कंत्राटी सफाई कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच;जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष-गौतम आगळे


परळी ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर मागील ०८ दिवसा पासून कंत्राटी सफाई कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष भाई राजेश कुमार खुशालराव जोगदंड कामगारां सहीत विविध मागण्यांसाठी धरणे धरून बसले आहेत. या धरणे आंदोलणाकडे जिल्हाधिकारी, बीड प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून उन,वारा आणि पाऊसातही कंत्राटी सफाई कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे कंत्राटी सफाई कामगार वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
     या बाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य केंद्रीय सतर्कता आयोग, भारत सरकार नवी दिल्ली द्वारा प्रमाणित राज्यव्यापी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या झुंजार नेतृत्वाखाली दिनांक १९ जून २०२४ पासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सफाई कामगार करत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचे सातव्या दिवशी स्पष्ट झाले. संघटनेतर्फे १७ जून २०२४ रोजी मा.ना. कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले होते, त्यावर त्यांनी उचित कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मा. जिल्हाधिकारी बीड यांना दिले. त्यातील मागण्यांचा दोन वर्षां पासून पाठपुरावा करण्यात येत आहे.तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, अवर सचिव जयंत वानी यांचे शासन पत्र समक्रमांक:- एमयुएम-२०२४/ सं.क्र.५१४/ नवि-१७ दिनांक २१ जून,२०२४ व दि.२७/०२/२०२४/१५/०३/२०२४ रोजी संबंधित अधिकारी यांना नियमोचित कार्यवाही करावी असे पत्र दिले. तरी सुद्धा मा. जिल्हाधिकारी दिपा मुंडे - मुधोळ प्रकरणाचा निपटारा करत नसल्याने कंत्राटी सफाई कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच आहेत. आज ८ वा दिवस सुरू झाला आहे. प्रमुख मागणी: मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी सफाई कामगारांना दिनांक ०१ जून २०२३ रोजी अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले त्यामुळे तब्बल १ वर्षांपासून सफाई कामगारा सह त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना नोकरीच्या व पगाराच्या सलगतेसह पूर्वत कामावर रुजू करून घ्यावे, व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ संबंधित अधिकारी, संघटना पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लावल्याचे पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे स्पष्ट मत आंदोलन कर्ते भाई राजेशकुमार जोगदंड यांनी सहा. आयुक्त ( डॉ.बी.डी.बीक्कड ) नगरपरिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना भेटून ठणकावून सांगितले. जर येत्या ४८ तासात संयुक्त बैठकीचे पत्र प्राप्त झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !