वनविभागाचा दुटप्पीपणा! उद्योगांसाठी वनजमीन, मात्र ग्रामस्थांच्या रस्त्याला परवानगी नाही
वनविभागाचा दुटप्पीपणा! उद्योगांसाठी वनजमीन, मात्र ग्रामस्थांच्या रस्त्याला परवानगी नाही! मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील २ किलोमीटरचे काम रखडले; कंत्राटदाराने काम सोडल्याने फुकेवाडी ग्रामस्थांची फरफट सुरूच दवाखाना, आठवडी बाजार आणि मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांची कसरत :-- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.२६) :एका बाजूला खासगी उद्योगांच्या प्रकल्पांसाठी वनजमीन उपलब्ध करून दिली जात असल्याचे आरोप होत असताना, दुसरीकडे बीड तालुक्यातील फुकेवाडी येथील ग्रामस्थांना हक्काच्या रस्त्यासाठी वनविभागाच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या आठ किलोमीटरपैकी सहा किलोमीटरचे डांबरीकरण पूर्ण झाले; मात्र वनविभागाच्या हद्दीतील उर्वरित दोन किलोमीटरचे काम परवानगीअभावी रखडले आहे. कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने फुकेवाडी ग्रामस्थांना दवाखाना, आठवडी बाजार आणि मुलांच्या शाळेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासन आणि वनविभागाच्या भूमि...