शासनाच्या जाचक अटीमुळे शहरी भागातील ऊसतोड मजुर पाल्य वसतिगृहात प्रवेशापासून वंचित


पाटोदा (प्रतिनिधी )ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी पाटोदा येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून या वस्तीग्रहात शासनाच्या जाचक अटीमुळे ऊस तोड मजूर पाल्य या वस्तीगृहात प्रवेशापासून वंचित असून पाटोदा व पाटोदा जवळील वाड्या वस्त्यातील ऊसतोड मजूर पाल्यांना या वस्तीग्रहात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी ऊस तोड मजुराकडुन होत आहे. पाटोदा शहर हद्दीत अनेक वाड्या व छोटी खेडी येतात परंतु शहर हद्दीचे कारण देत या ठिकाणच्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी या शासनाच्या वस्तीगृहात प्रवेशच मिळत नाही असा जावई शोध लावण्यात आला असून ऊसतोड कामगार वर्ग कोणत्याही गावातील असेल तरी देखील त्यांच्या मुलांना वस्तीगृहात प्रवेश मिळालाच पाहिजे अशी भूमिका शासनाची असणे गरजेचे असताना अशा प्रकारच्या नियमांच्या फेऱ्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे भवितव्य अंधकारमय होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
  बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून परिचित असुन ऊस तोडणीसाठी मजुर गेल्या नंतर त्यांचे पाल्य शिक्षणापासून वंचित रहात होते म्हणून महाराष्ट्र शासनाने ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वस्तिग्रह सुरू केले आहेत.पाटोद्यातही ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी वसतिगृह सुरू झाले असुन या वसतिगृहात फक्त ग्रामीण भागातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांनाच प्रवेश देण्यात येत असुन पाटोदा व पाटोदा अंतर्गत वाड्या वस्त्या मधील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना मात्र या वसतिगृहात प्रवेश दिला जात नसल्यामुळे येथील ऊसतोड मजुर पाल्य प्रवेशापासुन वंचित रहात असुन शासनाने ही जाचक अट रद्द करून पाटोदा व वाड्या वस्त्या मधील ऊसतोड मजुर पाल्यांना वस्तिग्रहात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी ऊस तोड मजुराकडुन होत आहे. पाटोदा शहरांतर्गत अनेक वाड्या व वस्त्या आहेत यामध्ये बांगरवाडी, गीतेवाडी, गांधणवाडी,बेलेवाडी मंगेवाडी व बामदळेवाडी या वाड्यांसह ग्रामीण भाग येत आहे या ठिकाणचे अनेक मजूर राज्यात व राज्या बाहेर ऊस तोडणी साठी प्रत्येक वर्षी जातात त्यांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न अंधकारमय होत असून त्यांच्या पाल्यांना ते केवळ शहर हद्दीतील आहेत त्यामुळे वस्तीगृहात प्रवेश नाकारला जात आहे असे असेल तर हे वस्तीग्रह नेमके कशासाठी व कोणासाठी सुरू केले आहेत आणि शासन यावर खर्चाचे उदकारण का करत आहे असा सवाल देखील ऊसतोड मजूर वर्गातून केला जात आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !