११५ कोटींची भूमिगत गटार योजना वादात; प्रबुद्धनगर, भीमनगरमध्ये उघड्या चेंबरचा मृत्यूचा सापळा
११५ कोटींची भूमिगत गटार योजना वादात; प्रबुद्धनगर, भीमनगरमध्ये उघड्या चेंबरचा मृत्यूचा सापळा दुचाकीस्वार पडून जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी स्वतःच बुजवले जीवघेणे खड्डे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :परळी वैजनाथ शहरात तब्बल ११५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील प्रबुद्धनगर आणि भीमनगर परिसरात गटार योजनेचे चेंबर उघडेच राहिल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत दगड, माती आणि सिमेंटचे तुकडे टाकून हे जीवघेणे खड्डे बुजवले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उघड्या चेंबरमुळे आतापर्यंत दोन ते तीन नागरिक दुचाकीसह खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी हे उघडे चेंबर मोठा धोका ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात खड्डे दिसत नसल्याने गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात अ...