रमाई घरकुल च्या फाईल वर सह्या करण्यास मुख्याधिकारी मॅडम यांची दिरंगाई-प्रणित सरवदे



बीड(प्रतिनिधी)-बीड शहरातील रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पहिला हफ्ता, दुसरा हफ्ता, तिसरा हफ्ता असे तीन हफ्तात पैसे RTGS द्वारे दिले जात असतात परंतु फाईलच्या शेवटच्या टप्यात इंजिनियर देशमुख साहेब आणि मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांच्या सह्या प्रमुख असतात त्यामध्ये देशमुख साहेबांकडे पाटोदा चा पदभार असल्याने ते बीड ला येत नाहीत.फाईल वर सह्या करण्यास एक महिना लावतात 15 मिनिटाच्या कामाला एक एक महिना लावत असून लाभार्थी यांना नगरपालिकेला चकरा मारायला लावतात. अंधारे मॅडम तर चक्क ऑफिस लाच येत नाहीत त्यांच्या घरूनच कामकाज बघतात व फाईल वर सह्याचं करत नाहीत त्यांना कॉल केले तर कॉल पण उचलत नाहीत त्यासुद्धा फाईल वर सह्या करण्यास एक महिन्याच्या पुढे कालावधी लावत असून लाभार्थी त्यांना कंटाळून गेले आहेत.लवकरात लवकर लाभार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर सर्व लाभार्थी यांना सोबत घेऊन नागरपालिकेसमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रणित सरवदे यांनी दिला आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !