असामान्य प्रतिभेचे न्यायिक समाजसुधारक,युगनायक राजर्षी शाहू महाराज

..

हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या अठरा विश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या 
मानवांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य सत्कारणी लावणारे 
  संबंध मानवांच्या उत्कर्षासाठी आपल्या जीवाचे रान बुद्ध,कबीर,शिव, फुले,शाहू,आंबेडकर या महामानवांनी केले म्हणून त्यांच्या कार्याचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो महामानवांच्या विचारांचा वारसा समाजातील प्रत्येक माता,भगिनीं बांधवाने जोपासत त्यांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे 
म्हणून 
सदरील लेख कारुण्याने ओतप्रोत भरलेले राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांना अभिवादन पर लिहीत आहे... एक व्यक्ती आपल्या उभ्या हयाती मध्ये काय काय करू शकतो याचे ज्वलंत आणि मूर्तीमंत उदाहरण परमपूज्य शाहू महाराज हे होय. शाहू महाराजांच्या जीवनातील समाजोद्धारक कार्याने प्रेरित होऊन हे धाष्ट मी करत आहे.
 सर्वात प्रथम भगवान बुद्धांनी हे समाज उत्थनाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतलं. सामाजिक समता स्थापन करून मानवाला आपल्या कर्तव्याचा अंतर्भाव जाणून दिला. सामाजिक विषमता नष्ट करून समताधिष्ठित धर्माची स्थापना करून महिलांना सुद्धा अधिकार आहेत, व ते त्यांना मिळावे यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आणि ते प्रयत्न यथाशक्ती सत्य झाले. महिलांना शिक्षण देऊन त्यांना भिक्खू संघात प्रवेश दिला. कालांतराने हीच इतिहासाची पुनरावृत्ती झाली.! चातुर्णीय व्यवस्थेने अस्पृश्य समाज व स्त्रियांना दयनीय केले, अशात महात्मा ज्योतिबा फुलेंनी बंड केला व अस्पृश्यांना व स्त्रियांना अधिकार मिळावे म्हणून मोठा लढा उभारला. अस्पृश्य व स्त्रियांना शिक्षणाचे द्वारे खुली करून दिली जीर्णमतवाद्यांना समतेची जाणीव करून दिली म्हणूनच त्यांना भारताचे मार्टिन ल्युथर म्हणून गौरीविण्यात येते.
 जुलमी पेशवाईच्या अंतामुळे शूद्राती शुद्राची सुटका झाली मात्र वर्णव्यवस्था व धार्मिक ग्रंथातून झाली नाही. ही खंत महात्मा फुलेंच्या मनात होती. आणि म्हणूनच ब्रिटिशांनी देशात धार्मिक सुधारणा करावी असं महात्मा फुलेंना वाटत होते. ब्रिटिश दरबारी त्यांनी याचा पाठपुरावाही केला, पण टिळक व त्यांच्या समर्थकांनी आक्रोश करत ब्रिटिशांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अस्पृश्यांसाठी धार्मिक सुधारणा करून काय होणार.? असा खडा सवाल विरोधकांनी विचारला.
 भारतात धार्मिक सुधारणांना पोषक होईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न छत्रपती शाहूंनी केला. त्यांनी सर्व सत्यशोधकांना सहभागी करून घेतले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रोत्साहित केले. याचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांनी बुद्ध, कबीर, शिव व फुले आणि शाहूंची विचारसरणी भारतीय संविधानात पेरली. भगवान बुद्धांच्या क्रांतिकारक समतावादी धर्माचा जाहीरनामा, महात्मा फुले यांच्या स्वप्नांची परिपूर्ती आणि राजर्षी शाहूंची कर्तबगारी या सर्वांचा परिपाक म्हणजे भारतीय संविधान होय.

 जन्म व दत्तक विधान आणि राज्यारोहण.


 छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला ते कागलचे जहांगीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे जेष्ठ चिरंजीव.
 वडील जयसिंगराव घाटगे आई राधाबाई साहेब आणि धाकटे बंधू पिराजीराव उर्फ बापूसाहेब घाटगे असा त्यांचा परिवार होता. घाटगे घराणे मूळचे राजस्थानचे राठोड घराणे, महाराष्ट्रातील पराक्रमांमुळे ते प्रसिद्धीस आले आणि तलवारीच्या बळावर जहांगीरदार झाले. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते करवीर संस्थानाधिपती चौथे शिवाजी राजे यांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यास वारस हवा म्हणून चौथ्या शिवाजी राजेंच्या पत्नी महाराणी आनंदीबाई साहेब, यांनी यशवंतरावांना दिनांक 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले. त्यावेळी त्यांचे वय अवघे 10 वर्षाचे होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी आईच्या मृत्यूमुळे आणि वयाच्या अकराव्या वर्षी वडिलांचे निधनाने पोरके झालेल्या यशवंतरावांना राणीसाहेबांनी ममत्वाच्या मायेचा आणि राज दरबारातील वैभवाचा ओलावा दिला.  
 सन 1 एप्रिल 1891 रोजी यशवंतरावांचा विवाह बडोद्याचे मे, गुनाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी झाला.
 या दांपत्यास चार आपत्य झाली (1) राजाराम महाराज (दुसरे) 1897 ते 1940, (2) राजकुमारी राधाबाई 1894 ते 1973, (3) राजकुमार शिवाजी (पाचवे) 1899 ते 1918, व (4) राजकुमारी आऊबाई अल्पकाळातच निधन.
 
 दिनांक 2 एप्रिल सन 1894 रोजी करवीर संस्थानात यशवंतरावांचा राज्यारोहण अर्थात राज्याभिषेक झाला. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज झाले. राजाच्या राज्याभिषेका प्रसंगी वैदिक मंत्र म्हणते वेळेस स्नानाची आवश्यकता असते. परंतु शूद्राला पौराणिक पद्धतीचा अनुग्रह करावयाचा असल्यामुळे मला स्नान करण्याची आवश्यकता नाही. असे उद्धट भिक्षुकाने खुद्द महाराजांना बजावल्यामुळे ते पुढे 1900 साली भिक्षुकशाही विरुद्ध बंड करण्यास उद्युक्त झाली.
 (संदर्भ डॉ, सरिता जांभुळे लिखित लोकराजे राजर्षी शाहू महाराज या पुस्तकातून पान क्रमांक 11) 

 प्रत्येक मानवाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. कोणी कृतीत दाखवतो तर कोणी दाखवत नाही. आणि जर दाखवला तर तो स्वभाव अहितकारक असतो आणि हा अहितकारक स्वभाव समाजाला व वेळप्रसंगी कुटुंबाला त्रस्त करून सोडतो. प,पू शाहू छत्रपतींच्या आठवणी व स्मृती पुस्तक रूपाने जेव्हा वाचतो तर त्या वेळेला हे जाणून येईल की ते एक कृतीशील समाज सुधारक होते.!


 प्रजाहीत-दक्षराजा.    

 शाहू महाराजांना जीर्णवाद्या बरोबरच ब्रिटिश सरकारचा देखील तिटकारा होता. जे हाल वर्ण व्यवस्थेत पतीत, शोषितांचे आहेत तेच हाल ब्रिटिश सरकार करत आहे, या शोषित, पीडित, पतीत, दलितांवर दुहेरी गुलामगिरी आहे. आणि यातून त्यांची मुक्तता करणे जरुरीचे आहे अशी भूमिका घेत. राज्याभिषेकानंतर म्हणजेच 2 एप्रिल 1894 रोजी कोल्हापूर येथील नवीन राजवाड्यात महाराजांनी पुढील जाहीरनामा काढला.
" आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानाचे हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी. अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास, आमच्या पदरचे सर्व लहान-थोर, जागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, व इनामदार आणि कामगार व व्यापारी आदी करून तमाम प्रजाजन शुद्ध अंतकरण्यातून मोठ्या राजनिष्ठेने आम्हास सहाय्य करतील, अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दीर्घकालापर्यंत चालवून सफल करावी अशी मी त्या जगनियंत्या परमात्म्याची एक भावे प्रार्थना करतो. "
 अवघ्या विसाव्या वर्षी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतलेल्या तरुण राजाच्या ठायी प्रजाहित दक्षतेचे समूळ व्यापक दृष्टिकोन म्हणजे त्यांच्या ठायी वसलेल्या जागृतीचे व नितांत समाजोद्धाराचे आणि नैसर्गिक प्रवृत्तीचे धोतक होय.!
 शोषित वंचित उपेक्षितांवर वर्ण व्यवस्था आणि पारतंत्र्याची दुहेरी गुलामगिरी पाहून. ते बेचैन होत. शाहू महाराजांना वर्णव्यवस्था आणि परक्यांची सत्ता नकोशी वाटू लागे. त्या काळात बरेच राजे महाराजे इंग्रजांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखीत, त्यांच्याप्रमाणे साहेबी पोशाख घालून हिंडत, गोऱ्या लोकांचे खेळ खेळत. पण शाहू महाराजांचं वागणं या उलट होतं. ते मराठमोळ्या शैलीत राहायचे जोर बैठका काढायचे. आखाडातील मल्लाबरोबर कुस्ती खेळत आणि आपल्या प्रजेबरोबर मराठमोळे गावठी खेळ खेळत. त्यात लाठीकाठी दांडपट्टा साठमारी आणि शिकारी हे त्यांचे आवडीचे छंद.! धनगर, रामोशी, भिल्ल, पारधी आणि वडार या जमातींबरोबर ते शिकार करीत.
 एके दिवशी महाराज राज्याभिषेकानंतर प्रथमच शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडले. मुख्य उद्देश हा की आपल्या प्रजेत मिसळून प्रत्येक गोष्टीची विचारणा करून त्यांचे दुःख जाणून घेण्याचा हेतू होता.
 जनतेशी गप्पा मारण्यात महाराज रंगून गेले तोवर भोजनाची वेळ झाली लोक पटापट उठू लागले महाराजांनी आदेश दिला आणि बजावलं की सर्वांनी पंक्तीत बसायचं आणि जेवण करूनच जायचं सर्वांनी महाराजांचा आदेश पाळला.
 जेवण करून महाराज तृप्त झाले आणि वामकुक्षकी घेण्यास डेऱ्यात न जाता मैदानात येरझारा घालीत हिंडत राहिले. त्यांनी तेथील कारभाऱ्यास बोलावून विचारले की आजच्या जेवणाची शिदासामग्री, कुठून आणली.? 
 त्यावर कारभारी म्हणाला महाराज मामलेदारांनी आणून दिली.! 
 महाराज कडाडले मामलेदारांना हजर करा म्हणाले.!
 असे म्हणतात मामलेदार हजर झाले. मामलेदार महाराजांना म्हणाले हुजूर,, पाटील आणि पोलिसांनी अशा स्वर्यांसाठी शिधा सामग्री गोळा करून आणतात. महाराज म्हणाले कोठून आणतात?
 मामलेदार, आजूबाजूच्या गावातील जनतेकडून.!
 महाराज, पैसे देऊन आणतात की मोफत.?
 मामलेदार चाचरला आणि म्हणाला की हुजूर मोफत.
 महाराजांना दुःख झाले आधीच दुहेरी शोषण आणि त्यात प्रजे बरोबर असा अन्याय. महाराजांनी मामलेदाराकडे पैशाची मोठी थैली फेकली आणि म्हणाले जिथून तिथून ही शिधा सामग्री आणली असेल तिथे तिथे जाऊन त्यांचे पैसे ताबडतोब पोचत करा.!
 राजवाड्यात येताच महाराजांनी 14 एप्रिल 1894 रोजी वटहुकूम काढला. सर्व अंमलदार लोकांना हुकूम कळविला तो वटहुकूम पुढीलप्रमाणे :- "महाराजांची स्वारी असो वा सरकारी अमलदारांची फेरी असो.. त्यांनी आपापली शिधा सामग्री शक्यतोवर बरोबर न्यावी. ज्या गोष्टी विकत घ्यायच्या असतील त्या बाजारात रोख पैसे देऊन घ्याव्यात. प्रजेचा गवत लाकूड फाटा सुद्धा फुकट घेऊ नये. कोणत्याही अंमलदाराने पोलिसांमार्फत या वस्तू गोळा करू नयेत. प्रजेकडून कोणतेही वस्तू विकत घेतलीच पाहिजे व त्या वस्तूची किंमत ताबडतोब रोख दिली पाहिजे.."
 असे त्या वटहुकूमात होते. 
 अवघ्या बारा दिवसात सिंहासनावर अरुड झाल्यानंतर निस्पृह न्यायदानाचे कार्य करून शाहू महाराज प्रजेचे प्रजाहित दक्ष हृदयसम्राट राजे झाले. 

 मी तुमच्यातलाच एक..

 प,पू शाहू महाराजांच्या ठायी मी राजा असा अहंभाव कधीच नव्हता. मी तुमच्यातलाच एक अशी त्यांची धारणा होती.!
 सन 27 डिसेंबर 1917 साली खामगाव येथे मराठा विद्यार्थ्यांकडून मराठा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते शाहू महाराज अध्यक्ष या नात्याने शाहू महाराज म्हणले की 
" मी येथे महाराज म्हणून आलो नाही.. तर एक साधारण मराठा गृहस्थ म्हणून आलो आहे". या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की " तुम्ही मला शिपाई म्हणा, शेतकरी म्हणा, अगर असेलच दुसरे काहीही नाव द्या. शिपाई, शेतकरी किंवा मजूर म्हणून घेण्याचा मला अभिमान वाटतो.. राजे होण्यापूर्वी माझे वडील शेतकरीच होते. माझ्या जनक आईचे मुधोळच्या घोरपड्यांचे घराणे, माझ्या दत्तक आईचे शिर्के घराणे, आणि माझ्या वडिलांचे भोसले घराणे हे सर्व शेतकरी वर्गापैकीच होते. " 
 या अध्यक्षस्थानी भाषणातून हे केलेले भाषण म्हणजे मानव्याला गवसणी घालणार होत. पुढे याच भाषणात शाहू छत्रपती म्हणतात. " कनिष्ठ आणि अज्ञान वर्गाशी तुम्ही मिसळून जाऊ नका, असं मला पुष्कळानी उपदेश केला परंतु मी ज्या मजूर वर्गातून जन्मलो आहे. त्यांच्याविषयीचे प्रेम माझ्यात मूळचेच असून शिपाई आणि शेतकरी यांचे रक्त माझ्या धामन्यातून वाहत आहे." 
' मी राजा ' आहे मी श्रेष्ठ आहे असा प्रजाजणांना सांगणारे ते नव्हते. प्रसंग पडला तर कोणतेही काम करण्याची माणसाची इच्छा असली पाहिजे असे शाहू महाराजांना वाटत होते. हा राजा मुलखावेगळाच म्हणावा लागेल.! 
 शाहू महाराजांनी आपल्या प्रजेची अहर्निश काळजी वाहिली. विशेषतः दिनदुबळे, वंचित, शोषितांना आधार दिला. त्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण केली हे लोक-कल्याणकारी राजाचे व त्यांच्या व्यक्तित्वाच्या सर्व व्यवछेदक लक्षणे, राजर्षी शाहूंच्या ठायी वसलेले होते.


 छत्रपती शाहूंची शैक्षणिक क्रांती...


 अस्पृश्यांना आणि स्त्रियांना ज्ञानामृत पाजणाऱ्या फुले दांपत्यांनी स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या मागासलेपणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलं. आणि हा उपेक्षित समुदाय शिकू लागला. शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा काळ एकच, दोघेही समवयस्क. शाहू महाराज महात्मा फुलेंपासून प्रेरित झाले आणि आपली प्रजा शिकावी असा आदेश दिला. त्यांचा हा नुसता ध्यासच नव्हता तर अट्टाहास होता.! विविध प्रकारचे वस्तीगृहे, शाळा उभारल्या. फुले दांपत्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची शेती पेरण्यास शाहू महाराजांनी सुरुवात केली ती आपल्या कोल्हापूर संस्थानातून. 
 अस्पृश्यांना त्यांच्या हिताची जाणीव करून दिली. "कष्टकऱ्यांच्या हातात शिक्षणाचं खुरप दिलं तर ज्ञानाची शेती भरल्याशिवाय राहणार नाही" असे छत्रपती शाहूंना वाटत होते. ते सत्य झाले जेव्हा त्यांचे प्रजा शिकू लागली.
 सामाजिक नैतिकता कशात आहे हे शाहू महाराजांना माहीत होतं. आपल्या प्रजेची नाडी त्यांनी हाताशी धरली होती. ते म्हणतात "माझी प्रजा नुसत्या प्राथमिक शिक्षणाने जरी विभूषित झाली तर तिच्या स्वाधीन संपूर्ण राज्य करेल."! राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शिक्षण विषयक चळवळ तीन तत्त्वांवर अधिष्ठित होती. (1) शिक्षण विषयक सोयी सवलती, शिक्षण संस्थांची निर्मिती, शिक्षण संस्थांना मदत, शिक्षण विषयक निरनिराळ्या उपक्रमांचे संयोजन इ, उपलब्ध करून देणे. 
(2) विविध जाती जमातीसाठी विद्यार्थी वस्तीगृहांची सोय करून, शिक्षणाच्या प्राप्तीचा मार्ग सुखकर करणे. वसतिगृहयुक्त शिक्षणाच्या प्राप्तीचा मार्ग सुखकर करणे, वसतिगृहयुक्त शिक्षणाला उत्तेजन देऊन जातीभेदा सारखी कोलिष्टके झाडून काढणे.
(3) सामान्य माणसांच्या मनामध्ये शिक्षण विषयक अभूतपूर्व लालसा निर्माण करून, त्यांच्या अनेकविध मागासलेपणाला सुरुंग लावणे. या तीन तत्त्वांवर राजर्षी शाहूंचे शैक्षणिक विचार अधिष्ठित होते. 
( संदर्भ :- डॉ, सरिता जांभुळे लिखित लोकराजे राजर्षी शाहू महाराज या पुस्तकातून पा, क्र 24 ) 
 छत्रपती शाहू महाराजांच्या मनात फुलणारे स्वप्न म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या परंपरेचा दीपस्तंभ वारसा होय. शाहू महाराज म्हणायचे- " सर्वसाधारण समाजात शिक्षण नाही म्हणून मागासलेपण अमाप आहे, तेव्हा ते नाहीसे करावयाचे असेल तर शिक्षणाची गंगा सामान्य माणसाच्या कवाडापर्यंत नेली पाहिजे. " 
 पण केवळ शिक्षण दिले की झाले काम संपले असे नव्हे तर शिक्षण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या सर्वसाधारण समाजाच्या मनामध्ये, शिक्षणासंबंधी आस्था रुजविणे, शिक्षणासंबंधी अभिरुची निर्माण करणे आणि शिक्षण ही अवघ्या परिवर्तनाची गंगोत्री आहे याचे भान कळविणे. हे महत्त्वाचे आहे. असे शाहू महाराजांचे मत होते. शाहू महाराजांच्या मनात शिक्षण विषयक एवढी व्यापक भूमिका होती. आणि ही भूमिका सर्वांगाने त्यांच्या प्रजेने स्वीकारली. त्यांनी महात्मा फुले यांचा वारसा समर्थपणे पुढे नेला.


 प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत..


 आपल्या रयतेमध्ये थोडेच पण अगदी निर्णायक लोक सुशिक्षित आहेत. मग थोडेसे लोक सुशिक्षित होण्यापेक्षा संपूर्ण रयतेला प्राथमिक शिक्षणाचा थोडा बहुत अंश मिळाला पाहिजे असे शाहू महाराजांच्या मनात आले. संपूर्ण प्रजा विद्या संपन्न व्हावी म्हणून ते अहोरात्र झटले आणि प्रजेस शिक्षण मिळवून दिले, सप्टेंबर 1916 मध्ये शाहू महाराजांनी राज्यात सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. 
 या शिक्षण कायद्यात सात ते चौदा वर्ष वयाची मुले-मुली ग्राह्य धरण्यात आली. 1919 साली ही वयोमर्यादा 12 वर्षाची ठरविली गेली. सक्तीच्या शिक्षणास योग्य असणाऱ्या मुला मुलींची यादी किंवा तिची एक प्रत प्रमुख स्थळे लावावी असा आदेश दिला. 
 राजर्षींनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचा कायदा केल्यानंतर एक फर्मान काढला त्यात ते म्हणतात- " शिक्षणास योग्य वयाच्या मुलांची यादी प्रसिद्ध झाल्यापासून, 30 दिवसाच्या आत मुलाच्या आई-वडिलांनी आपापली मुले शाळेत पाठवावीत. अशा यादीविरुद्ध कोणास अपील करावयाचे असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत करावे. ती मुले तीस दिवसात जर शाळेत आली नाही तर अशा मुलांची नावे व त्यांच्या पालकांची नावे त्या शाळेच्या हेडमास्तरांनी मामलेदार यांना कळवावीत. मामलेदाराने पालकांना अशा मुलांचे समन्स काढावे., त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून संयुक्तिक न दिल्यास प्रत्येक मुलाबद्दल एक रुपया दंड करावा. हा दंड मुले शाळेत येईपर्यंत प्रत्येक महिन्यास करावा." 
 पुढे शाहू महाराजांचा हाच ध्यास बाबासाहेबांनी घटनेत उतरविला आणि सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले आणि नवा आयाम दिला. 


 स्त्री शिक्षणाची सुरुवात :- 


फोल कल्पने मुळे व दांभिक कृतीतून स्त्रियांना दास्यत्व पत्करावा लागलं. कठोर ग्रंथात दिलेले नियम स्त्रियांना पाळावे लागले व त्या गुलामीत पडल्या. स्त्रियांचे समूळ जीवन दयनीय झाले. या सर्व चालीरीती ईश्वराद्वारे आहेत व हीच पतीची इच्छा मानून त्यांनी सर्वप्रथा स्वीकार केल्या. या सर्व प्रथातुन त्या मुक्त झाल्या जेव्हा समताधिष्ठ संविधान लागू झाले. सती प्रथा आणि शिक्षण बंदी यावर महात्मा फुलेंनी आसूड उगारलं. आणि स्त्रीमुक्तीची सुरुवात केली. त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं आणि निर्भयी बनवलं.
 सुशिक्षित स्त्री मुलांवर उत्तम संस्कार करू शकते व शिक्षणामुळे स्त्री निर्भयी, संयमी व कृत्ववान बनू शकते असे शाहू महाराजांचे मत होते. स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहिजे असा आदेश देते त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्या घरातूनच सुरू केली. त्यांच्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब तरुण वयातच विधवा झाल्या. त्यांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे म्हणून महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची खास सोय केली. महाराजांचे कार्य सर्वसमावेशक व सर्वव्यापी होते त्यामुळे मुला-मुलींसाठी त्यांनी एकत्र शाळा काढल्या व समाजातील एकूण एक व्यक्ती शिकावा यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. 
 स्त्रीविषयक शाहू महाराजांचा दृष्टिकोन अत्यंत सहानुभूतीचा व परखड होता. ते म्हणायचे की "विधवांनी अपमानाचे जीवन जगण्यापेक्षा उत्तम शिक्षण घेऊन ताठ मानेने जगावे." अस्पृश्य समाजातील महार, मांग, चांभार, भंगी व ढोर या समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क होस्टेल" हे वसतिगृह सुरू केले. व सर्व खर्चाचा वाटा महाराजांनी स्वतः उचलला.!
 मुलींमध्ये शिक्षणाची अभूतपूर्व लालसा निर्माण व्हावी, व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाहू महाराजांनी " श्रीमती अक्कासाहेब महाराज कॉलरशिप " व "श्रीमती नंदकुवर महाराणी भवनगर स्कॉलरशिप" अशा दोन शिष्यवर्ती योजना सुरू केल्या. महाराजांच्या काळात जीर्णवाद्यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ 'चूल आणि मूल' या पुरताच मर्यादित होता. स्त्री ही उपभोगाची वस्तू आणि पुरुषाची दासी आहे तिला शिक्षण देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देणे होय. व तिचे स्वातंत्र्य अस्तित्व नाही म्हणून स्त्री शिक्षण हे आपल्या संस्कृती विरुद्ध आहे. असे अनेक जणांनी महाराजांना सांगितलं.! हा सर्व विरोध झुगारून शाहू महाराजांनी एकाधिकार शिक्षणाचा बडगा मोडला, व समान शिक्षण देण्याचा आदेश दिला. महाराजांनी केवळ शिक्षणच नव्हे तर संस्कारक्षम स्त्रिया घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब यांना वैद्यव्यानंतर खडतर विरोध जुगारून शिक्षण देण्याचा प्रयोग केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरचे शिक्षण खाते राणीसाहेबांकडे देण्याचा राजर्षी चा मानस होता. परंतु त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते साध्य होऊ शकले नाही.
 महाराजांनी दोन स्कॉलरशिप योजना सुरू केल्यानंतर त्यासंबंधी ठराव मांडला त्यात ते म्हणतात:- " कोल्हापूर शहर व बावडा इन्फंट्री या शाळेतील मुलींच्या मराठी चौथी इयत्तेची वार्षिक परीक्षा घेतल्या वेळी त्यात सर्वात वर येणाऱ्या दोन मुलींना पहिल्या नावाच्या दोन स्कॉलरशिप प्रत्येकी रुपये 40 आणि शहर सोडून इलाख्याच्या मुलीच्या वार्षिक परीक्षेत ज्या तीन मुली सर्वात अधिक योग्य आढळतील त्यास दुसऱ्या नावाच्या तीन स्कॉलरशिपा देण्यात येतील. उत्तम वर्तनाबद्दल प्रत्येकी 40 रुपयांचे बक्षीस. अशा मुली जर संस्थानात आढळल्या नाही तर संस्थांना बाहेरच्या अस्पृश्य मुलींना त्या द्याव्यात" असेही महाराजांनी त्या हुकमात ठराव मांडला.    
 शाहू महाराजांच्या या क्रांतीकारक कार्यामुळे त्यांच्या अज्ञानी प्रजेला शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. या कार्यात अस्पृश्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावा लागत असे. त्यात एकत्र वर्गात बसण्याची बंदी, दूर बसा, शिकू नका असेच शब्द त्यांच्या कानावर पडत असे. 
 महाराजांनी मुलींच्या शाळा काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात ते अपयशी ठरले कर्मठांच्या प्रचंड विरोधामुळे ते शक्य झालं नाही.! लहानपणापासूनच आई-वडील आपल्या पाल्यांना व्यवसाय कामात गुंतवून ठेवत व त्यांना आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवण्याची इच्छा होत नसे, हे सार चित्र पाहता महाराजांनी एक वटहुकूम काढला. त्यात ते म्हणतात.:- " जे आपल्या मुला मुलींना शाळेत पाठविणार नाही तर त्यांच्यावर दंड ठोकवला जाईल." महाराजांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी कितीतरी वटहुकूम काढले. असाच एकवट हुकूम 1917 साली काढला तो हुकूम होता विधवांसाठी, स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न दूरच होता पण समाजात स्त्रियांची दुरावस्था पाहून महाराजांसमोर ही चिंतेची बाब होती. त्याकाळी बाल विधवा, बालविवाह असे प्रकार सुरू होते. विधवांच्या पुनर्विवाहास बंदी होती, कर्मकांड व्रतवैकल्ल्याने ग्रासलेल्या, आणि जोगतीन मुरळी अशा थोतांड प्रथेला बळी पडलेल्या स्त्रियांच्या सामाजिक प्रश्न महाराजांना अस्वस्थ करत होते. स्त्रियांना या जाचक प्रथेतून मुक्त करण्यासाठी महाराजांची तळमळ होती त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सन 1917 साली विधवा पुनर्विवाह कायदा केला. या कायद्यानुसार पुनर्विवाह कायदेशीर ठरला पुढे पुनर्विवाह विधीपूर्वक करण्याची योजना देखील केली. या कायद्यामुळे दुर्दैवी स्त्रियांना माणुसकीचे हक्क मिळाले व विधवांना पुन्हा विवाह करण्यास कायद्याचे बळ मिळाले. स्त्री विषयक एवढी संवेदनशीलता महाराजांची होती. शिवरायांच्या उज्वल परंपरेला गती देणारे शाहू महाराज कुलदीपक होते.!


 असंख्य वस्तीगृहांची स्थापना.


 बहुजन समाज साक्षर करण्यासाठी जे प्रयत्न महात्मा फुलेंनी केले ते प्रयत्न आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाहू महाराजांनी कोल्हापूर नजीक चार-पाच मैलावर सोनतळी कॅम्प या ठिकाणी खास आश्रम काढला. तो पुढे सोनतळी आश्रम या नावाने ओळखला जाऊ लागला. या आश्रमात महाराजांनी अठरापगड जातींची मुलं मुली आणून घातली., 1900 साली वर्षा अखेर या आश्रमात आश्रमवासीयांची संख्या 265 होती, विद्याजर्नासाठी लागणारे अन्न, वस्त्र व इतर सर्व बाबींचा खर्च महाराज स्वतःच्या खाजगी खर्चातून करीत असत. सप्टेंबर सन 1901 साली महाराजांनी मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले. त्यावेळी भारताच्या सम्राज्ञी "व्हिक्टोरिया" होत्या. महाराजांनी त्या वसतिगृहाला "व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग" असे नाव दिले. सप्टेंबर 1908 मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर जॉन क्लार्क यांची कुमारी वोयोलेट क्लार्क यांच्या स्मरणार्थ मिस क्लार्क होस्टेल हे वसतिगृह सुरू केले. ते महार मांग चांभार ढोर व भंगी समाजाच्या मुलींसाठी काढले होते. 1914 साली याच इमारतीस जोडून दुसरी प्रशस्त इमारत बांधली गेली. या इमारतीचा मोठा खर्च महाराजांनी स्वतः उचलला यात 30 विद्यार्थ्यांची सोय होती. 
 विविध जमातीचे विद्यार्थी एकामेकात मिसळत नव्हते म्हणून., विद्यार्थ्यांची जातीवाचक वसतिगृहे नाईलाजाने महाराजांना काढावी लागली. कोल्हापूर संस्थानात 26 आणि पुणे, अहमदनगर, नाशिक व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी 6 अशी 32 वसतिगृहे काढून महाराजांनी प्रत्येक वसतिगृहास आर्थिक सहाय्य केले. 
 याशिवाय महाराजांनी अनेक वसतिगृहांची स्थापना केली. त्यात दिगंबर जैन बोर्डिंग, वीर शैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, श्रीमती सारस्वत गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी बोर्डिंग, इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल, रावबहादुर सबनीस प्रभू आर्य समाज गुरुकुल, श्री शिवाजी वैदिक विद्यालय बोर्डिंग, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, सुतार बोर्डिंग, श्री देवांग बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह व सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग. इत्यादी वसतिगृहे स्थापन करून, त्याला आर्थिक मदत करून दीनदुबळे, शोषित, अस्पृश्य विद्यार्थ्यांचे जीवन उज्वल केले.
 शाहू महाराजांनी काढलेल्या या वसतीगृहात मध्यप्रदेश, गुजरात व कर्नाटकातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य कीर्तीसंपन्न करून गेले व महाराजांचा कीर्तीध्वज उंचावला.!
 सर्व जाती-धर्माच्या मुला मुलींनी एकत्र राहून शिकावे ही महाराजांची इच्छा होती. तथापि त्यांनी याबाबत अनेक प्रयास देखील केले, पण ते सर्व ते सर्व प्रयास अयशस्वी ठरले. कारण लोकांच्या ठिकाणी जबरदस्त जातीभेदाच्या भावना तरत होत्या.
 परमपूज्य शाहू महाराजांनी सर्व जातीच्या वस्तीगृहांना जागा मिळवून दिली पैशांच मोठे अर्थसहाय्य केले. कोल्हापुरात मुस्लिम समाजाच्या मुलांसाठी स्वातंत्र्य असे वसतिगृह नव्हते. महाराजांनी 15 मुस्लिम विद्यार्थ्यांना मराठा वस्तीगृहात शिक्षण घेण्यासाठी ठेवले. मुसलमानांचे स्वतंत्र वसतिगृह झाल्याखेरीज मुले वाढणार नाहीत म्हणून त्यांचे स्वतंत्र वसतिगृह स्थापण्यासाठी महाराजांनी स्वतः पुढाकार घेतला. आणि जमीन दिली, नेहमीप्रमाणे त्यांनी या वसतिगृहाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला, शाहू महाराजांच्या अशा उदार धोरणामुळे कोल्हापूर शहर विद्येचे माहेरघर बनले. 
 कोल्हापूरच्या संस्थानात अस्पृश्यांसाठी होणारा अमाप खर्च पाहून बडोद्याचा एक मराठा सरदार महाराजांना म्हणाला......, " महाराज आपला मराठा समाज किती मोठा.! त्यावर खर्च करायचे सोडून अस्पृश्यांसाठी एवढा खर्च का सोसता.? आपल्या समाजाचे कल्याण प्रथम करा हुजूर.! हे कार्य आयुष्यभर केले तरी संपणार नाही.!" त्या सरदाराचा प्रश्न ऐकून महाराज तडकन म्हणाले. " मी जर असा विचार केला तर माझे लोक मला फक्त मराठ्यांचा राजा म्हणतील कोल्हापूरचा राजा म्हणणार नाहीत.!"
 जातीभेदाचे बंधन जुगारून, हे विश्वची माझे घरं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी अविरत कार्य केले.
( संदर्भ डॉ. सरिता जांभळे लिखित लोक राजे राजर्षी शाहू महाराज या पुस्तकातून, पान क्रमांक 31/32 ).   


शिवछत्रपतींच्या उज्वल परंपरेला गती देणारा कुलभूषण राणा...


 जो कोणी शेतकऱ्यांच्या शेतीतील मिरचीच्या रोपट्याला बहरलेल्या मिरचीच्या देठालाही धक्का लावेल त्यास उचित शिक्षा दिली जाईल अथवा शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्यास दंड ठोकावला जाईल अशी शेतकऱ्या बद्दल आपल्या मनात आस्था असणाऱ्या शिवरायांचा वारसा शाहू महाराजांनी समर्थपणे पुढे नेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती बद्दल अनेक नियोजन व कायदे आपल्या स्वराज्यात केले होते. त्यातीलच एक म्हणजे 'शेततळे' हे होय.!
 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 'शेत तळे' बांधून जलसाठा जतन करावा ही शिवाजी महाराजांची नीती होती, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी सवलती देखील दिल्या. जसं की कमी किमतीत अवजारे खरेदी, शेतीला पूरक बियाणे व स्वस्त धान्य इत्यादी. कुळवाडी भूषण शिवछत्रपतींच्या या उज्वल परंपरेला शाहू महाराजांनी अधिक गती दिली. शेतकऱ्याला शेततळे बांधणीसाठी व बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत केली. शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची संकल्पना करून ती अद्यावत सत्य केली. शेती अवजारे शेतकऱ्यांना स्वस्त सवलती मध्ये देण्याचा निर्णय घेतला, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी स्वातंत्र्य बाजार (मंडईची) स्थापना देखील केली.! 
 दिनांक 18 मे सन 1920 रोजी श्री राजाराम इंडस्ट्रियल स्कूल बोर्डिंग हाऊसचे उद्घाटनाप्रसंगी, शाहू महाराज म्हणाले 'जे देशाचे कल्याण करतात त्यांनी आधी आपल्या शेतीच्या सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे ते जरुरीचे आहे...'
 शेतीचा विकास कसा करावा या विषयावर शाहू महाराजांनी आठ नोव्हेंबरच्या नरेंद्र मंडळाच्या परिषदेत आपले टिपण वाचून दाखविले. त्यात ते म्हणतात :- " मला सांगावयास आनंद होतो की इंग्लंडमधील कारखान्यांना कच्चामाल पुरविणे एवढीच हिंदी सरकारची इच्छा नाही तर हिंदी शेतकीची उन्नती व्हावी. व हिंदी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी याकडे सरकार लक्ष पुरविणार आहे. भारताची 80 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. " शाहू महाराजांच्या मनात शेती विषयक व शेतकऱ्या बद्दल नितांत आस्था होती. शिवरायांचे स्वराज्य त्यांनी सुराज्य केलं, असंच म्हणावा लागेल. शाहू महाराज दिवस-रात्र प्रजेला सुखात ठेवण्याच्या विचारात असायचे. प्रजेसाठी रात्रंदिन त्यांच्या कल्याणाचे काम कराचे. यात त्यांना विश्रांती मिळत नव्हती रात्रंदिवस प्रजेच्या प्रगतीची वा कल्याणाची धुरा उचलणाऱ्या अशा जगावेगळ्या राजाला विश्रांतीचा विचार कुठून सुचणार.!
 शाहू महाराजांनी शेतकऱ्याबद्दल अहर्निश चिंता वाहिली. ज्याप्रमाणे त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था होती त्याचप्रमाणे त्यांना भूमीबद्दल निष्ठा होती. शाहू महाराज भूमी बद्दल कर्तव्यनिष्ठ होते त्यांची निष्ठा अटळ होती. व भूमीबद्दलचे नाते अतूट होते. या भूमीशी आपल्या नात्याबद्दल सांगताना ते म्हणतात:- 
" उघड्यावरची जमीन सोडून बंदिस्त खोलीतील पलंगावर मी झोपू लागलो तर लगेच आजारी पडतो.. उघड्यावर खाली झोपलो तर मात्र खडबडीत बरा होतो.. अरे बाबा राजा आणि रंकालाही खरा आधार असतो तो या मातीचाच.! आपण सर्वजण मातीच्या आधारानेच वाढतो आणि शेवटी या मातीच्याच आश्रयाला जातो. मी या सत्याने भान सदैव बाळगतो. यामुळे मी कितीही उच्च पदावर असलो तरी मातीची ही ओढ मला सुटत नाही आता मला मातीची इतकी सवय झालेली आहे, की तिच्यापासून अलग होणे मला कदापि शक्य होणार नाही.!"


 विंटाळाला स्थान नाही...


 अस्पृश्यांबद्दल घृणता काही कर्मठ निर्बुद्धी लोकांना वाटायची. त्या घृणतेने विशिष्ट स्वरूप धारण केले ते विटाळ या रूपाने. ही अस्पृश्यांबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी शाहू महाराजांनी एक वटहुकूम काढला. तो वटहुकूम होता "माझ्या राज्यात विटाळला अजिबात स्थान नाही.!"   
 हे बोल ऐकताच काही कर्मठांनी चुळबुळ केली, धर्म बुडाला... धर्म बुडाला अशी ओरड केली. अस्पृश्यांबरोबर आम्ही मांडीला-मांडी आणि ताटाला-ताट लावून बसणार नाहीत असा विरोध केला.
 शाहू राजांनी या कर्मठवाद्यांना व जनतेला उद्देशून एक आज्ञापत्र काढले. त्या आज्ञापत्रात शाहू महाराज लिहितात :- " सर्व सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, रेस्ट हाऊसेस, सरकारी अन्नछत्र व सरकारी दप्तर वगैरे ठिकाणी व नदीचे पानवटे, सार्वजनिक विहिरी येथे कोणत्याही प्रकारे विंटाळ मानता कामा नये... तसे न झाल्यास गाव कामगार, पाटील, तलाठी यांना जोखीमदार धरले जाईल. " ही राजाज्ञा ऐकून कर्मठांची बोबडीच वळाली सर्व अंमलदार, मामलेदार, पोलिसांपर्यंत ही आज्ञा पोहोचवली. शाहू महाराजांच्या दरबारातील काम करणाऱ्या नोकरांना ही गोष्ट पटली नाही. आपल्या धर्माप्रमाणे आपण वागत नाहीत अशी विचारणा ते शाहू महाराजांना करीत,, सर्वांचे सर्व म्हणणे ऐकले आणि महाराजांनी एक फर्मान काढला... " ज्या कोणा अधिकाऱ्याला अस्पृश्यांना समानतेने व प्रेमाने वागविण्याची इच्छा नसेल, त्याने हा हुकूम पोहोचल्यापासून सहा आठवड्याच्या आत नोटीस देऊन राजीनामा द्यावा, मात्र त्यास पेन्शन मिळणार नाही. " 
 हा फर्मान ऐकल्यानंतर सर्व अधिकारी नोकरांनी एकच चुळबूळ केली. त्यांना उद्देशून महाराज म्हणाले की सर्व लोकांनी सर्व जाती धर्मातील लोकांशी आत्मीयतेने व समतेने वागावे. हाच धर्म आहे ज्याप्रमाणे तुम्ही धर्माचे पालन करतात त्याचप्रमाणे तुम्हाला आता या कायद्याचे देखील पालन करावा लागणार आहे.! 
    

 राजाज्ञा अस्पृश्यता निर्मूलनाचे अस्त्र.!



 स्वतंत्र पूर्वकाळात महार, मांग, चांभार, ढोर, रामोशी, बेरड, पारधी, टकारी व वडार अशा भटक्या अस्पृश्य समाजाला ब्रिटिशांकडून गुन्हेगारी जाती-जमाती संबोधण्यात येत होते. कारण त्यावेळी या जमातीकडे कुठल्याच प्रकारची स्वयत्ता नव्हती. ना उदार निर्वाहसाठी घर.. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी हे लोक चोऱ्या दरोडे करत याचबरोबर त्यांना हजेरी द्यावा लागत. हजेरी देणे ही एक परंपराच रूढ झाली होती. या जाती-जमातीतील प्रत्येक लोकांना दररोज पाटलांच्या चावडीसमोर जाऊन हजेरी द्यावी लागे. सवर्णाच्या म्हणण्याप्रमाणे या जातीतील सर्वच लोक गुन्हेगार आहेत. ते चोऱ्या करतात व दरोडे घालतात इतकेच नव्हे तर मेलेले जनावर लवकर ओढून नेत नाहीत. चोरी दरोडा हा त्यांचा धंदाच आहे असे त्यांचे मत होते. धर्माच्या बाष्कळ गोष्टी करणाऱ्या लोकांना शाहू महाराजांनी खरा धर्म शिकवला. 
 शाहू महाराजांनी कर्मठांना वटणीवर आणण्याचे ठरविले. कर्मठांना वाटायचं की ते सर्व ज्ञानी आणि कर्तृत्व संपन्न आहेत.., आणि गरीब अस्पृश्यांना त्यांनी चोर-दरोडेखोर ठरविले होते.! जणू काही सात्विक प्रवृत्तीचा ठेका फक्त कर्मठांनीच घेतला होता. अशा आपमतलबी, स्वार्थी लोकांना वटणीवर आणण्यासाठी समाजोद्धारक वटहुकूम आणि आज्ञापत्रे शाहू महाराजांनी काढले.!
 छत्रपती शाहू महाराज आपल्या दरबारातून अनेक स्वलिखित आज्ञापत्रे व हुकुमे काढत असत. परंतु ही गॅझेट पत्रे मध्येच गायब होत होती. शाहू महाराजांना वाटलं आपण हुकूम दिलेत आता त्याची अंमलबजावणी होते की नाही ते पाहायचं. ते त्याचे परिणाम शोधायचे परंतु त्यांच्याकडे अंमलबजावणीची पूरक माहिती येत नसे, त्यांनी काढलेले हुकुमांची अंमलबजावणी होत नाही असच त्यांना आढळल,! एका विक्षिप्त अधिकारी ते गॅझेट पत्र सात महिन्यापर्यंत गायब केले. हे सर्व शाहू महाराजांना माहित पडताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचे ताशेरे ओढले आणि सर्व आज्ञापत्रे हूकूमे प्रकाशित करून सामान्य जनांपर्यंत प्रसारित केले. शाहू महाराजांच्या सर्व हूकूमात आणि आज्ञापत्रात कर्मठ जाचक रूढीला घाव घालणारे कायदे व नियम होते. काही दिवस विरोधाची फळी विरोधकांनी उभारून पाहिली. या हुकूमामुळे आपला 'धर्म बुडाला' अशी ओरड ही दिली पण कोणीच राजीनामा देण्याची हिम्मत करत नव्हते. हळूहळू का होईना सर्वांना राजाज्ञाच पालन करावाच लागले. काही महिन्यातच अनेक बदल दिसायला लागले, शाहू महाराजांचे सर्व निदान अचूक ठरले सरकारी कचेऱ्या, विद्या खात्यात व वैद्यकीय सेवा खात्यात बदल झाले. ही "राजाज्ञा अस्पृश्यता निर्मूलनाचे अस्त्र ठरले"
(संदर्भ:- प्रा रघुनाथ कडवे लिखित छत्रपती शाहू महाराज या पुस्तकातून पान क्रमांक 27/28 )


 तुम्ही शूद्रच आहात.!



 शाहू महाराजांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग म्हणजे शाहू महाराजांच्या जीवनातील क्रांतिकारक वळण होय. या घटने शिवाय त्यांचं जीवन चरित्र अधुरच आहे, विषय आहे "वेदोक्त प्रकरणाचा". हे वेदोक्त प्रकरण घडलं आणि शाहू महाराजांचा संपूर्ण आयुष्य बदललं थोडक्यात याची पार्श्वभूमी आपण पाहू.
वेदातील मंत्रांचा अधिकार केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांना होता. तर पुराणातील मंत्रांचा उपयोग शूद्रांसाठी होता. झाले असे की शाहू महाराज हे दत्तक पुत्र शिवाय ते कागलच्या घाटगे घराण्यातील, त्यामुळे ते क्षत्रिय होऊ शकत नाहित अशी काही लोकांची धारणा होती. शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे छत्रपती जन्माने मराठा आणि परंपरेने राजवंशाचे वारसदार, तात्कालीन काळात भारताच्या सम्राज्ञी असणाऱ्या राणी "व्हिक्टोरिया" यांनी शाहू महाराजांना 'महाराज' हा सन्मान दिला. काही मूर्ख लोकांनी शाहू महाराज शूद्र आहेत हा उहापोह केला. व त्यांची शूद्रातच गणना केली, कार्तिक महिन्यात शाहू महाराज दररोज पंचगंगेत स्नानास जात असे. एका वर्षी ते प्रथेप्रमाणे पंचगंगेवर गेले त्यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब, मेहुणे मामासाहेब खानविलकर व इतर सेवक मंडळी होती. त्याचबरोबर धर्मकृत्य करण्यासाठी राजघराण्याचा उपाध्ये अर्थात राजोपाध्ये महाराजांसोबत गेला. त्याचे नाव नारायण भट्ट उर्फ आप्पासाहेब राजोपाध्य असे होय, नित्यप्रमाणे शाहू महाराज पंचगंगेवर स्नान करण्यासाठी गेले. आणि त्या दिवशी अनायसे मुंबईचे प्रसिद्ध शास्त्री राजाराम भागवत त्यांच्यासोबत होते. नेहमीप्रमाणे शाहू महाराज पंचगंगेत स्नान करण्यासाठी उतरले त्यांच्याबरोबर राजाराम शास्त्री भागवत, बापूसाहेब व मामासाहेब हे तिघे देखील उतरले. तर दुसरीकडे राजोपाध्य नारायण भट मंत्र म्हणत होते, तेही स्वतः आंघोळ न करता. राजाच्या अभिषेकावेळी व स्नानावेळी नेमलेल्या सर्व पुरोहितांनी प्रथम आंघोळ करून, शुद्ध होऊन राजासाठी वेदोक्त मंत्रांचा अनुग्रह करायचा असतो. मात्र झालं उलटच.! 
 शाहू महाराज स्नान करतेवेळी नारायण भट वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणू लागला. हे मंत्र ऐकले राजाराम शास्त्री यांनी. शाहू महाराज आपल्या स्नानविधीत मग्न होते, राजाराम शास्त्री भागवतांनी मंत्राकडे महाराजांचे लक्ष वेधले. आणि शास्त्री महाराजांना म्हणाले "महाराज नारायण भट हे मंत्र वेदोक्त नव्हे तर पुराणोक्त म्हणत आहेत, त्याचबरोबर ते आंघोळ न करता हा विधी करत आहेत."! महाराजांनी हे ऐकताच नारायण भटजी यांना विचारले 
"भटजी आंघोळ-बिंगोळ केली नाही वाटतं.?" 
"भटजीने उत्तर दिले, नाही.!" महाराजांनी प्रश्न केला "आंघोळ न करताच मंत्र म्हणता.?" 
यावर नारायण भटांनी उद्धट उत्तर दिले.,, " वेदोक्त रीतीने विधी करताना आंघोळ करावी लागते पुराणोक्त रीतीने विधी करताना आंघोळ करण्याची गरज नाही.!"
 त्यावर महाराजांनी भटजींना विचारले "आपण कोणते मंत्र म्हणत आहात.?" भटजी म्हणाले "पुराणोक्त मंत्र" शाहू महाराजांनी पुन्हा प्रश्न केला "का बरं.? "
 भटजीने उर्मठ उत्तर दिले., "शूद्रास वेदोक्ताचा अधिकार नाही..!" महाराज म्हणाले "म्हणजे आपण आम्हास शूद्र समजता.?" भटजी उतरले 'होय आपण शूद्रच आहात.' हे शब्द ऐकताच महाराजांच्या डोळ्यात अग्नी पेटली तर ही संयम राखीत ते म्हणाले 'मग तुम्ही आम्हास क्षत्रियकुलवंतस म्हणतात त्याचं काय.?' 'जोपर्यंत सर्व शक्तिमान ब्रह्मवृंद तुम्हास क्षत्रिय मानत नाहीत., तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात असे' वेतनधारी-वतनदारी भटजी महाराजांना म्हणाला. 
 शाहू महाराजांनी कार्तिक मास संपेपर्यंत अपमान सहन केला. कार्तिक मासाच्या अखेरीस शाहू महाराजांनी नारायण भट उर्फ आप्पासाहेब राजोपाध्ये याच्या आचार-विचारणा बाबत चौकशी करावयास लावली. त्याचा स्वभाव, रीतीरिवाज अगदी सगळे काही पडताळून पाहिले. तेव्हा या नारायण भट उर्फ आप्पासाहेब राजोपाध्ये यांच्या व्याभिचारी वर्तनाबद्दल कळाले. तो सदानकदा एक्या वेश्या च्या घरी पडलेला असायचा रोज सकाळी तो तिथूनच पंचगंगेवर यायचा, एवढेच नव्हे तर तो वतनधारी होता वर्षाकाठी वतनाचे त्याला 30 हजार रुपये मिळायचे. धर्माच्या नावाखाली व धर्मपुरोहिताच्या पांघरूणाखाली तो एक विक्षिप्त व्याभिचारी होता. आणि लोकांना फसवत असायचा. कार्तिक मास संपल्यानंतर महाराजांनी नारायण भटजी ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.! शाहू महाराजांनी समजूतीचे सत्र सुरू ठेवले राजे सयाजीराव गायकवाड, राजे प्रतापसिंह यांच्या दरबारात वेदोक्त पद्धतीने धर्मविधी होत असते याचे स्मरण करून दिले. एवढेच नाही तर आम्ही "पुण्यश्लोक शिवछत्रपतींचे" वारस आहोत त्यांच्या विचाराचे रक्त आमच्या धामन्यात खेळत आहे. अशी समजूत देखील घातली पण तो नाठाळ काही केल्या ऐकेना. उलट त्याने शाहू महाराजांविरोधात एक मोठा गट उभा केला, आणि या गटाला बळ दिलं ते प्रा विजयापुरकर यांनी व त्यांच्याबरोबर पुण्याच्या 'केसरी' आणि कोल्हापूरच्या 'समर्थ' व 'ब्रम्होदय' वर्तमानपत्रांनी. शाहू महाराज हे प्रकरण समोपचारण मिटवण्याच्या प्रयत्नात होते. पण ते शक्य झालं नाही. सामंजस घडवून आणण्यासाठी शाहू महाराजांसोबत अनेक विवेकवादी ब्राह्मण विचारक देखील होते. पण नारायण भट या सर्वांना टाळू लागला. हे सर्व चित्र पाहता महाराजांनी एक हुकूम काढला त्यात ते म्हणतात:- "राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीनेच केले पाहिजेत व जो तसे करणार नाही त्याला दक्षिणा मिळणार नाही." हा हुकूम ऐकताच राजोपाध्ये अधिकच चिडला आणि अत्यंत उर्मटपणे म्हणाला 'आम्हाला हुकूम देणारा हा आहे कोण.?' हे असे झाले की उंदराने सिंहावर चाल करावी.! 
 या सगळ्यात सत्यशोधकांनी एक काम केले त्यांनी नारायण शास्त्री सेवेकरी नावाच्या एका विद्वान पुरोहिताच्या हातून वेदोक्त पद्धतीने श्रावणी करून घेतले. त्यामुळे या कर्मठांच्या गटात फूट पडली. श्री नारायण शास्त्री सेवेकरी यांचा एक गट होता व प्रतिस्पर्धी म्हणून चौदा जणांचा दुसरा एक गट होता., या दुसऱ्या चौदा जणांच्या गटाने नारायण शास्त्री सेवेकरी यांच्यावर ग्रामण्य आणले, व त्यांना बहिष्कृत केले तरीही तो पुरोहित ढाळला नाही की वळला नाही. प्रा,विजयापुरकर यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आणि त्यामुळे हा दुसरा गट अधिकच ओरडू लागला. या कर्मठ गटाने महाराजांना फर्मावले 'की नारायण शास्त्री सेवेकरी हे आता बहिष्कृत झाल्यामुळे त्यांना राजवाड्यातील नोकरीवरून कमी करण्यात यावे' हे ऐकताच शाहू छत्रपतींनी त्यांच्या ग्रंथमालेला मिळणारे अनुदान ताबडतोब बंद केले, त्यांनी पुन्हा विनंती महाराजांकडे केल्या पण काही उपयोग झाला नाही, शाहू महाराज ऐकत नाहीत म्हणून विरोधकांनी हे प्रकरण पोलिटिकल एजंट कडे नेले त्यावेळी 'कर्नल सिली हे पोलिटिकल एजंट होते.' त्यांनी निर्णय दिला आणि म्हणाले "ही धार्मिक बाब आहे. महाराजांचा निर्णय अंतिम समजावा.!" त्यांचा हा निर्णय ऐकून ही कर्मठ मंडळी टिळकांकडे गेली, टिळक हे राजकीय दृष्ट्या पुरोगामी परंतु सामाजिक दृष्ट्या अतिशय शांत. तात्कालीन ब्रिटिश सरकार विरुद्ध त्यांची लेखणी म्हणजे जहाल होती. ही विरोधक मंडळी टिळकांकडे गेल्याची वार्ता शाहू महाराजांपर्यंत आली. टिळक आपली बाजू घेतील शिवरायांच्या वारसाला क्षत्रिय संबोधतील परंतु प्रत्यक्षात झाले उलटेच. लोकमान्य टिळक आपली बाजू घेत नाहीत व ते आपल्याला साथ देणार नाहीत असा शाहू महाराजांना पक्का विश्वास झाला तो केसरी मधल्या बातमी मधून.! शाहू महाराजांनी काही विद्वान पंडितांची कमिटी नेमली त्यात तीन सभासद होते पहिले न्यायमूर्ती पंडितराव, दुसरे विश्वनाथराव गोखले, आणि तिसरे आप्पासाहेब राजोपाध्ये या त्रिसदस्यीय कमिटीने सखोल अभ्यास करून शाहू छत्रपती क्षत्रिय असल्याचा अहवाल तयार केला. 16 एप्रिल 1902 रोजी हा अहवाल या कमिटीने दरबारात सादर केला यात शाहू छत्रपती क्षत्रिय असल्याचे स्पष्ट केले व त्या अहवालावर न्यायमूर्ती पंडितराव व गोखले या दोन सदस्यांनी सही केली. मात्र आप्पासाहेब राजोपाध्य यांनी सही करण्यास साफ इन्कार केला. बऱ्याच नामावंत लोकांनी राजोपाध्य यांना समजविण्याचा अनंत प्रयत्न केला. राजोपाध्य मानायला तयारच नव्हता त्याने एक शक्कल लढवली तो म्हणाला छत्रपती जरी क्षत्रिय असले तरी शाहू महाराज क्षत्रिय होऊ शकत नाहीत. कारण ते कागलच्या घाटगे घराण्यातले आहेत.! 
 नारायण भट उर्फ आप्पासाहेब राजोपाध्य ऐकत नाही हे पाहताच शाहू महाराजांनी त्याला शो कॉज नोटीस दिली. व तीन दिवसाच्या आत उत्तर मागविले. राजोपाध्याने आणखीन घोळ घालण्याचा प्रयत्न केला, व जास्त अवधी मागितला. याच अवधीत कर्मठांच्या चाणक्य पुढार्‍यांनी बुद्धीला न पटणारा तोडगा शोधून काढला. ते म्हणाले "शाहू महाराज यांना क्षत्रिय समजावे परंतु त्यांचे सगे-सोयरे यांना क्षत्रिय मानता कामा नये." या वाक्याचा अर्थ असा की शाहू महाराज यांना क्षत्रिय समजावा परंतु त्यांचे सख्खे बंधू बापूसाहेब यांना क्षत्रिय मानता येणार नाही निर्बुद्धी लोकांचा अजब न्याय.! एकाच आईचे मुलं दोन वर्णाचे ठरविले. 
 ही मंडळी बुद्धिभेदी चाणक्ष आहेत यांना राजाज्ञाचा बडगा दाखवलाच पाहिजे असे शाहू छत्रपतींना वाटले. 6 मे 1902 रोजी शाहू महाराजांनी हुकूम काढला 'राजोपाध्य यांची सर्व इनाम गावे, जमिनी, वंशपरंपरागत आलेली हक्क रद्द करावे व इनामे जप्त करावी याचबरोबर राजोपाध्य ला दरसाल मिळणारे 30 हजार रुपयांवर पाणी सोडावा लागेल' शाहू महाराजांच्या हुकूमाने सर्व वतने जप्त झाली हा प्रसंग बघताच ब्रम्हवृंद शांत बसला नाही. त्यांनी महाराजांच्या हुकूमाविरुद्ध कौन्सिल कडे अपील केलं. कौन्सिलने अपील फेटाळ ब्रह्मवृंद यामुळे अधिकच चिडला, त्यांनी ब्राह्मणेतरांवर शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. त्यांनी शाहू महाराजांना देखील शिव्याशाप दिल्या त्या शापाने राजाच काहीतरी अनिष्ट होईल असं जाहीरपणे सांगू लागले इतक्यात शाहू छत्रपतींची दत्तक आई महाराणी आनंदीबाई साहेब यांचे वृद्धपकाळाने निधन झाले एकीकडे आपली आई निर्वर्तली आहे त्यामुळे शाहू महाराज दुःखी झाले होते. तर दुसरीकडे ब्रह्मवृंद आमच्या शापामुळेच हे झालं आता भोगा असा आऊ-बाव करू लागले. ते हाकाटी देत होते आपल्या आईचा अंत्यविधी हा वेदोक्त पद्धतीने व्हावा असे शाहू महाराजांना वाटत होते. पण आम्ही वेदोक्त पद्धतीने विधी करणार नाहीत असे स्पष्टपणे त्या कर्मठांनी नकार दिला. शाहू महाराजांबरोबर काही पुरोगामी विचाराचे लोक काम करत होते त्यात त्यांच्याबरोबर काही पुरोगामी ब्राह्मण पुरोहित सुद्धा होते त्या विवेकी विचाराच्या ब्राह्मणांकडून वेदोक्त पद्धतीने आपल्या आईवर अंत्यसंस्कार शाहू महाराजांनी करून घेतले. 
 तेवढ्यात शाहू छत्रपतींच्या जुन्या राजवाड्याला आग लागली ही आग आमच्याच शापामुळे लागली आहे अशी बढाई केली. या अशा भातुकली खेळी करून शाहू राजांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आपले वर्चस्व कसे राखता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं परंतु सारे काही प्रयत्न निष्फळ ठरले. शाहू महाराजांनी या दिवसात आपला धीर खचून दिला नाही हा धीराचा महामेरू डगमगला नाही उलट नव्या ताकतीने वर्चस्वशाही विरुद्ध लढण्यास अधिक उद्युक्त झाला. वेदोक्त प्रकरण विरोधकांनी मुंबई सरकारकडे नेले मुंबई सरकारने त्यांचे अपील फेटाळे आणि शाहू छत्रपतींची बाजू न्याय संगत आहे असे प्रतिपादिले. शेवटी हे प्रकरण हिंदुस्थान सरकारकडे गेले हिंदुस्तान सरकारने राजोपाध्ये व इतर विरोधी मंडळी विरुद्ध निकाल दिला. सन 1905 मध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष झाला तेव्हा कोठे हे वेदोक्त प्रकरण थांबले. शाहू महाराजांनी आक्टोंबर 1905 मध्ये राजोउपाध्य यांना पदावरून रिक्त केले व त्याजागी जोशीराव नावाच्या विद्वान पंडितांची राजवाड्यातील धर्म कृत्य करण्यासाठी नेमणूक केली. त्यास दरमहा 250 रुपये पगारावर नेमले इथून पुढे राजवाड्यात राजघराण्याचे सर्व विधी वेदोक्त पद्धतीने होऊ लागले. पुढे शाहू महाराजांनी क्षत्रजगतगुरु ची नेमणूक केली. जातीनिरपेक्ष बुद्धीने पुरोहित तयार करणारी मोठी चळवळ सुरू केली. या निर्णायक चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रातील वर्चस्ववादी पुरोहितशाही विरुद्ध बंड पुकारले गेले व ब्राह्मणेतरांना जाचक पुरोहितशाहीच्या मानसिक गुलामीतून मुक्त केले व एकाधिकारशाही नष्ट केली अशा धीरोदात्त महामेरू शाहू महाराजांचे हे कार्य म्हणजे आगामी पिढीला नवी चेतना देणारे होय.! 
( संदर्भ :- प्रा रघुनाथ कडवे लिखित छत्रपती शाहू महाराज या पुस्तकातून पान क्रमांक 33/ 38 )



 महात्मा फुलेंबद्दल कृतज्ञता..



 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ शोषित बहुजनांसाठी मोठा आधार होती. या चळवळीमुळे अस्पृश्य व स्त्रियांना आपले हक्क व अधिकार कळाले सर्व माणसे सत्याचा शोध घेऊ लागली. अज्ञानाच्या ढिगार्‍याखाली सत्य आहे व ते सत्य आपल्याला ज्ञानातूनच जाणवेल अशी संकल्पना महात्मा फुलेंनी मांडली.
 महात्मा फुलेंनी सत्याचा शोध घेताच सर्व अज्ञानी लोकांना सत्यशोधक केलं, मोठा तार्किक विचार दिला. धार्मिक स्वातंत्र्य मिळवून दिले. भाकडकथा पुसून टाकल्या, देवात आणि मानवात कोणीच दुवा व मध्यस्थीती नसतो हा विचार पटवून सांगितला. तुमचे दुःख नष्ट करण्यासाठी कोणी प्रेषित किंवा मध्यस्थीती करणारा येणार नाही तुम्हाला तुमचाच उद्धार करावा लागेल, अशी समजूत घातली. महात्मा फुलेंचे हे मानवी व तार्किक विचार शाहू महाराजांना प्रेरणा बनले.! 
 महात्मा फुलेंबद्दल व त्यांच्या सत्यशोधक चळवळीबद्दल शाहू महाराज अनेक लोकांकडून विचारणा करायचे त्यांनी महात्मा फुलेंचे विचार अंगीकारले आणि समाज उन्नतीसाठी भरीव कार्य केले. ज्याप्रमाणे वनवासात असणाऱ्या भगवान श्रीरामांना प्रभू हनुमान भेटले त्याचप्रमाणे महात्मा फुलेंना शाहू महाराज भेटले, समतेची मशाल महात्मा फुलेंनी शाहू महाराजांकडे सुपूर्द केली आणि तीच समतेची मशाल पुढे देशाची 'राज्यघटना' झाली. शाहू महाराज आपल्या भाषणात महात्मा फुले व त्यांच्या कार्याबद्दल आणि सत्यशोधक समाजाच्या कर्तेपणाबद्दल सतत बोलायचे एकदा आपल्या भाषणात ते म्हणाले. :- 
 दयानंद सरस्वती, केशवचंद्र सेन व ज्योतिराव फुले यांच्या चळवळीत युरोपियन सुधारणा पाश्चिमात्य ज्ञान व मिशनऱ्यांचा धार्मिक प्रचार यांचा परिणाम म्हणून अस्तित्वात आलेल्या सुधारणावादी संस्था होत. या तिघात बऱ्याच बाबतीत ध्यानात ठेवण्यासारखे साम्य आहे पण तिघांचे मते व कार्यक्रम त्यांच्या विद्येच्या व परिस्थितीच्या योगाने भिन्नभिन्न झाली आहेत. " क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे महत्त्व समस्त प्रजाजनास समजावून सांगताना महाराज म्हणाले होते. " ज्योतीरावांनी दांभिक पुरोहितशाही च्या धार्मिक स्वातंत्र्याला तडाका देऊन देव आणि मनुष्य यामधील दलाल अमान्य केला आहे ज्योतिराव फुले व त्यांच्या अनुयायांनी पुरोहित ब्युरोक्रसी सोबत जशास तसे वाढले पाहिजे."
 महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांच्या अज्ञानाविषयी सांगितलेला मूलमंत्र म्हणजे "विद्या विनामती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले." हा त्यांच्या विद्याधनाचा मूलमंत्र महाराजांना शिरोधार्ह वाटला. अस्पृश्यांना सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे द्वारे खुली करून देणे गरजेचे आहे हा मूलमंत्र महाराजांच्या कार्याचा भाग बनला. 
 सत्य हे अज्ञानाच्या तळाशी कुठेतरी खोलवर दडलेले असते आणि ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने ते प्रज्वलित होते हे महात्मा फुलेंचे सुचक विधान शाहू महाराजांच्या गळी उतरले "माझी प्रजा नुसत्या प्राथमिक शिक्षणाने जरी विभूषित झाली तरी मी माझे संपूर्ण राज्य तिच्या स्वाधीन करेल." हे शाहू छत्रपतींचे बोल म्हणजे सत्याचा शोध घेण्याचे सामर्थ्य ज्ञानातच आहे याची पूर्ण खात्री त्यांना पटली. होती महात्मा फुले म्हणत असत 'सत्य शुद्ध जर धर्म ग्रंथात नाही ऋषी, गुरु, अवतार व प्रेषित यांच्या जवळ जर सापडत नाही तर ते सापडायचे कोठे ते मनुष्याच्या विवेक बुद्धीत सापडेल' महात्मा फुलेंचे हे अमूल्य विचार म्हणजे त्यांनी ज्ञानाचा शोध घेतला होता व त्यांच्यात असे महान सामर्थ्य स्पष्ट पणे दिसत आहेत. या भूतलावर मनुष्याच्या उत्कर्षासाठी एकदाच एकुलता एक दिव्य ठेवा जन्माला आला ते म्हणजे भगवान बुद्ध होय त्यांनी जर हे परिवर्तनाचे चक्र सुरू केले नसते तर मनुष्याची गतीच पूर्णपणे थांबले असतील त्यांच्या या विचारापासून सम्राट अशोक, संत कबीर, संत रविदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय प्रेरित झाले आणि ह्या चक्राची गती चळवळीत रूपांतरित झाली ती फुले शाहू आंबेडकर यांच्या मुळे.!



 अस्पृश्यांचा पाठीराखा ..



 शाहू महाराजांनी अस्पृश्यांची दुहेरी गुलामगिरीतून सुटका करण्याचे ठरविले महार समाजाबरोबर अनेक समाजाला वतन असायचे पण महार लोकांना या वतनाचा जास्त त्रास असायचा त्यांना चाकरी करावा लागत असे. हा सगळा प्रसंग बघता शाहू महाराजांनी दिनांक 18 सप्टेंबर सन 1918 रोजी महार वतने खालसा केली, हे चाकरी वतन असतानाही शाहू राजांनी महारांच्या जमिनी त्यांच्याकडे राहू दिल्या. त्या सर्व रयतावा केला म्हणजे वतनदारी महार, चाकरी, वेठबिगारी करणारा महार राहिला नाही. तो इतर रयतेप्रमाणे रयत बनला महार जातीतील लोक आता सरकारी कामे करू शकणार होती सरकारी पगारी नौकर नेमायचा म्हणजे खजिन्यावर ताण पडणार आहे ही गोष्ट अधिकाऱ्यांना समजली त्यांनी तुरंत महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. 
 तेव्हा शाहू महाराजांनी त्या अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की माझा खजिना याबाबतीत रिक्त झाला तरी त्याची परवा मला नाही पण माणसाला माणुसकी पासून वंचित करणारी ही रुढी मला मोडायची आहे.! 
 27 जुलाई 1918 पासून शाहू महाराजांनी महार, मांग, रामोशी व बेरड या जातीतील लोकांना जीव घेण्या सक्तीच्या हजेरीतून मुक्त केले. दिनांक ८ व १० ऑगस्ट १९१८ रोजी शाहू महाराजांनी दोन हुकूम काढले तलाठी नेमताना अस्पृश्यांना पहिला क्रम द्यावा जर लाईक व्यक्ती असेल तर त्याला मुख्याधिकारी ही करावे असा हुकूम दिला. अस्पृश्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू महाराजांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी होते का ते पाहिले जर कोणी हुकूम पाळण्यात कसूर करत असेल तर त्यावर योग्य ती कार्यवाही केली छत्रपती शाहू राजांनी हे सगळं करता आपल्या गादीचीही परवा केली नाही.!



बाबासाहेबांकडे चळवळ सुपूर्द..


 

 सन 1919 रोजी एक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना घडली ती म्हणजे शाहू महाराज आणि बाबासाहेबांची पहिली भेट.! 
 शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलेल्या अस्पृश्य उन्नती चळवळीत काही सुशिक्षित तरुण होते त्यात दत्तोबा संतराम पोवार हे त्यापैकी एक. ते शाहू महाराजांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी होते. व ते सरकारी नोकरीत ही होते. दत्तोबा पोवारांनी 1917 सालीच बाबासाहेबांची भेट घेतली होती. व तेव्हाच त्यांनी शाहू महाराजांना बाबासाहेबांच्या कार्याबद्दल सविस्तर वृत्तांत सांगितला होता, अस्पृश्य समाजातून एवढ शिक्षण घेऊन एक तरुण पुढे चालला आहे हे ऐकून महाराजांना आनंद झाला व दत्तोबा पोवारांना बाबासाहेबांशी भेटण्याची महाराजांनी इच्छा व्यक्त केली. या दोन महारथी उभयतांच्या भेटीचा योग आला तो 1919 साली. 
 शाहू महाराजांना बाबासाहेबांना भेटण्याची अतिव इच्छा होती म्हणून त्यांनी काही लोकांना बाबासाहेबांचा शोध घेण्यास पाठविले, ते काहींना शक्य झाले नाही, महाराज स्वतःच बाबासाहेबांच्या भेटीला गेले तेव्हा बाबासाहेब परळीच्या बीडीचाळीत राहत होते. कोल्हापूरचे महाराज आपल्याला भेटण्यास आले आहेत हे माहिती होताच बाबासाहेब महाराजांच्या स्वागतासाठी दुसऱ्या मजल्यावरून खाली आले परळच्या चाळीत बाबासाहेब व शाहू महाराज यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. शाहू महाराजांना बाबासाहेबांना पाहून अत्यंत आनंद झाला सर्व आंबेडकर कुटुंबियांची ओळख करून दिली व तेथूनच शाहू महाराज व बाबासाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध रुजले. माता रमाईला शाहू छत्रपतींनी आपली बहीण मानले व माहेरी या असे आमंत्रण दिले. 
 पहिल्या भेटीतच शाहू राजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण दिले व बाबासाहेबांनी ते सौहार्दाने स्वीकारले. मुंबईत ठरल्याप्रमाणे बाबासाहेब कोल्हापूरला गेले. संपूर्ण कोल्हापूर शहरातून बाबासाहेबांची जंगी मिरवणूक काढली त्यांचा शाहू महाराजांनी राजेशाही थाटात पाहुणचार केला. व सोनतळी कॅम्पवर त्यांच्या समवेत स्नेहभोजन ही केले.
 या दुसऱ्या भेटीत अस्पृश्यांच्या सामाजिक प्रश्नावर दोघात सविस्तर चर्चा झाली. कोल्हापुरातून मुक्कामाची रजा घेतेवेळी शाहू महाराजांनी बाबासाहेबांसाठी देखणा समारंभ आयोजित केला मानाचा जरी फेटा बांधून जाहीर सत्कार केला या समारंभात अनेक मान्यवरांचे भाषण झाले निरोपाचे भाषण करताना बाबासाहेब म्हणाले की "छत्रपतींनी दिलेला मानाचा जरी पटका माझ्या मस्तकी चडविला आहे. मी त्याचा सदैव मान राखीन" बाबासाहेबांचे हे उद्गार नव्या युगाच्या प्रारंभाचे अर्थपूर्ण उद्गार होते.! 
 अथक परिश्रम घेत व अनंत अडचणीवर मात करत बाबासाहेब शिक्षण घेत होते बडोदा संस्थांनात त्यांनी नोकरीही केली तिथे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यांनी निर्णय घेतला 'आता संपूर्ण आयुष्य समाजाला समर्पित करायचे' ह्या त्यांच्या आरंभ काळात शाहू महाराजांनी विश्वासू साथ दिली आढळ पाठिंबा दिला शाहू महाराजांची साथ होती म्हणून ते नव्या उमेदीने समाज उद्धारासाठी सज्ज झाले त्याच दरम्यान भारत दौऱ्यावर असलेल्या साऊथब्युरो कमिशन पुढे अस्पृश्य समाजाच्या वेदना मांडण्यासाठी एका वृत्तपत्राची गरज आहे अशी कल्पना बाबासाहेबांना आढळून आली. शाहू महाराज मुंबईला आले असता काही कार्यकर्ते त्यांना भेटण्यास गेले ही कल्पना त्यांना सांगितली आणि क्षणाचाही विलंब न लावता स्वतः शाहू महाराज बाबासाहेब यांना भेटण्यास आले आणि 'मूकनायक' या वृत्तपत्रास मोठे अर्थसहाय्य केले, हा वर्तमानपत्र सुरू केल्यानंतर बाबासाहेब "वंचित जगताचे नायक" झाले.!   



 ऐतिहासिक मानगाव परिषद..



 शाहू महाराज व बाबासाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होत चालले होते महात्मा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ आता शाहू राजे व बाबासाहेबांमुळे विस्तार पावत होते प्रतिगाम्यांच्या विरोधात पुरोगामी उभारू लागले. विशेष म्हणजे सत्यशोधक चळवळीला शाहू महाराजांमुळे नवरूप मिळाले होते. शाहू महाराज आणि बाबासाहेब या दोघांच्या रूपाने शोषित अस्पृश्य समाजाला आधार मिळाला आणि महात्मा फुले यांचे विचार प्रेरणास्तोत्र बनले, अस्पृश्यांमध्ये जागृती करणे अधिक गरजेचे होते नेमकी तसेच घडत गेले शाहू छत्रपती व बाबासाहेब दोघे मिळून परिषदा, सभा, मेळावे व प्रबोधन करत होते त्याची मुहूर्तमेढ रोवली ती माणगाव येथे झालेल्या परिषदेत. 
 कोल्हापूर मधील अस्पृश्य नेते दत्तोबा पोवार यांनी परिषदेचे पूर्ण नियोजन केले या परिषदेची प्रेरणा शाहू महाराज हे होते. कोल्हापुरातील बऱ्याच सुशिक्षित अस्पृश्य नेत्यांशी सल्ला मसलत करत रूपरेषा आखली महाराजांचे बाबासाहेबांचे पत्र व्यवहार सुरूच होते. ठरल्याप्रमाणे दिनांक 20 आणि 21 मार्च 1920 रोजी ही माणगाव परिषद पार पडली. शाहू महाराजांच्या इच्छेप्रमाणे बाबासाहेब या परिषदेचे अध्यक्ष झाले. बाबासाहेबांचे भाषण होण्याआधी शाहू महाराजांचे भाषण झाले हे भाषण म्हणजे अस्पृश्य समाजासोबतच बाबासाहेबांचे मनोधैर्य उंचावणारे होते. त्या भाषणाची सुरुवात शाहू महाराजांनी 'माझे प्रिय मित्र भिमराव आंबेडकर' अशी केली होती. पाहायला गेलोत तर शाहू राजे व बाबासाहेब यांच्यात 17 ते 18 वर्षाचे अंतर होते पण दोघांनीही ह्या अंतराकडे दुर्लक्ष केले. त्या भाषणात शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल गौरवोउद्गार काढले "तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला त्याबद्दल मी तुमचे अंतकरण पूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की भीमराव आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, इतकेच नव्हे तर एक अशी वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील माझी मनोदैवता मला हे सांगतेय..!"  
 शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा परमर्श घेतला होता आणि त्यांना अस्पृश्यांचे भवितव्य उज्वल दिसले होते तर ते बाबासाहेबांच्या मनातील तळमळीमुळे.! 
 पुढे याच भाषणात ते म्हणतात. ' 'आज त्यांना पंडित ही पदवी देण्यात काय हरकत आहे.? विद्वानात ते एक भूषणच आहेत आर्य व ख्रिस्ती यांनी आपल्यात त्यांना आनंदाने घेतले असते परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे व मी ही मानतो.'
 ही परिषद बाबासाहेबांच्या सार्वजनिक आयुष्याची प्रारंभ ठरली. यात आपले अध्यक्षीय भाषण करताना बाबासाहेबांनी शाहू महाराजां प्रति कृतज्ञता व जिव्हाळ्याचा आदरभाव व्यक्त केला. भाषणावेळी बाबासाहेब म्हणाले की 'सर्व बहिष्कृतांनी त्यांच्या उद्धारासाठी सत्कृत्य आरंभिलेल्या व त्यांना समानतेने हक्क मिळवून देणाऱ्या शाहू महाराजांचा जन्मदिवस मोठ्या सणाप्रमाणे साजरा करावा.!' ह्या परिषदेत काही महत्त्वपूर्ण ठराव पारित केले त्यातीलच पैकी दोन नंबरचा ठराव हा होता शाहू महाराजांचा जन्मदिवस सनाप्रमाणे साजरा करावा. या माणगाव परिषदेमुळे बहिष्कृत अस्पृश्यांना नव्या आशा पल्लवीत झाल्या.! 


 दुसरी ऐतिहासिक नागपूर परिषद.


 ही दुसरी ऐतिहासिक परिषद नागपूरला संपन्न झाली या परिषदेचे अर्ध श्रेय माणगावच्या परिषदेला जातं माणगाव मध्ये झालेल्या परिषदेमुळे बहिष्कृत अस्पृश्य समाजाला नवी चेतना मिळाली 30 मे 1920 रोजी ही परिषद नागपुरात 'अखिल भारतीय बहिष्कृत समाज' या नावाने भरली. या परिषदेचे अध्यक्ष होते छत्रपती शाहू महाराज दिनांक 30, 31 मे व 1 जून पर्यंत अर्थात तीन दिवसीयन शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित केली होती. सुमारे पाच वाजता या परिषदेचे काम का सुरू झाले नागपूरच्या एक्झिबिशन ग्राउंड वर भव्य मंडप उभारण्यात आला. अनेक ठिकाणाहून जनता आली होती. 
 मंचावर शाहू महाराज, बाबासाहेब, सर गंगाधर चिटणीस, शंकरराव चिटणीस, सर बी के बॉस, बाबुराव यादव, श्रीपतराव शिंदे, दत्तोपंत दळवी, रासा पापण, शिवराम जानबा कांबळे, कृष्णराव कांबळे व गोविंद गोपाळ कांबळे, ग आ गवई आणि बाबू कालीचरण असे मान्यवर उपस्थित होते. 
 समारोपि अध्यक्ष भाषणात शाहू महाराजांनी जे शब्द वधले ते कट्टरवाद्यांच्या कानशिलात लगावणारे होते. त्या भाषणात महाराज म्हणतात "अस्पृश्य हा शब्द कोणाही माणसाला लावणे फार निंद्य आहे. तुम्ही अस्पृश्य नाहीत, तुम्हास अस्पृश्य मानणाऱ्या पुष्कळ लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान, जास्त पराक्रमी, जास्त सुविचारी, जास्त स्वार्थ त्यागी, असे तुम्ही हिंदी देशाचे घटक आहात. मी तुम्हाला अस्पृश्य समजत नाही आपण बरोबरीचे भावंडे आहोत. कितीही अडचणी आल्या कितीही त्रास झाला तरी त्याला न जुमानता आपल्या उन्नतीच्या महत्त्वपूर्ण कार्यास शक्य तेवढा हातभार लावण्यास मी कधीही माघार घेणार नाही.!"  
 नागपूर परिषदेच्या या उपरोक्त भाषणामुळे केसरी या वृत्तपत्रात 8 जून 1920 च्या अंकात शाहू महाराजांवर कडक टीका केली. पुढे उदाजी मराठा वसतिगृह च्या कोणशीला समारंभात 15 एप्रिल 1920 रोजी शाहू महाराजांनी जे जातिभेदाविरुद्ध भाषण केले त्या संदर्भात राजकारण या वृत्तपत्रात 13 जून 1920 च्या अंकात पुन्हा त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला गेला. बहिष्कृत यांच्या उन्नतीसाठी महाराज कृतिशील कार्य करत होते पण हे करता करता त्यांना 'टिकेचा धनिक' ही व्हावा लागले.   
 शाहू महाराजांनी आपले सहकारी, गंगाराम कांबळे यांना आर्थिक सहाय्यक करून चहाचे हॉटेल सुरू करून दिले. एवढेच नव्हे तर ते स्वतः आपल्या सहकाऱ्यांसमवेत या हॉटेलात चहापान करायचे या घटनेचा संदर्भ देऊन राजकारण या वृत्तपत्राने पुन्हा टीका केली त्यात लिहिले की "..अस्पृश्यांच्या हाताचा चहा घेणे हे खरोखरच मोठ्या पराक्रमाची बाब आहे, असे समजू नये. आपण आपल्या गादीचा त्याग करू असे भाषण केले पण आपला वारस ते महार करणार आहेत काय." अशी जहाल टीका केली. आणि लोकसंग्रह या वृत्तपत्राने तर चक्क 'कोल्हापूर राज्यातील भानगडीची चौकशी करावी' अशी ब्रिटिश सरकारला विनंती केली. शाहू छत्रपतींवर टीका करायचं तात्पर्य एवढेच की त्यांनी चालवलेल्या अस्पृश्य उद्धाराचे कार्य सलत होते. या सर्वांचा समाचार बाबासाहेबांनी घेण्यासाठी ठरविले हे खोटे-नाठे आरोप बाबासाहेबांना सहन झाले नाहीत. मूकनायक या वृत्तपत्रात आपली धारदार लेखणी चालवून 'काकगर्जना' या मथळ्याखाली सर्व आरोपाचे खंडन केले व कर्मठांना सूचक इशारा दिला यात बाबासाहेबांची केलेली सडेतोड टीका कर्मठांना भावली 'धैर्याचे कामे करायला निधड्या छातीचाच मनुष्य लागतो' असे खडे बोल सुनावले व इथून पुढे अगर शाहू छत्रपतींविषयी अपमान कारक खोटे-नाठे आरोप लावाल तर ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गातील व्यक्तींचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा दिला.! 
 बाबासाहेबांचे व शाहू महाराजांचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक घनिष्ठ होऊ लागले. आपल्या प्रत्येक पत्रात बाबासाहेब शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करायचे व शाहू महाराज बाबासाहेबांच्या अद्वितीय विद्वत्तेचा सन्मान करायचे. डिप्रेस्ड क्लास इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन करून बाबासाहेबांनी भारतभर निधी गोळा करण्यासाठी योजना आखली हे कळताच महाराजांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केला 'जो काही फंड आपण गोळा करणार आहात त्यात माझे नाव घालण्यास मी मोठ्या संतोषीने परवानगी देतो व या संस्थेचा व्हाईस प्रेसिडेंट व असिस्टंट सेक्रेटरी होण्यास देखील मी तयार आहे' अशा आशयाचे पत्र लिहिले. इतकेच नव्हे तर बाबासाहेब पुढील शिक्षणाकरिता लंडनला जाणार आहेत हे माहीत होताच शाहू महाराजांनी स्वतः मुंबईस येऊन सढळ हाताने काही रोख पैसे बाबासाहेबांना दिले, आणि रमाबाईला माहेरपणासाठी कोल्हापूरला पाठवा अशी विनंती केली ते जिव्हाळ्याचे अनमोल संबंध अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तसेच राहिले बाबासाहेब व शाहू महाराजांचे मैत्री पूर्ण संबंध नुसते चळवळी पुरते मर्यादित नव्हते ते कौटुंबिक जिव्हाळ्याचे होते रमाईला बहीण मानून कोल्हापूरला येण्यासाठी आग्रह धरणे व शाहू महाराजांचे दोन्ही मुले राजाराम महाराज व आक्कासाहेब यांनी बाबासाहेबांना मामा म्हणून संबोधने हे नाते अतूट होते.! 
(संदर्भ :- लोक राजे राजश्री शाहू महाराज या पुस्तकातून लेखिका डॉक्टर सरिता जांभळे पान क्रमांक 50/64 )


 अखेर पर्व.



 शाहू महाराज हे फार कर्तव्य कठोर न्यायधारी व कर्ते महापुरुष होते आपल्या प्रजेची पिळवणूक कोणी करत असेल तर त्याला हुकूमचा तडाका देणे हे सत्र सुरूच ठेवले अस्पृश्य उद्धाराचे कार्य करण्यात महाराज मग्न होते. या कार्यात त्यांनी कुठलेही अडथळे येऊन दिले नाही. शिवाय त्यांनी आपल्या तब्येतीची तमा बाळगली नाही 1919 सालापासूनच महाराजांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांच्या छातीत असंख्य वेदना होत होत्या. डॉक्टरांनी अनेक वेळा विश्राम घेण्याचा सल्ला दिला पण हा सल्ला महाराजांनी दुर्लक्षित केला कितीही वेदना होत असल्या तरी महाराज आपल्या राज्याचा फेरफटका मारून येत. अंगात ताप असतानाही महाराज बडोद्याचे फत्तेसिंह महाराज यांच्या मुलीच्या लग्नाला जाऊन आले मुंबईत येताच अचानक त्यांचे प्रकृती अधिक बिघडली परिस्थिती चिंताजनक झाली. महाराज पन्हाळा लॉंज वर परत आले छातीतील वेदना असाह्य करत असतानाही महाराज खुर्चीवर बसले आणि म्हणाले 'मी जाण्यास तयार आहे, डर कुछ नही.! सबको सलाम बोलो' असे म्हणतात त्यांनी मान खाली घातली व आपला देह ठेवला. शनिवार दिनांक 6 मे 1922 साली सकाळी महाराजांचे निधन झाले महाराज फार अल्पायुष्य जगले ते जर दीर्घकाळापर्यंत राहिले असते तर भारताचा इतिहास काही और झाला असता.! श्री शिवाजी वैदिक शाळेतील मराठा विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्र म्हणून महाराजांवर अंत्यविधी केला.. त्यांच्या सन्मानार्थ 48 तोफांची सलामी देण्यात आली.
 शाहू महाराजांच्या निधनाची वार्ता बाबासाहेबांना त्यांचा मित्र नवल मेथीना यांनी दिली, बाबासाहेबांना मोठा धक्का बसला. शाहू महाराजांच्या निधनाने बाबासाहेबांची वैयक्तिक हानी झालीच होती त्याचबरोबर ब्राह्मणेतर, सत्यशोधक आणि अस्पृश्य निर्मूलन करणाऱ्या या तीन चळवळीचा मोठा आधार कोसळून पडला होता. भारतात समतामुलक लोकशाही स्थापण्यासाठी शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्य वेचले होते. या सामाजिक व समतामुलक चळवळीचे शाहू महाराज आधारस्तंभ होते. अशा आशयाचे पत्र बाबासाहेबांनी लिहिले होते. अस्पृश्यांच्या उद्धाराचा दुवा आता निखळला आहे याचे बाबासाहेबांना अतिव दुःख झाले. 
 दिनांक 10 मे 1922 रोजी शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांना अत्यंत दुःखी अवस्थेत बाबासाहेबांनी पत्र लिहिले संपूर्ण समाजाची काळजी वाहिली व 'माझ्या मित्राला मी आंचवलो आहे. अस्पृश्य समाज आपल्या महान कैवाऱ्याला मुकला आहे' असा शोकाकुल टाहो बाबासाहेबांनी पत्रात लिहिला पुढे लंडन होऊन परतल्यानंतर शाहू महाराजांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बाबासाहेब कोल्हापूरला गेले शाहू छत्रपतींच्या आसनाकडे पाहून त्यांना गहिवरून आले. शाहू-आंबेडकर यांचा पत्र व्यवहार हा कमी असला तरी तो त्या काळातला सामाजिक समाचार घेणारा आहे, त्यात चळवळीचे व अस्पृश्यांच्या हिताचे प्रतिबिंब आपल्याला जाणवते. बाबासाहेबांनी आपल्या पत्रात महाराजांविषयी आदरभाव व्यक्त केला पण त्यात आंधळी पूजा केली नाही. उलट आपुलकीचे व मैत्रीपूर्ण संबंध जोपासले..
 शाहू महाराजांचे कार्य निर्विवाद व कृतिशील होते हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. त्यांनी काढलेले समाजोद्धारक वटहुकूमे, दिलेली राजाज्ञा ही चळवळीसाठी एक इतिहास आहे त्यांचे हे कार्य संपूर्ण जनतेसाठी एक ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. आशा धीरोदात महानायकास भारतरत्न मिळावा अशी अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला व अर्थकारणाला आधुनिकतेचा प्रगल्भ साज चढविणारे आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे सुराज्य करणारे, एक असामान्य प्रतिभेचे न्यायिक समाज सुधारक,युगनायक कर्नल हीस हायनेस क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती महाराज, साहेब बहादूर यांस त्यांच्या सुवर्ण महोत्सवी शक्कोत्तर 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान परिवर्तनवादी कार्यास त्रिवार अभिवादन.! 

( संदर्भ :- लोकराजे, राजर्षी शाहू महाराज, लेखिका डॉ. सरिता जांभुळे व छत्रपती शाहू महाराज लेखक प्रा, रघुनाथ कडवे या दोन लेखकांच्या पुस्तकांमुळे सदरील लेखास मोठे सहाय्य मिळाले आहे. संक्षिप्त रूपात ही माहिती लिहिल्याबद्दल दोन्ही लेखकांचे मनःपूर्वक आभार. विशेष म्हणजे या लेखास अमूल्य मार्गदर्शन माझ्या वडिलांचे लाभले त्यांचेही आभार.!) 
     लेखक / संपादन 
आदर्श विकासराव जोगदंड

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !