पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होतअसून याकडे पोलीस प्रशासन ठोस भूमिका कधी घेणार आटो चे हप्ते घेत सोयीनुसार, हेतू पुरस्पर आणि अनावधानाने दुर्लक्ष करत आहेत की काय आणि जे सर्वात महत्वाचे आहे 
वाहतूक कोंडीस धुतरफा पार्किंग काडून घेणे,रोडवरील अतिक्रमण उठवणे, यावर प्रतिबंध कधी होणार परळी शहर पोलीस प्रशासन म्हणजे 
साप सोडून जमीन बडविणे!जिकडे आर्थिक फायदा तिथं दाखवतात कायदा,
अवैध खाजगी वाहनांना मोकळीक देणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे असे म्हणावं लागेल 

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !