"विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील जीवनाची वाटचाल करावी"- प्रा.डॉ. आनंद वाघ


'राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा' या डॉ. बाबासाहेबांच्या आदेशाला प्रमाण मानून भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा, बीडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्यां जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२४ रोज बुधवार या दिवशी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ठीक 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोटर सायकल रॅली काढण्यात आली तिचा समारोप राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या जवळ झाला. या मोटारसायकल रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर समता सैनिक दलाचे सैनिक सहभागी होते. याच दिवशी संध्याकाळी ठीक 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बीड येथील सभागृहामध्ये शाहू महाराजांच्या जीवनावर व्याख्यान आणि इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. 
प्रा. डॉ.आनंद वाघ हे प्रमुख व्याख्याते होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.यशवंत कदम सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आर.एम शिंदे साहेब (समाजकल्याण आयुक्त बीड), मा. महालिंग निकाळजे (भा. बौ. महासभा. जिल्हाध्यक्ष (प), 
मा. नानाभाऊ हजारे (उपशिक्षणाधिकारी बीड), मा. एस. एम. साळवे (जिल्हा कृषी अधिकारी), मा. अमरसिंह ढाका (भा. बौ. महासभा. कोषाध्यक्ष (प), मा. संघर्ष गोरे (बीड पोलीस) यांची उपस्थिती लाभली. 
सर्वच उपस्थित मान्यवरांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीप धूप पुष्पाने अभिवादन केले. त्यानंतर व्याख्याते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थित मान्यवरांचे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना प्रत्येकी सन्मान चिन्ह पिंपळाचे झाड भेट म्हणून देऊन स्वागत करण्यात आले.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभा, शहर अध्यक्ष एड. केतन गायकवाड यांनी केले. त्यानंतर प्रमुख उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा आपले मनोगत मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा डॉ आनंद वाघ यांनी आपल्या प्रबोधनपर व अभ्यासू मार्गदर्शनामध्ये शाहू महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, महिलांसाठी केलेले कायदे, विधवा पुनर्विवाह कायदा, आरक्षणाविषयीचे कायदे आणि वेदोक्त प्रकरण खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये मांडले. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे जीवन चरित्र अवश्य वाचावे आणि "विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा आदर्श समोर ठेवून पुढील जीवनाची वाटचाल करावी" असा संदेश आपल्या व्याख्यानातून दिला. 
त्यानंतर बीड शहरामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि प्रत्येकी दोन पुस्तक देऊन गुणगौरव करन्यात आला. यावेळी 80 गुणवंत विद्यार्थी त्यांच्या पालकांसोबत उपस्थित होते. 
सर्वच उपस्थित विद्यार्थी पालक आणि श्रोते यांना भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखेकडून मिठाईचे वाटप करण्यात आले. शेवटी समता सैनिक नितीन मुजमुले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास आयु बबन वडमारे, आयु देविदास राऊत सर, आयु चक्रे सर, आयु वानखेडे बाबा, आयु.हनुमंत कांबळे,आयु अण्णासाहेब शेळके सर, आयु अंकुश चव्हाण सर, आयु मायकल वाघमारे, आयु दिनकर बोराडे साहेब, आयु अर्जुन जवंजाळ साहेब, आयु भास्करजी सरपते, भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्ष निसर्गंध ताई, गायकवाड ताई, सरपते ताई, मस्के ताई, वासनिक ताई, जाधव ताई,शोभाताई साळवी,ढाका ताई, पारवे ताई, पंडीत ताई, ई.येडे साहेब वारभुवन ई.कांचन गायकवाड मस्के सर विनोद सवाई आदींनी आपली विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी आयु. संदेश डोळस, ऍड. केतन गायकवाड, आयु. संतोष जोगदंड, आयु. दिपक कांबळे, आयु. गौतम खेमाडे, आयु. तेजेस वडमारे, आयु. अजय बाळशंकर, आयु. सदानंद वाघमारे, आयु. सिध्दांत वडमारे आयु. अमोल वडमारे, आयु. नितीन प्रधान, आयु. संजय सिरसट , आयु. सुयोग ओव्होळ, आयु. रोहन ससाणे, आयु. उमेश डोळस, आयु. किशोर वडमारे आयु. गणेश शिंदे, आयु. सचिन पवार, आयु. राजेश मस्के आयु. राहुल जावळे, आयु. गौतम सोनवणे, आयु. जितु धन्वे, आयु महादेव शिंदे या सर्वांनीच शहर शाखेच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुतार सर यांनी केले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !