"नमो विचार मंच" महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी चंदन पवार यांची निवड


भाजपाचे चंदन पवार यांची नमो विचार मंच महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी, नमो विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रजापती आणि राष्ट्रीय मुख्य सचिव नरेंद्र पांचाळ यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात याची घोषणा केली आणि नियुक्तीपत्र देवून सार्थ निवड करण्यात आली आहे. सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या पवार यांना त्यांची कार्यशैली बघूनच जबाबदारी देण्यात आली अशी माहिती मंचचे राष्ट्रीय मुख्य सचिव पांचाल यांनी दिली आहे.

पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नमो विचार मंचच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या सरकारी योजना आहेत, त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी नमो मंचच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे, जनतेला सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळावी आणि त्या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर व्हावी आणि त्या योजनांचा फायदा खरोखर गरीब, शोषित, वंचित आणि मध्यमवर्गीय लोकांना व्हावा याची जबाबदारी नमो विचार मंच घेणार आहे. सामाजिक संघटन असलेल्या नमो विचार मंचचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात असणार आहे, सर्व राज्यांमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या बनवण्याची तयारी नमो विचार मंचने केलेली आहे. लवकरच जिल्हा व तालुका पातळीवर समित्या घोषित करून जबाबदारी देण्यात येणार आहे, मी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करतो की ज्यांना समाजसेवेत रस आहे अशांनी माझ्याशी संपर्क साधावा त्यांना त्यांच्या कार्यशैली प्रमाने जबाबदारी देण्यात येईल.

पवार यांनी त्यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रजापती आणि नरेंद्र पांचाल यांचे आभार मानले आहेत.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !