समाजसुधारक राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक विषमता नष्ट केली-नगरसेवक ॲड विकास जोगदंड


बीड (प्रतिनिधी) 26 जून संबंध मानवांच्या उद्धारासाठी व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी  
 सामाजिक विषमता नष्ट करून समताधिष्ठित समाज निर्माण केला असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी सेनेच्या विभागीय कार्यालयात 
राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी अभिवादन पर उपस्थितांना संबोधित करताना केले 
स्त्री, पुरुष समान आहेत म्हणून महिलांना सुद्धा अधिकार आहेत, व ते त्यांना मिळावे यासाठी शाहू महाराजांनी जनजागृती केली 
  प्रस्थापित कर्मठवाद्यांनी माणसा माणसात भेद निर्माण करत समाजात मानसिक गुलामी रुजवून अंधश्रद्धा, सामाजिक शोषण, भेदा-भेदीच्या द्वेषीय चक्रात बहुजनांना अडकवले यातून बहुजनांना मुक्त करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून महाराजांनी त्यांच्या संस्थानात सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले तसेच खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणासाठी शहरांमध्ये आल्यावर त्यांच्या वास्तव्याची सोय व्हावी यासाठी वस्तीग्रह बांधली 
 अस्पृश्यांना शासकीय सेवेत सामावून घेत सर्व मानव समान असल्याचा संदेश देत शाहू महाराजांनी सामाजिक समता स्थापन केली असल्याचे ही शेवटी नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी सांगितले
याप्रसंगी नाना कदम, मंगेश जोगदंड,सत्यभान जाधव,राजेशभाई कोकाटे,महादेव वंजारे,
सचिन जाधव,गोरख जोगदंड, चंद्रकांत जोगदंड,साहिल गायकवाड,आदित्यराजे जोगदंड,लखन शिंदे सह आदी उपस्थित होते 
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदर्शराजे जोगदंड यांनी केले

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !