समान वेतनाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आज धरणे आंदोलन
समान वेतनाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आज धरणे आंदोलन
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी आंदोलन; प्रलंबित प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी
बीड : महाराष्ट्र शासनाकडून न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आणि आपल्या न्याय्य हक्कांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालील दुय्यम न्यायालयांतील सर्व संवर्गांतील कार्यरत व सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या धर्तीवर ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे, ही आंदोलनातील प्रमुख मागणी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला होता. मात्र, संबंधित प्रस्ताव गेल्या २० महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शासनाने याप्रकरणी तातडीने निर्णय घेऊन आवश्यक शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील समानता आणि न्याय्य हक्कांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment