Posts

अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार कधी थांबणार-लोकजनशक्ती पार्टी (रा)

Image
अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार कधी थांबणार-लोकजनशक्ती पार्टी (रा) बीड :  अंबाजोगाई शासकीय रुग्णालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय समजले जाते महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाला कोठ्यावधींचा फंड दिला गेला परंतु शासकीय रुग्णालयातील कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्ती रखडल्यामुळे संबंधित ठिकाणी टेम्परवारी अधिष्ठाता धपाटे सर हे आहेत अधिष्ठाता महोदयांना संबंधित रुग्णालयातील अनेक बाबींकडे लक्ष द्या असे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना वारंवार सांगावे लागत असल्यामुळे अंबाजोगाई शासकीय रुग्णालय हे रामभरोसे चालत असल्याचे दिसून येत आहे आज एवढ्या मोठ्या रुग्णालयात अपघात विभागात तीन ते चार ईसीजी मशीन आहेत एकाच पेशंटची ईसीजी टेस्ट केली तर वेगवेगळ्या मशीनवर वेगवेगळे रिपोर्ट येतात एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी अशा म्हणजेच चायना मेड सारख्या मशीन असतील तर हे रुग्णालय पेशंटच्या जीविताशी खेळत आहे असा आमचा ठाम आरोप आहे मागील आठ दिवसापासून आम्ही या मशीन चेक केल्या असता याच्या रिपोर्टमध्ये तपावत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे जेव्हा खाजगी मध्...

धानोरा रोडच्या टाकीची स्वच्छता करून स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत; नगरसेवक प्रमोद शिंदे यांची पहाटे पाहणी

Image
धानोरा रोडच्या टाकीची स्वच्छता करून स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत; नगरसेवक प्रमोद शिंदे यांची पहाटे पाहणी ​बीड प्रतिनिधी :- गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने पाईपलाईनमधून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. या समस्येची दखल घेत नगरसेवक प्रमोद शिंदे यांनी आज पहाटेच धानोरा रोडच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. ​नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी धानोरा टाकी वॉश आऊट करून घेत पाणीपुरवठा सुरळीत सुरू करून दिला. लवकरच टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागातील नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती नगरसेवक शिंदे यांनी दिली आहे. नगरसेवकाने पहाटेच घेतलेल्या या पुढाकारामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या बीड शहराध्यक्षपदी राणी शेख गुलरुख जहीन यांची नियुक्ती

Image
बीड प्रतिनिधी  :- राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने बीड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेख राणी गुलरुख जहीन, शेख किश्वरुद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अँड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा व महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजियाताई खान, आमदार जयंतराव पाटील साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड विधानसभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार अँड उषाताई दराडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही नूतन शहराध्यक्ष शेख राणी यांनी दिली असून  पक्ष बळकटीकरणासोबतच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. बीड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक...

शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन पाच हजार भाव द्या - नाहीतर साखर कारखाने चालू देणार नाही-- शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांचा इशारा

Image
शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन पाच हजार भाव द्या - नाहीतर साखर कारखाने चालू देणार नाही-- शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांचा इशारा आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 5000 रुपये भाव दिला नाही तर , बीड जिल्ह्यात एकाही साखर कारखान्याचे चाक फिरू दिले जाणार नसल्याचा आक्रमक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आष्टि/पाटोदा/शिरूर कासार उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला .   पुढे सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आणि शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते आ.अंबादास (दादा) दानवे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख मा.अशोक सकपाळ साहेब.शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास (भैया) गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही भूमिका घेण्यात आल्याचे सांगितले.   शेतकरी दुष्काळाने होरपळला-- पुढे आजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी सांगितले की, आज शेतकरी दुष्काळामुळे पूर्णपणे होरपळून गेला . रात्रंदिवस कष्ट करून, रक्ताचं प...

लिंबागणेश येथे दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर

Image
लिंबागणेश येथे दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात  महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर; वस्तुनिष्ठ नोंदीवर प्रशासनाचा भर बीड प्रतिनिधी : (दि.०३) दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या कामाला वेग आला असून, महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशाने तालुक्यात गावनिहाय पथके तैनात करण्यात आली आहेत. सुधारित पंचनामा आदेशानुसार गावनिहाय पथकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक गावासाठी ग्राममहसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली ग्रामस्तरीय यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. संबंधित पोलिस पाट...

पिंपरनई येथील शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Image
पिंपरनई येथील शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या  दुष्काळ व मुलीच्या लग्नाच्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल? – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि. ०३ )बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील पिंपरनई येथील शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे (वय ४४ वर्षे) यांनी शनिवारी सकाळी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. विक्रम दाभाडे हे दररोज नित्यनेमाने दूध घालून तसेच शेतातील गाय बांधून घरी परतत असत. मात्र शनिवारी ते नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने त्यांची मुलगी साक्षी दाभाडे त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेली. त्यावेळी विक्रम दाभाडे हे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, दुष्काळी परिस्थिती आणि मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चामुळे विक्रम दाभाडे हे आर्थिक विवंचनेत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. मात्र आत्महत्येचे नेमके कारण संबंधित तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. विक्रम दाभाडे यांच्या पश्चात पत्नी अश्विनी विक्रम दा...

जीवाची वाडी ग्रामपंचायत व ग्रंथालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबाहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

Image
येवता:प्रतिनिधी:सा.वा.दि.o२/१०/२०२६ रोजी केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय,जीवाची वाडी व कै.श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामिण वाचनालय, जीवाची वाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमता प्रथिमिचे पूजन ग्रामपंचायत अधिकारी,महिंद्र मुंडे व ग्रंथपाल, सुभाष सारूक यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ देण्यात आले कार्यक्रमास बालाप्रसाद भुतडा,दीपक काळे, नामदेव चौरे,विकास चौरे,पिंटू बांगर ग्रामस्थ व विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.