विराट जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – नागेश शिंदे, सतीश शिनगारे
विराट जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – नागेश शिंदे, सतीश शिनगारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती बीड (प्रतिनिधी ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) जिल्हा बीडच्या वतीने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. पपुजी कागदे, किसना तांगडे यांची उपस्थिती असणार आहे. या विराट जाहीर सभेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच वंचित आणि उपेक्षित घटकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यामुळे बीड तालुक्यातील नाळवंडी सर्कल आणि पिंपळनेर सर्कल मधील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागेश शिंदे व सतीश शिनगारे यांनी केले आहे. सभेत दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति ह...