वंचित बहुजन आघाडीतर्फे बीडमध्ये जिल्हा कार्यकारिणी मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन
वंचित बहुजन आघाडीतर्फे बीडमध्ये जिल्हा कार्यकारिणी मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन
बीड (विशेष प्रतिनिधी):वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने पक्ष संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने पूर्व-पश्चिम जिल्हा कार्यकारिणी मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज, मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत हॉटेल यशराज इन, जालनारोड, बीड येथे पार पडत आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य तथा बीड जिल्हा निरीक्षक अॅड. अरुण आबा जाधव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच या कार्यक्रमास मा. प्रशांत इंगोले (राज्य कार्यकारिणी सदस्य), मा. ज्ञानेश्वर कवठेकर (राज्य कार्यकारिणी सदस्य) आणि मा. दीपक डोके (राज्य कार्यकारिणी सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बीड जिल्ह्यातील पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी वाटचालीच्या नियोजनासाठी या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment