विधानसभा निवडणुका आल्या की माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न-माजी आ.भीमराव धोंडे


आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे) :    
  विधानसभा निवडणुका जवळ आल्या की माझ्या राजकीय विरोधकांकडून माझ्या चारित्र्यहननचा प्रयत्न केला जातो कारण माझे राजकीय अस्तित्व संपले पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे कटकारस्थान करून माझे मानसिक मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जातो असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी कालच्या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगीतले .
    याबाबत अधिक माहिती देताना माजी आ.धोंडे यांनी सांगितले की,अहमदनगर येथील तथाकथित पत्रकार व दोन महिलांनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप करून तुमच्या आमच्याकडे क्लिप आहेत.त्या आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करून तुमचे राजकीय अस्तित्व संपवून टाकू अशी वारंवार धमकी देऊन पैशाची मागणी करत होते.प्रारंभी ही महिला मला वारंवार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन व मेसेज करून ब्लॅक मेलींगची भाषा वापरत होती‌.
याबाबत चार महिन्यापूर्वी आष्टी पोलीस ठाण्यात या महिलेच्या विरोधात तक्रार दिली होती.आष्टी पोलिसांनी या महिलेला आष्टी येथे बोलावून जबाब घेतला त्यानंतर मला फोन येणे बंद झाले परंतु लोकसभा निवडणूक काळात मला परत मेसेज व फोन यायला सुरुवात झाली तसेच अहमदनगर येथील एका युट्युबचा पत्रकार व या महिलेने संगनमत करून मला एक कोटी रुपयाची मागणी केली. पैसे द्या अन्यथा आपल्या विरोधात अत्याचाराची तक्रार करून आपले राजकीय जीवन उध्वस्त करु असे सांगितले. त्यावेळी माझे स्वीय सहाय्यक जफर शेख यांनी पत्रकाराची भेट घेऊन २५ हजार रुपये दिले.तरीही त्या दोघांकडून एक कोटी रुपयांची मागणी केली जात होती.त्यामुळे मी अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात या महिला व पत्रकार विरोधात तक्रार दिली.अहमदनगर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून एक महिला फरार आहे. माझे राजकीय विरोधक काही लोकांना पुढे करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझे राजकीय खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने चारित्र्यहननाचा प्रयत्न करतात.यापूर्वी २०१४ मध्येही असेच आरोप माझ्यावर झाले होते. २०१९ मध्येसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विरोधकांनी काही लोकांना पुढे करून माझे राजकीय करिअर संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु असल्या कोणत्याही गोष्टींना न घाबरता माझे राजकीय व सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे.सर्व ताकदीने राजकारणात सक्रिय राहणार आहे असेही माजी आ. भीमराव धोंडे यांनी शेवटी सांगितले .                       
          अहमदनगर येथील एका यु ट्यूबच्या चॅनल तथाकथित पत्रकारावर रविवारी आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. अजुनही एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !