चंदनसावरगाव -जवळबन रस्त्याचे निकृष्ट काम थांबवून दर्जेदार काम करा -कुलदीप करपे

चंदनसावरगाव -जवळबन रस्त्याचे निकृष्ट काम थांबवून दर्जेदार काम करा -कुलदीप करपे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजेनेचे कार्यकारी अभियंता यांना लेखी तक्रार
बीड/प्रतिनिधी 
    केज तालुक्यातील पंधरा वर्षापासून दुरावस्था झालेल्या मुख्य दळणवळण्याचा मार्ग असलेला चंदन सावरगाव -जवळबन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संथ गतीने काम चालू असून काम प्रारंभ करण्यापूर्वी जुना रस्ता उखडून नव्याने करणे आवश्यक असताना सिद्धेश्वर कंट्रक्शन, धाराशिव या कंत्राटदार कंपनीने जुन्याच रस्त्यावर शेजारच्या तलावातील कच्चा माती मिश्रित शाडू वर्णाचा मुरूम टाकून काम चालू केले आहे.रस्त्याच्या साईडपट्टया देखील खाली काळी माती आणि वर कच्चा मुरूम टाकून भरल्या आहेत.दोन्ही साईड पट्टया भेगाळल्या आहेत.निकृष्ट काम तात्काळ थांबवन्याबाबत उपविभागीय अभियंता श्री एम.आर. फड ,शाखा अभियंता श्री.मते यांना वारंवार कळवून सुद्धा त्यांनी दखल न घेतल्याने मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने सदर रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला आहे. या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे.सदर रस्ता जाणीवपूर्वक संगणमताने कंत्राटदार कंपनीने व पर्यवेक्षण अधिकाऱ्यांनी बोगस व निकृष्ट केला असून या सर्वांवर सक्षम गुणनियंत्रक विभागामार्फत प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी शेतकरी क्रांती मोर्चा चे अध्यक्ष कुलदीप करपे यांनी शुक्रवारी दि.28 जुन2024 रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे बीड येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात केली आहे. येत्या 8 दिवसांत जुना रस्ता उखडून नव्याने दर्जेदार रस्ता विनाविलंब तात्काळ चालू करावा अन्यथा जवळबन ग्रामस्थांच्या वतीने व शेतकरी क्रांती मोर्चा या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या बीड कार्यालयात अथवा रस्त्याच्या चिखलात बेमुदत आंदोलन छेडण्यात इशारा दिला आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !