मुख्यमंत्री साहेब, ५ हजारांची भीक नको; शेतकऱ्यांना हक्काचे ५० हजार द्या
मुख्यमंत्री साहेब, ५ हजारांची भीक नको; शेतकऱ्यांना हक्काचे ५० हजार द्या! शेतकरी हक्क मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन; राजेंद्र आमटे यांचा सरकारला सवाल बीड (प्रतिनिधी ) : दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिके हातची गेली आहेत. पेरणीपासून ते काढणीपर्यंत केलेला खर्च मातीत गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले असताना सरकारकडून भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याने शेतकरी हक्क मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. ‘मुख्यमंत्री साहेब, पाच हजारांची भीक नको; शेतकऱ्यांना हक्काचे ५० हजार रुपये द्या,’अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी भरीव नुकसानभरपाई देण्याऐवजी पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘...