माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरा

वृक्षारोपण व किरणा साहित्याची वाटप

 बीड प्रतिनिधी - चाळीस वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर माजी सैनिक प्रकाश वाघमारे निवृत्तीच्या नंतरही आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे.समाज हिताचे प्रश्न घेऊन वेळोवेळी आंदोलने, धरणे उपोषणे केली आहे. समाज हिताच्या चळवळीत साठी योगदान देत आहेत.त्यांनी देश सेवेनंतर समाजसेवेचे वृत्त हातीती घेतले आहे. समाजाप्रती आपण काही तरी चांगलं करायचं आहे ही भावना कायम. माजी सैनिका प्रकाश वाघमारे यांनी त्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केला .
  वासनवाडी परिसरात असलेल्या रामगड येथील आदिवासी समीकरणे येथील अनाथ बालकासमवेत आपला वाढदिवस साजरा केला.अनाथ, निराधार, वंचित उपेक्षित मुला मुलींसाठी एक महिना पुरेल एवढे किराणा सामान त्यांनी यावेळी भेट दिली.सहकुटुंब सहभागी होऊन परिसरामध्ये वृक्षारोपणही केले. एक आगळावेगळा उपक्रम राबवला. यावेळी त्यांनी असे सांगितले की महापुरुषांचे अनुकरण करून मुलांनीही मोठे बनाव व जिल्ह्याचं व आदिवासी समीकरण गुरुकुल च नाव मोठं करावं तसेच यावेळी त्यांनी पालकांना व संचालकांना असेही ग्वाही दिली की वेळोवेळी जर कसल्याही प्रकारे मदत लागली तर मी मदत करणार आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत राहणार आहेत. सत्कारास उत्तर देताना माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी म्हटले यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबातील सर्वसदस्य, संपादक बालाजी जगतकर संपादक गणेश शिंदे व आदिवासी समीकरणाचे सुधीर भोसले,त्यांचे सर्व सहकारी मुलं, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !