विराट जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – नागेश शिंदे, सतीश शिनगारे

विराट जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – नागेश शिंदे, सतीश शिनगारे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती 
बीड (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) जिल्हा बीडच्या वतीने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. पपुजी कागदे, किसना तांगडे यांची उपस्थिती असणार आहे. या विराट जाहीर सभेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच वंचित आणि उपेक्षित घटकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यामुळे बीड तालुक्यातील नाळवंडी सर्कल आणि पिंपळनेर सर्कल मधील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागेश शिंदे व सतीश शिनगारे यांनी केले आहे. सभेत दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत देण्यात यावी, शेतमजूर, कामगार तसेच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. तसेच अनुसूचित जातीमधील ५९ जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, कसत असलेल्या २०११ पर्यंतच्या गायरण जमिनीची प्रकरणे निकाली काढण्यात यावीत आणि महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी, अशा विविध मागण्याही सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश अध्यक्ष पपुजी कागदे साहेब किशनराव तांगडे यांच्या उपस्थितीत मांडण्यात येणार आहेत. या सभेच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क सुरू केला असून बीड जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या हक्कांच्या प्रश्नांसाठी या विराट जाहीर सभेला उपस्थित राहून सभेला ताकद द्यावी, असे आवाहन नागेश शिंदे सतिश सिनगारे दिलीप शिंदे, रामेश्वर शिंदे, बाबुराव भालेराव, गणेश कोकाटे, कल्याण सोनवणे, श्रीमंत जाधव, सुंदर वाघमारे, विकास शिंदे, बाळासाहेब वाघमारे, अशोक दळवी, आनंद सोवणणे, नानासाहेब धन्वे, सिद्धार्थ कसबे, सागर मिसळे, भानुदास खरात, गणेश प्रधान, राजेभाऊ वक्ते, सिताराम सिनगारे, प्रकाश ससाणे, राहुल कोरडे, नितीन वाघमारे, बिभीषण जावळे आदींनी विराट सभेला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी